एक्स्प्लोर

राज्यभरातील सर्व कार्यालयांचे 30 दिवसांत PoSH ऑडिट; महिलांच्या लैंगिक छळासंबंधी स्थितीची माहिती द्या, जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश

Women Safety at Workplace  : कंपन्यांमध्ये PoSH अंतर्गत तक्रार समिती नसल्यास तात्काळ स्थापना करावी अन्यथा कारवाई करण्याचा इशारा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिला आहे. 

मुंबई : राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013’ म्हणजेच PoSH Act ची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी 30 दिवसांत विशेष ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत.

राज्यातील प्रत्येक कार्यालयात अंतर्गत तक्रार समिती (Internal Committee IC) कार्यरत आहे का, तिची रचना व कामकाज योग्य प्रकारे सुरू आहे का, याची खात्री करण्यासाठी हे ‘PoSH ऑडिट’ राबविण्यात येणार आहे. समिती अस्तित्वात नसल्यास तात्काळ स्थापना करावी, अन्यथा संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

PoSH Act 2013 Implementation : पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 नुसार प्रत्येक शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ, मंडळ, स्वायत्त संस्था तसेच खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती (IC) स्थापन करणे बंधनकारक आहे. तसेच जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समिती (LC) कार्यरत असणे आवश्यक आहे.

राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारी, विविध अहवाल आणि राज्यभरातील दौऱ्यांदरम्यान अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्याचे चाकणकर यांनी नमूद केले. काही कार्यालयांत समितीच स्थापन नाही, काही ठिकाणी ती केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात कार्यरत नाही. याशिवाय समिती सदस्यांना प्रशिक्षणाचा अभाव, वार्षिक अहवाल न सादर करणे आणि दर्शनी भागात माहिती फलक नसणे अशा बाबीही निदर्शनास आल्या आहेत.

IC Audit Report Guidelines : अंतर्गत समिती अहवालाचे निकष

ऑडिटदरम्यान प्रत्येक कार्यालयाकडून सविस्तर IC Audit Report तयार करण्यात येणार आहे. यामध्ये समितीची रचना, स्थापनेचा आदेश, प्राप्त व प्रलंबित तक्रारी, त्यावरील कार्यवाही, निकालांची अंमलबजावणी, वार्षिक अहवाल, जनजागृती उपक्रम आणि कार्यालयात लावलेले माहिती फलक यांचा समावेश असणार आहे.

समिती अपूर्ण किंवा अस्तित्वात नसल्यास तात्काळ स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

30 Days Compliance Deadline : 30 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सदर परीक्षण पूर्ण करून 30 दिवसांच्या आत अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे सादर करावा, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

या संदर्भात चाकणकर म्हणाल्या की, सर्व कार्यालयांमध्ये PoSH ऑडिट अनिवार्य करण्याची मागणी आयोगाने शासनाकडे केली होती. शासनाने 22 ऑगस्ट 2025 रोजी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेत शासन निर्णय जारी केला आहे. राज्यातील मोठ्या प्रमाणावर बाहेर पडणाऱ्या ‘वर्किंग वुमन फोर्स’ला सुरक्षित, निर्भय आणि पोषक वातावरण मिळते आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
1962 चा रणसंग्राम! फक्त अंगावरचे कपडेच घरी आले, देशासाठी प्राणाची आहुती देणारे अहिल्यानगरचे शहीद सोन्याबापू बोरुडे
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑगस्ट 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget