एक्स्प्लोर

मोठी बातमी : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार, कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी?

NCP Sharad Pawar Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार आहे. याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar Party) पक्षाच्या लोकसभा उमेदवारांची (Lok Sabha Election 2024) पहिली यादी (Candidates List) आज जाहीर होणार आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला महाविकास आघाडीत 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यात बारामती, शिरुर, अहमदनगर आणि दिंडोरीसह भिवंडी मतदारसंघाचा समावेश आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उमेदवारांची यादी घोषित करतील. महाविकास आघाडीत ठाकरे गटानं 17 उमेदवारांची यादी (NCP Sharad Pawar Party Candidates First List) आधीच जाहीर केली आहे.

शरद पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी (NCP Sharad Pawar Party Candidates List) आज जाहीर होणार असून याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला महाविकास आघाडीत 10 जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी बारामती, शिरूर, नगर दक्षिण, दिंडोरी आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

कोणत्या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी?

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्व पक्षांकडून उमेदवार (Candidates List) जाहीर केले जात आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट आज उमेदवारी जाहीर करणार असून बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अहमदनगरमधून निलेश लंके, दिंडोरीमधून भास्कर भगरे आणि भिवंडीतून बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज वर्धा लोकसभेच्या उमेदवाराबाबत देखील निर्णय होण्याची देखील दाट शक्यता आहे. पवार गटाकडून अद्याप माढा, बीड, रावेर, सातारा, वर्धा, लोकसभेचा उमेदवार ठरलेला नाही.

माढा, सातारा , जळगावबाबत तिढा कायम

आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून सहा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामध्ये माढा, सातारा , जळगावमधील उमेदवारांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याने या मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येणार नाहीत. आज  जाहीर होणाऱ्या नावात बारामती, अहमदनगर, दिंडोरी, बीड या मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर होणास असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Shiv Sena UBT Candidates List Lok Sabha Election 2024 :  शिवसेना ठाकरे गटाकडून 17 उमेदवार जाहीर, उर्वरित पाच जागांचे काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget