एक्स्प्लोर

Chandrapur News: स्वतःला पंतप्रधान म्हणवून घेणाऱ्या स्वयंघोषित नेत्याचा कारनामा; आधी फार्च्यूनरनं बॅरिकेट तोडलं, नंतर चार किमीवर कार सोडत काढला पळ, नेमकं काय घडलं?

Chandrapur News : वरोरा शहरात स्वतःच्या गाडीवर पंतप्रधान आणि PM लिहून फिरणाऱ्या महादेव आसेकर नामक व्यक्तीचा प्रताप समोर आलाय.

Chandrapur News : वरोरा शहरात स्वतःच्या गाडीवर पंतप्रधान आणि PM लिहून फिरणाऱ्या महादेव आसेकर नामक व्यक्तीचा प्रताप समोर आलाय. महादेव आसेकर यांनी फार्च्यूनर कारने पोलिसांची नाकाबंदी तोडली. यानंतर पोलीस आणि नागरिकांनी चार किलोमीटरपर्यंत त्यांच्या मागे धाव घेतली असता आसेकर गाडी सोडून पळून गेले. सध्या आसेकर हे बेपत्ता आहेत.  

Chandrapur News : नेमकं काय घडलं? 

शनिवारी संध्याकाळी वरोरा शहरातील रत्नमाला चौकाजवळ पोलिसांनी नाकाबंदी लावली असता, आसेकर यांनी ती तोडून कार पुढे नेली. पोलिस आणि नागरिकांनी चार किलोमीटरच्या अंतरावर गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु आसेकर गाडी सोडून पळून गेले. सध्या ते बेपत्ता आहेत. स्वतःच्या गाडीवर पंतप्रधान असं लिहून फिरणाऱ्या आसेकर यांच्याकडे आतापर्यंत गंमत म्हणून पोलिसांनी दुर्लक्ष केलं होतं. मात्र, आता बॅरिकेट तोडल्याच्या प्रकरणामुळे आसेकर कायद्याच्या कचाट्यात फसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Chandrapur News : आसेकरांच्या अर्जात विचित्र मागण्या

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आसेकर यांनी वरोरा पोलीस आयुक्तांना अर्ज सादर केला होता. त्यात त्यांनी स्वतःला पंतप्रधान घोषित केले असल्याचा दावा करत पिस्टलसह अंगरक्षण आणि पंतप्रधानांना मिळणारे प्रमाणपत्र घरपोहोच देण्याची मागणी केली होती. तसेच, वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आणि वर्षा तंदूलकर यांना पोलिस निरीक्षक (ठाणेदार) पदावर नियुक्त करण्याची मागणीही त्यांनी केली होती. या प्रकरणामुळे महादेव आसेकर यांची राज्यभरात चर्चा रंगली आहे.

Chandrapur News : कोण आहे आसेकर?

महादेव आसेकर यांना शेतीतून पाच कोटी मिळाल्याचे समजते. यानंतर त्यांनी वरोरा येथे आलिशान घर खरेदी केले. तसेच फार्च्यूनर कार देखील घेतली. पूर्वी ते मी कॅबिनेट दर्जाचा माणूस असल्याचे सांगत होते. नंतर काही दिवस कारवर 'व्हीआयपी पर्सन' असे लिहिले होते. आता तर चक्क स्वतःला स्वयंघोषित पंतप्रधान म्हणून ते मिरवत आहे. वरोरा येथे ते खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या निवासस्थानाच्या परिसरात राहत असल्याची माहिती समोर येत आहे. आसेकर हे प्रतिभा धानोरकर यांच्या घरासमोरून कार रेस करून पुढे नेतात, असे देखील समजते.  

Chandrapur News : आसेकर कायद्याच्या कचाट्यात फसण्याची शक्यता

आसेकरांच्या या विलक्षण वर्तनामुळे वरोरात त्यांची जोरदार चर्चा रंगली आहे. परंतु बॅरिकेट तोडल्यामुळे पोलिसांकडून आता कडक कारवाईची शक्यता व्यक्त केली आहे. स्वतःच्या गाडीवर पंतप्रधान असं लिहून फिरणाऱ्या आसेकर यांच्यावर बॅरिकेट तोडल्याच्या प्रकरणामुळे कारवाई होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

Crime News: 12 वर्षांचा संसार; सोशल मीडियावर झालं दुसऱ्यासोबत प्रेम; इग्नोर केल्यानं प्रियकरानं घरी येऊन तिच्यावर झाडली गोळी, जळगावातील प्रेमप्रकरणाचा रक्तरंजित शेवट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget