निकाल दोन दिवसांपूर्वीच ठरला, राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा; ठाकरे गट आक्रमक
आमदार अपात्रता निकाल दोन दिवसांपूर्वीच ठरला आहे. निकाल आमच्याविरोधात लागणार हे आत्ताच कळलंय, त्यामुळेआता निकालाबाबत उत्सुक नाही, असे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले.
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर (Rahul Narwkar) यांची 'नार्को टेस्ट' करण्याची खळबळजनक मागणी अकोला जिल्ह्यातील बाळापुरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी केलीये. त्याला आमदार संजय गायकवाड यांनी प्रत्युत्तर दिलंय. ठाकरे गटाला निकाल लक्षात आलाय. त्यामुळे ते अकलेचे तारे तोडत आहेत असं प्रत्युत्तर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिलंय.
नितीन देशमुख म्हणाले, निकाल आधीच ठरलेला आहे. भाजपनं सांगितला तसा विधानसभा अध्यक्ष देतील. जर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची 'नार्को टेस्ट' केली तर यातील सर्व सत्य बाहेर येईल. जे गद्दार आहेत त्यांना आजच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर रात्री झोप आली नसेल. आम्ही निर्धास्त झोपलो. आम्हाला निकालाची चिंता नाहीय. निकाल काहीही लागला तरी आमचा जनतेवर विश्वास आहे.
आमदार अपात्रता निकाल दोन दिवसांपूर्वीच ठरला : वैभव नाईक
आमदार अपात्रता निकाल दोन दिवसांपूर्वीच ठरला आहे. निकाल आमच्याविरोधात लागणार हे आत्ताच कळलंय, त्यामुळेआता निकालाबाबत उत्सुक नाही. मला आत्ताच मंत्रालयात शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे असो दोन आमदार भेटले त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलंय की, निकाल आमच्याविरोधात जाणार आहे. निकाल आमच्या विरोधात गेला तर पुन्हा न्यायालयात जाऊ, असे ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले.
बाळासाहेबांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी : नितीन देशमुख
आम्ही आणखी ताकदीने जिल्ह्यातून आणि राज्यातून जास्तीत जास्त आमदार निवडून आणत उद्धवसाहेबांचे हात मजबूत करू. निकाल देणारे न्यायाधीश नार्वेकर मुख्यमंत्र्यांना भेटतात, यातच सारं आलं. आमचा देव असलेल्या बाळासाहेबांचा आशिर्वाद आमच्या पाठीशी आहे, असे नितीन देशमुख म्हणाले.
ठाकरे गटाला निकाल लक्षात आलाय.त्यामुळे ते अकलेचे तारे तोडत आहे : संजय गायकवाड
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नार्को टेस्ट करण्यात यावी अशी अजब मागणी केल्याने वाद निर्माण झाला आहे यावर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी पलटवार केला नितीन देशमुखांच्या मागणीवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणाले, ठाकरे गटाला कळून चुकलं आहे की आपला निकाल लागला आहे. त्यामुळे हे असे अकलेचे तारे तोडत आहेत.
हे ही वाचा :