एक्स्प्लोर
हेमामालिनी रोज बंपर दारु पितात, त्यांनी आत्महत्या केली का? : बच्चू कडू
नांदेड : "अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या हेमामालिनी रोज एक बंपर दारु पितात, म्हणून त्यांनी काय आत्महत्या केली का?," असं वादग्रस्त विधान आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. ते आज नांदेडमध्ये बोलत होते.
दारुमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात हा दावा खोडून काढताना बच्चू कडू यांनी हे उदाहरण दिलं आहे. मात्र आता त्यांच्या या विधानाने पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
"नारायण राणे म्हणाले होते की दारु पिऊन आत्महत्या होते. गडकरीसाहेब म्हणत होते की लग्नाचा खर्च जास्त झाल्यावर शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात. वेगवेगळ्या लोकांनी अशी विधानं केलेली पाहतो. त्यांना माझा असा सवाल आहे की, दारु कोण पित नाही? 75 टक्के आमदार दारु पितात. खासदार पितात, पत्रकारही पितात. मग ती हेमामालिनी तर रोज बंपर दारु पिते, मग तिने अजून आत्महत्या केली नाही," असं बच्चू कडू म्हणाले.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement