एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhajinagar News: अतिक्रमण कारवाईला विरोध करत अधिकाऱ्यांना अन् कर्मचाऱ्यांना शिवीगाळ; एमआयएमच्या14 नगरसेवकांसह 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्या विरोधीपक्ष नेत्यासह एमआयएमच्या14 नगरसेविक आणि नगरसेविकांच्या पतींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar News:  छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अतिक्रमण कारवाईला विरोध करणाऱ्या विरोधीपक्ष नेत्यासह एमआयएमच्या14 नगरसेविक आणि नगरसेविकांच्या पतींवर गुन्हा (Chhatrapati Sambhajinagar Crime News) दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज भागात अतिक्रमण हटाव मोहिमेदरम्यान विरोधीपक्षनेते समीर साजेद बिल्डर यांनी एमआयएमच्या (MIM) नगरसेवकांसह कारवाईला विरोध केला होता. तसेच कारवाई करण्याऱ्या पथकाला पिटाळून लावले होते. त्यामुळे महानगरपालिकेच्या महिला उप-आयुक्त सविता सोनवणे यांच्या तक्रारीवरून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एमआयएमच्या नगरसेवकांच्या 14 नगरसेवकांसह 40 ते 50 जणांविरुद्ध सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime News:  एमआयएम नगरसेवकांवर गंभीर आरोप

पथकातील अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली, धमकी दिली आणि धक्काबुक्कीही केली. ​'महानगरपालिका तुमच्या बापाची जहागीर नाही' अशा शब्दांत दमदाटी करून हातगाडी चालकांना पुन्हा अतिक्रमण करण्यासाठी भडकवले. तर ​कारवाईसाठी आलेले जेसीबी आणि ट्रक बळजबरीने तिथून हटवण्यास भाग पाडले आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केले. ​या सर्व कृत्याचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले, ज्यामुळे प्रशासकीय प्रतिमा मलीन केली. विकास कामास अडथळा केल्यास सदस्यत्व रद्द होवु शकते, अशी पुरेपुर माहीती असतानाही सर्व नगरसेवकांनी जाणीवपुर्वक बेकायदेशीर जमाव जमवुन सरकारी कामात अडथळा र्निमाण केला. असा गंभीर आरोप एमआयएम नगरसेवकांवर करण्यात आला आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime : मद्यधुंद तरुणांचा राडा; चक्क खिशातून बंदूक काढ हवेत गोळी झाडली

छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील थापटी तांडा येथे शनिवारी रात्री 11च्या सुमारास कुलस्वामिनी कला केंद्राबाहेर मद्यधुंद तरुणांनी चांगलाच धिंगाणा घातला. ​एका क्षुल्लक कारणावरून या मद्यधुंद लोकांनी रस्त्याने जाणाऱ्या रजापूरच्या एका तरुणाला गाठलं आणि त्याला बेदम मारहाण केली. पण हा राडा इथेच थांबला नाही. मारहाण करणाऱ्यांपैकी एकाने चक्क खिशातून बंदूक काढली आणि हवेत गोळी झाडली. गोळीबाराच्या या आवाजाने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. ​ही बातमी वाऱ्यासारखी रजापूर गावात पोहोचली आणि तब्बल 300 गावकऱ्यांचा जमाव कला केंद्रावर चालून आला. संतापलेल्या या जमावाने कला केंद्राचा लोखंडी दरवाजा अक्षरशः तोडून टाकला आणि आतमध्ये राडा सुरू केला. केंद्रातील फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल आणि विजेची उपकरणं जमावाने फोडून काढली. एवढंच नाही, तर पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 10 ते 12 गाड्यांच्या काचा फोडून लाखो रुपयांचं नुकसान केलं. या तुफान दगडफेकीत 3 ते 4 लोक जखमी झाले आहेत. ​ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा आतमध्ये डान्स बघण्यासाठी मोठी गर्दी होती. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोठी पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी तातडीने धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या रजापूर गावात तणावपूर्ण शांतता आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
Ulhasnagar Crime: ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
ऑन ड्युटी सफाई कामगाराची हत्या; धक्कादायक बातमी ऐकताच पत्नीची आत्महत्या, उल्हासनगरमध्ये खळबळ
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल
Beed Crime News: 'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
'तुला लय मस्ती आली' म्हणत भर बाजारात तरुणावर हल्ला, लोखंडी रॉडने बेदम मारहाण; परळीतील धक्कादायक घटना
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget