एक्स्प्लोर
Advertisement
MHT-CET 2020 : सीईटीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना मुदतवाढ
सीईटी सेलमार्फत विविध 12 अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना शेवटची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 7 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ मिळाली आहे.
मुंबई : सीईटी परीक्षा 1 ते 15 ऑक्टोबर दरम्यान घेणार असल्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केल्यानंतर सीईटी सेल प्रशासन नियोजनाला लागले आहे. जे विद्यार्थी 2020 - 2021 च्या ऑनलाईन सीईटी परीक्षांकरिता या आधी अर्ज करू शकले नाहीत त्यांना सीईटी सेलकडून पुन्हा एकदा संधी देण्यात येणार आहे.
सीईटी सेलमार्फत विविध 12 अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या ऑनलाईन प्रवेश अर्ज करण्याच्या प्रक्रियेला 7 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ऑनलाईन अर्ज करण्याची विद्यार्थ्यांना ही शेवटची संधी असणार असल्याचे सीईटी सेलमार्फत सांगण्यात आले आहे.
या मुदतवाढीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी या आधी अर्ज सादर केले आहेत, ते उमेदवार नवीन अर्ज भरू शकणार आहेत. मात्र त्यांना आधीचे शुल्क परत मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवाय या मुदतवाढीमध्ये आधीच्या माहितीमध्ये बदल करण्याची किंवा केंद्र बदलण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध असणार नाही असेही सीईटी सेलकडून सांगण्यात आले आहे. तंत्र शिक्षण विभागाच्या 4 अभ्यासक्रमासाठी आणि उच्च शिक्षण विभागाच्या 8 अभ्यासक्रमांसाठी ही संधी उपलब्ध असणार आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रम परीक्षा यामध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्स्चर , कृषी अभ्यासक्रम, हॉटेल मॅनेजमेंट, लॉ अभ्यासक्रम या सारख्या अभ्यासक्रमाच्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षा CET परीक्षा घेण्यात येतात.
विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये समुपदेशन केंद्राची निर्मिती
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये एक आणि मोठ्या जिल्ह्यांमध्ये दोन समुपदेशन केंद्राची निर्मिती करण्यात यावी. समुपदेशन केंद्राच्या मदतीने संबंधित जिल्ह्यातील पालक आणि विद्यार्थ्यांच्या सर्व अडचणींचे समाधान करण्यात येईल, अशा सूचना उदय सामंत यांनी याआधीच दिल्या आहेत.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement