एक्स्प्लोर

होय, मी चुकलो, 12 वर्षांपूर्वी शिवसेना सोडणं ही माझी चूक : शिशीर शिंदे

हो मी चुकलो, शिवसैनिकांनो, मला माफ करा, बारा वर्षांपूर्वी शिवसेना सोडणं ही माझी चूक होती, असे शिशीर शिंदे म्हणाले.

मुंबई : मनसेचे नेते शिशीर शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुंबईत आयोजित शिवसेनेच्या 52 व्या वर्धापनदिनाच्या सोहळ्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिशीर शिंदेनी पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी छोटेखानी भाषण करुन आपल्या भावनाही व्यक्त केल्या. “उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर भेटलो. निघताना त्यांच्या हाताला स्पर्श केला, तेव्हा बाळासाहेबांची आठवण झाली.”, असे शिशीर शिंदे म्हणाले. हो मी चुकलो, शिवसैनिकांनो, मला माफ करा, बारा वर्षांपूर्वी शिवसेना सोडणं ही माझी चूक होती, असे म्हणत शिशीर शिंदे पुढे म्हणाले, यापुढे शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. उद्धव ठाकरे यांनी शिशीर शिंदेंच्या मनगटावर शिवबंधन बांधून, हातात भगवा झेंडा देऊन, त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. कोण आहेत शिशीर शिंदे? शिशीर शिंदे हे मनसेचे विद्यमान सरचिटणीस आहेत. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे जे 13 आमदार निवडून आले होते, त्यामध्ये भांडुपमधून शिशीर शिंदे विजयी झाले होते. अत्यंत धाडाडीचे नेते आणि डॅशिंग आमदार म्हणून ते कायमच परिचित राहिले आहेत. शिशीर शिंदेंची राजकीय कार्यकीर्द : - 64 वर्षीय शिशीर शिंदे यांनी आपली राजकीय कारकीर्द शिवसेनेतून सुरु केली. - 1992 साली ते शिवसेनेचे मुलुंडचे नगरसेवक होते. - शिवसेनेने त्यांना उपनेतेपद दिलं होते - शिवसेनेची अनेक आंदोलनं त्यांनी गाजवलं. - बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशाने पाकविरुद्धच्या सामन्यापूर्वी वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली होती. - शिशीर शिंदेंनी 1991 मध्ये वानखेडे मैदानाची खेळपट्टी उखडली होती. - 1996 ते 2002 या काळात ते विधानपरिषदेचे सदस्य होते. - त्यांनी 2006 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र करत, राज ठाकरे यांच्या मनसेत प्रवेश केला. - मनसेकडून त्यांनी 2009 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवली होती, मात्र तिथे त्यांचा पराभव झाला. - त्याच वर्षी शिशीर शिंदे यांनी विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला होता. मात्र विधानसभा सभागृहात शपथघेण्यापूर्वीच त्यांना मुंबई आणि नागपूर विधानसभेतून चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं होतं. - सपा आमदार अबू आझमी यांच्या हिंदीतील शपथेला विरोध करत, त्यांच्यावर मनसे आमदारांनी सभागृहातच हल्ला केला होता. या प्रकरणात शिशीर शिंदे निलंबित झाले होते. मात्र 2009 मध्ये त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली. आतापर्यंत कुठल्या नेत्यांचा मनसेला राम राम? नाशिकमधील वसंत गिते, मुंबईमधील राम कदम आणि प्रवीण दरेकर यांसारखे बडे नेते मनसेतून आतापर्यंत बाहेर पडले आहेत. त्यानंतर आता शिशीर शिंदे पुन्हा स्वगृही दाखल झाले आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात

व्हिडीओ

Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे-पवारांच्या युतीला दे धक्का; उमेदवाराने परस्पर अर्ज माघारी घेतला; निवडणुकांपूर्वीच 1 जागा झाली कमी
Embed widget