एक्स्प्लोर
Advertisement
मुंबई-लातूर बिदर एक्स्प्रेसमध्ये सहप्रवाशांकडून मारहाण, तरुणाचा मृत्यू, 12 जणांना अटक
मुंबई-लातूर बिदर एक्स्प्रेसमध्ये सहप्रवाशांकडून मारहाणीत तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणात 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
पुणे : मुंबई-लातूर बिदर एक्स्प्रेसमध्ये एका तरुणाला त्याच्या लहान मुलगी, आई आणि बायको समोरच मारहाण करण्यात आली. यामध्ये त्या तरुणाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना मुंबई-लातूर बिदर एक्स्प्रेसमध्ये घडली आहे. सागर जनार्धन मारकड (26) असं मृत तरुणाचं नाव आहे. सागर त्याची बायको, लहान मुलगी आणि आई सोबत बायकोच्या चुलतीचा मृत्यू झाल्याने अंत्यविधीसाठी माढ्यातील उपळाई येथे चालले होते, त्यावेळी ही घटना घडली.
पुणे रेल्वे स्टेशन येथील प्लॅटफॉर्म नंबर सहावरून मुंबई-लातूर- बिदर एक्स्प्रेस गाडीच्या इंजिनच्या मागील दुसऱ्या क्रमांकाच्या जनरल डब्यातून पुणे ते कुर्डवाडी असे प्रवासाला निघाले असता जनरल डब्यात बसण्यास जागा नव्हती. सागर मारकड आणि त्याचं सर्व कुटुंब उभं होतं. गाडी पुणे रेल्वे स्टेशनपासून सुटताच सागर यांनी दरवाजा लगत असलेल्या सीटवरील एका महिलेस 'माझ्या पत्नीजवळ लहान मुलगी आहे बसण्यासाठी थोडी जागा द्या' असं म्हटलं. यावेळी काही कारणावरुन बाचाबाची झाली आणि त्या महिलेने सागर यांना शिवीगाळ केली. तेव्हा सागर यांनी त्या महिलेस शिवीगाळ करू नका असे म्हटले.
यावेळी तिथे असलेल्या एका गटातील महिलांनी सागर यांना आणखी शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. त्या महिलेसोबत असलेले सहा पुरुष आणि सहा महिलांनी देखील सागरसह कुटुंबियांना लाथाबुक्क्यांनी काठीने मारले. त्यावेळी सागरच्या पत्नीने आणि आईने त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला. तरी देखील त्या लोकांनी सागर यांना काठीने जबर मारहाण केली. त्या दरम्यान सागर हा मारहाणीमुळे डब्यातच खाली पडला. सागरला उठवण्याचा प्रयत्न त्यांच्या बायकोने आणि आईने केला. पण त्याचा जागीच मृत्यू झाला होता.
त्यानंतर सागरच्या पत्नीने 3 वेळा रेल्वेमधील चैन देखील ओढली. मात्र गाडी थांबून पुन्हा सुरू झाली. परंतु कुणीही मदतीसाठी आले नाही. नंतर गाडीतील एका प्रवाशाने फोनद्वारे पोलिसांना या घटनेबाबत कळवले. यानंतर मुंबई-लातूर बिदर एक्स्प्रेस गाडी दौंड रेल्वे स्टेशनला पहाटे दोन वाजता सुमारास आली, तेव्हा दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यातील पोलिस आले आणि त्यांनी आरोपींना ताब्यात घेतले. मृत सागरला दौंड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्याचा जागीच मृत्यू झाला होता, असं डॉक्टरांनी घोषित केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement