MHT CET PCB परीक्षेचा निकाल जाहीर, 14 विद्यार्थ्यांना मिळाले 100 पर्सेंटाइल गुण, एकूण निकाल 93.91 टक्के
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) गटाच्या परीक्षेचा निकाल (mht cet pcb 2025 result) जाहीर केला आहे.

MHT CET PCB Exam 2025 Result : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) गटाच्या परीक्षेचा निकाल (mht cet pcb 2025 result) जाहीर केला आहे. 9 ते 17 एप्रिल 2025 दरम्यान ही परीक्षा महाराष्ट्रातील 172 आणि राज्याबाहेरील 9 केंद्रांवर घेण्यात आली. या परीक्षेस 3 लाख 1 हजार 72विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2 लाख 82 हजार 734 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत 14 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. या तर परीक्षेचा निकाल 93.91 टक्के लागला आहे.
100 पर्सेंटाइल गुण मिळवलेल्या 14 विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध
दरम्यान, या परीक्षेत 14 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत, त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. या 100 पर्सेंटाइल गुण मिळवलेल्या 14 विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे, यामध्ये अर्ज क्रमांक, नाव आणि मोबाइल नंबर दिलेले आहेत. या यादीत हरी श्रीनिवास अंबारकर, श्रेया प्रसाद यादव, अंशिका भावेश शाह, अथर्व शिरीष हवाल, बढे सिद्धी मंजाबापू, विनीत विजयकुमार बोतुले, ओम अरुण आहेर, वैष्णवी सिद्धेश्वर लेंगरे, अपूर्वा प्रशांत कापडे, खंडेराज बालिराम वारकड, भक्ती मनीष मेन आणि कुरुडे आदिनाथ माधवराव यांचा समावेश आहे.
MHT CET 2025 (PCM गट) च्या परीक्षेत 22 विद्यार्थ्यांना 100 परसेंटाइल गुण
दरम्यान, काल MHT CET 2025 (PCM गट) चा निकाल लागला आहे. 16 जून रोजी अधिकृत वेबसाइट cetcell.mahacet.org वर जाहीर करण्यात आला आहे. या निकालामध्ये परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी एकूण 22 विद्यार्थ्यांना 100 परसेंटाइल गुण प्राप्त झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (PCM) गटातून परीक्षा दिली होती, त्या विद्यार्थ्यांसाठी हा निकाल आहे. तर, PCB गट (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) चा निकाल आज म्हणजेच 17 जून रोजी जाहीर झाला आहे. PCM गटाची परीक्षा 19 एप्रिल ते 5 मे 2025 पर्यंत आयोजित करण्यात आली होती. या गटात 4,64,263 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 4,22,863 उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले होते. त्यामध्ये, 22 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
कसा चेक कराल एमएचटी सीईटी पीसीबी परीक्षेचा निकाल?
सुरुवातीला https://cetcell.mahacet.org/ या वेबसाईटवर जा.
तिथे तुम्हाला MHT-CET 2025 Results असं दिसेल.
त्यानंतर तिथे तुम्हाला 'PCB Group' असं दिसेल, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा मेल आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन करा.
तिथे तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.
स्कोअरकार्डची प्रिंटही काढता येईल.
महत्वाच्या बातम्या:
MHT CET परीक्षेचा निकाल जाहीर; 22 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाईल; इथे पाहाता येईल गुणपत्रिका
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
























