एक्स्प्लोर

Morning Headlines 30th March : देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा मॉर्निंग न्यूज

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार, कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी?

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar Party) पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची (Lok Sabha Election 2024) पहिली यादी (Candidates List) आज जाहीर होणार आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यात बारामती, शिरुर, अहमदनगर आणि दिंडोरीसह भिवंडी मतदारसंघाचा समावेश आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उमेदवारांची यादी घोषित करतील. महाविकास आघाडीत ठाकरे गटानं 17 उमेदवारांची यादी आधीच जाहीर केली आहे. वाचा सविस्तर...

Archana Patil : धाराशीवचं राजकारण तापलं! राणजगजितसिंहांच्या पत्नींनी ओमराजेंना डिवचलं, नराधम उल्लेखामुळे वाद पेटणार?

धाराशिव : येथे लोकसभा निवडणुकीमुळे (Loksabha Election) राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राजकीय नेते एकमेकावर टोकाचे आरोप-प्रत्यारोप करत आहेत. महाविकास आघाडीन (Maha Vikas Aghadi) येथून ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांना उमेदवारी दिली आहे. निंबाळकर यांच्या उमेदवारीनंतर आता महयुतीकडून (Mahayuti) कोणाला तिकीट दिले जाणार, याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. महायुतीकडून तिकीट मिळावे यासाठी प्रयत्न करणारे भाजपचे नेते राणाजगजितसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी निंबाळकर यांच्यावर गंभीर स्वरुपाची टीका केली आहे. निंबाळकर हे गुन्हेगार आहेत, असं त्या म्हणाल्यात. वाचा सविस्तर... 

महाराष्ट्राचे उमेदवार हैदराबादमध्ये ठरणार! लवकरच MIM कडून घोषणा; मविआची डोकेदुखी वाढणार? 

मुंबई : महाराष्ट्रात राजकारणाला रंग चढला आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) यांचे जागावाटपाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होऊ शकते. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी (मविआ) (Vanchit Bahujan Aghadi) हा पक्षदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. आता एमआयएमहा (MIM) पक्षदेखील महाराष्ट्रात आपले उमेदवार देणार आहे. तशी माहिती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांनी दिली आहे. विशेष म्हणजे जलील महाराष्ट्रातील उमदेवारांची यादी हैदराबादला घेऊन जाणार असून तेथेच उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. वाचा सविस्तर...

मुंबईकरांच्या खिशाला कात्री, वांद्रे-वरळी सी लिंकवर टोल वाढ; नेमकी किती केली वाढ?

Toll Hike in Bandra Worli Sea Link : वांद्रे-वरळी सी लिंक (Bandra Worli Sea Link) म्हणजेच राजीव गांधी समुद्र सेतूवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे.1 एप्रिलपासून या मार्गावर प्रवास करण्यासाठी टोलमध्ये वाढ (Toll Hike) करण्यात आलीय. ही टोल वाढ 18 टक्के एवढी करण्यात आलीय. यामुळे मुंबईकरांच्या खिशावर भार पडणार आहे. वाचा सविस्तर...

ABP Shikhar Sammelan 2024 : राहुल गांधी अमेठीतून लोकसभा निवडणूक लढवणार की नाही? मल्लिकार्जुन खरगे काय म्हणाले??

ABP Shikhar Sammelan 2024 : ABP न्यूजच्या विशेष कार्यक्रम शिखर संमेलनामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) तयारी आणि इंडिया आघाडीच्या युतीच्या शक्यतांपर्यंतच्या अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवरही जोरदार निशाणा साधला. दरम्यान, राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवणार असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले की, काही वेळा अशा प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा लागतो. वाचा सविस्तर...

IPL 2024 : आरसीबीच्या बॉलिंगला चोपणाऱ्या सुनील नरेनला काही कळलंच नाही, मयंक डागरचा बॉल थेट स्टम्पवर आदळला, पाहा व्हिडीओ

बंगळुरु : आयपीएलमध्ये (IPL 2024)कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengalur) यांच्यात दहावा सामना पार पडला. या मॅचमध्ये केकेआरनं (KKR) आरसीबीवर (RCB) 7 विकेटनं दणदणीत विजय मिळवला. आरसीबीनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 बाद 182 धावा केल्या होत्या. आरसीबीकडून सर्वाधिक धावा विराट कोहलीनं केल्या. विराटनं 83 धावांची खेळी केली. केकेआरच्या फलदाजांच्या दमदार कामगिरीमुळं त्यांनी मॅच 19 व्या ओव्हरमध्येच जिंकली. केकेआरला फिलीप सॉल्ट आणि सुनील नरेननं ( Sunil Narine) चांगली सुरुवात करुन दिली होती. वाचा सविस्तर...

Horoscope Today 30 March 2024 : आजचा दिवस मेष, सिंह राशींसाठी भाग्याचा, तर 'या' राशींना बसणार आर्थिक फटका; वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 30 March 2024 : पंचांगानुसार, आजचा वार शनिवार. आज ग्रहांच्या हालचालींनुसार काही राशींचा दिवस उत्साहात जाणार आहे. तर, काही राशीच्या लोकांना तणावाचा सामना करावा लागणार आहे. ग्रहांच्या हालचालींनुसार, तुम्हाला जर तुमचा आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घ्यायचं असेल तर आजचं राशीभविष्य वाचा सविस्तर... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget