एक्स्प्लोर

Horoscope Today 30 March 2024 : आजचा दिवस मेष, सिंह राशींसाठी भाग्याचा, तर 'या' राशींना बसणार आर्थिक फटका; वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 30 March 2024 :आज ग्रहांच्या हालचालींनुसार काही राशींचा दिवस उत्साहात जाणार आहे. तर, काही राशीच्या लोकांना तणावाचा सामना करावा लागणार आहे.

Horoscope Today 30 March 2024 : पंचांगानुसार, आजचा वार शनिवार. आज ग्रहांच्या हालचालींनुसार काही राशींचा दिवस उत्साहात जाणार आहे. तर, काही राशीच्या लोकांना तणावाचा सामना करावा लागणार आहे. ग्रहांच्या हालचालींनुसार, तुम्हाला जर तुमचा आजचा दिवस कसा जाईल हे जाणून घ्यायचं असेल तर आजचं राशीभविष्य वाचा. 

मेष (Aries Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. विशेषत: बॅंकिंग सेक्टरशी संबंधित लोकांना आजचा दिवस अधिक चांगला जाणार आहे. प्रगतीची संधी आहे.

व्यापार (Business) - व्यावसायिकांनी आपला व्यवसाय प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. तरंच, तुमच्या व्यवसायात प्रगती मिळू शकते. कोणाचं कर्ज घेतलं असल्यास वेळीच फेडा. 

कुटुंब (Family) - आज कुटुंबियांबरोबर तुमचा दिवस चांगला जाईल. भाऊ-बहिणीबरोबर तुमचं नातं अधिक घट्ट होईल. लाडही पुरवले जातील. 

आरोग्य (Health) - आरोग्याच्या संबंधित बोलायचे झाल्यास ज्यांना हृदयाचा त्रास आहे अशा लोकांनी जास्त चिडचिड करू नये. घरात शांती ठेवण्याचा प्रयत्न करा. 

वृषभ (Taurus Today Horoscope)

नोकरी (Job) - नोकरदार वर्गातील लोकांनी कामाच्या ठिकाणी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. 

आरोग्य (Health) - ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा लोकांनी आपल्या आहाराची काळजी घ्यावी. काही दिवस मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळावे. फायबरयुक्त पदार्थांचं सेवन करा. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. 

शिक्षण (Education) - मुलांनी शारीरिक स्वास्थ्य आणि खेळांबरोबरच अभ्यासातही लक्ष देणं गरजेचं आहे. 

मिथुन (Gemini Today Horoscope)

नोकरी (Job) - तुम्हाला नोकरीत नवीन आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं. याकडे एक चांगली संधी म्हणून पाहा. 

आरोग्य (Health) - वेळी-अवेळी खाणं, तेलकट पदार्थांचं सेवन यामुळे तुम्हाला अॅसिडीटी होऊ शकते. रोज वेळेत जेवण करा. 

व्यापार (Business) - जे ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस खास असणार आहे. प्रवासाच्या माध्यमातून तुम्हाला अनेक आर्थिक लाभ मिळतील. 

कुटुंब (Family) - कुटुंबात आज तुमचं खूप लाड होईल. अनेक भेटवस्तू देखील मिळण्याची शक्यता आहे. 

कर्क (Cancer Today Horoscope) 

नोकरी (Job) - नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस अधिक कामकाजाचा, तणावाचा असणार आहे. डोकं शांत ठेवून सगळी कामं करा. 

आरोग्य (Health) - आज तुमचे आरोग्य चांगले असणार आहे. मात्र, कामाच्या वाढत्या व्यापामुळे तणाव जाणवू शकतो. 

तरूण (Youth) - ज्या तरूणांना सरकारी नोकरीची इच्छा आहे त्यांनी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. 

कुटुंब (Family) - कुटुंबात सुख-शांती नांदावी यासाठी गरजूंना दान करा. 

सिंह (Leo Today Horoscope) 

नोकरी (Job) - ग्रहांच्या स्थितीनुसार, ही वेळ तुमच्यासाठी चांगली आहे. हीच वेळ आहे कामाच्या ठिकाणी तुमची छाप पाडण्याची, स्वत:ला सिद्ध करण्याची. त्या दृष्टीने प्रयत्न करा. 

आरोग्य (Health) - आज तुमच्या शरीरात कॅलरीचे प्रमाण फार वाढू शकते. त्यामुळे तुम्हाला सतत अस्वस्थ वाटेल. 

व्यापार (Business) - जे शेअर मार्केटमध्ये काम करतायत त्यांच्यासाठी आजचा दिवस आव्हानात्मक असणार आहे. काळजीपूर्वक पैशांची गुंतवणूक करा. 

तरूण (Youth) - आज तुमचा आत्मविश्वास काही ठिकाणी कमी पडू शकतो. अशा वेळी चिडचिड करू नका. शांत होऊन हनुमान चालिसेचा जप करा. 

कन्या (Virgo Today Horoscope) 

नोकरी (Job) - आज तुम्ही कामात जरा सावधानतेनेच काम करा. कोणाशीही कोणत्याही प्रकारे गॉसिपिंग करू नका.

आरोग्य (Health) - तुमच्या जेवणात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश जास्तीत जास्त करा. कारण बद्धकोष्ठतेच्या त्रासाने तुम्ही हैराण होऊ शकता. 

व्यापार (Business) - व्यवसायात चढ-उतार पाहायला मिळू शकतो. आजच्या दिवशी कामात कदाचित समाधानकारक कमाई होणार नाही. पण, खचून जाऊ नका. 

कुटुंब (Family) - कुटुंबात काही कारणास्तव तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा वेळी रागावर नियंत्रण ठेवा. 

तूळ (Libra Today Horoscope)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. कामाच्या ठिकाणी मनासारखं काम न झाल्यामुळे अस्वस्थ वाटू शकतं. 

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, तुम्ही अगदी ठणठणीत असाल. फक्त निष्काळजीपणा करू नका. 

व्यापार (Business) - पार्टनरशिपमधून सुरु केलेल्या व्यवसायाला चांगलं यश मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन ऑर्डर्स मिळतील. 

तरूण (Youth) - युवकांनी नकारात्मक ऊर्जेपासून दूर राहा. सकारात्मक ऊर्जेसाठी नैसर्गिक वातावरणात फिरा. 

वृश्चिक (Scorpio Today Horoscope)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला वरिष्ठांच्या वागणुकीचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी खचून जाऊ नका. 

आरोग्य (Health) - आज डोळ्यांवर तणाव येईस अशी कामं करू नका. मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवू नका. 

व्यापार (Business) - आळस आणि थकव्यामुळे आज कामात तुमचं मन रमणार नाही. 

प्रेमसंबंध (Relationship) - तुमच्या जोडीदाराबरोबर छान वेळ घालवता येईल. अनेक नवीन वस्तूंची खरेदी कराल. 

धनु (Sagittarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला मानसिक तणाव जाणवू शकतो. कामात प्रामाणिक राहा. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं असेल पण आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करू नका. वेळोवेळी आरोग्य तपासणी करा. 

व्यापार (Business) - व्यापारात विश्वास ठेवताना जरा जपून ठेवा. कोणालाही पैसे देताना सावधानता बाळगा. 

कुटुंब (Family) - कुटुंबाची परिस्थिती चांगली असणार आहे. नातेवाईकांशी भेटीगाठी होतील. 

मकर (Capricorn Today Horoscope)

आरोग्य (Health) - आज आरोग्याची विशेष काळजी घ्या. बदलत्या वातावरणामुळे तुमच्यावर तसेच तुमच्या मुलांवर परिणाम होऊ शकतो. 

व्यापार (Business) - कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घेण्याची गरज आहे. हलगर्जीपणा करू नका. 

तरूण (Youth) - तरूणांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करायला सुरुवात करा. लवकरच चांगल्या नोकरीची चिन्हं आहेत. 

प्रेमसंबंध (Relationship) - तुमच्या पार्टनरबरोबर अनावश्यक वाद टाळा. जुन्या गोष्टी पुन्हा उकरून काढू नका. 

कुंभ (Aquarius Today Horoscope)

नोकरी (Job) - आज तुम्हाला ऑफिसमध्ये जास्त कामाचा लोड जाणवू शकतो. अशा वेळी शांत डोक्याने काम करा. 

आरोग्य (Health) - आज मसालेदार पदार्थ खाणे टाळा. अन्यथा, कॉलेस्ट्रॉलशी संबंधित समस्या जाणवू शकतात.

व्यापार (Business) - आज तुमच्या व्यवहारात तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. 

विद्यार्थी (Students) - जे विद्यार्थी परीक्षांची तयारी करतायत त्यांना लवकरच सकारात्मक परिणाम मिळतील. 

मीन (Pisces Today Horoscope)

नोकरी (Job) - आज नोकरदार वर्गातील लोकांचा दिवस उत्साही असणार आहे. फक्त बोलताना डोक्यावर बर्फ आणि जीभेवर साखर ठेवा. 

आरोग्य (Health) - विजेशी संबंधित कोणतीही कामे करताना काळजीपूर्वक करा. अन्यथा दुर्घटला घडू शकते. 

व्यापार (Business) - आज तुमच्या व्यापारात तुम्हाला अनपेक्षित नफा मिळाल्याने तुम्हाला आनंद होईल. 

कुटुंब (Family) - कुटुंबातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Sagittarius April Horoscope 2024: धनु राशीच्या लोकांनी मुंगी होऊन साखर खावी, कसा असणार एप्रिल महिना? वाचा मासिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Aditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्यABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
Embed widget