MHADA Exam : म्हाडाच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल, 7 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या परीक्षा आता 31 जानेवारीपासून
MHADA Exam : 31 जानेवारी, 2, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा घेण्यात येणार आहे.
MHADA Exam Latest Update : म्हाडाच्या भरती परीक्षेचं वेळापत्रक पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. 7 फेब्रुवारी पासुन सुरु होणा-या परिक्षा आता 31 जानेवापासून ऑनलाईन सुरु होणार आहे. 31 जानेवारी, 2, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा घेण्यात येणार आहे. 565 पदांसाठी ऑफलाईन होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे.
म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीवर सोपवण्यात आली आहे. टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे. याआधी जीए सॉफ्टवेअर कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी होती. पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं गोपनीयतेचा भंग करून पेपर फोडण्याचा कट रचल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळं म्हाडाकडून ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.
ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र (hall Ticket ) डाऊनलोड करण्याकरिता म्हाडाच्या https.mhada.gov. in या संकेतस्थळावर 22 जानेवारी पासून https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/31659/75245/login.html लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सोयीची ठरावी याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर 26 जानेवारी पासून मॉक लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211 या मॉक लिंकद्वारे उमेदवारांना परीक्षेचे साधारण स्वरूप समजून घेता येणार असून ऑनलाईन परीक्षा कशी द्यावी याबाबत माहिती देण्यात आली आहे.
म्हाडाची 12 डिसेंबरला होणारी परीक्षा व त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकलली. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मध्यरात्री ट्वीट करत ही परीक्षा पुढे ढकलली होती. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली असून याबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. म्हाडाची परीक्षा सकाळच्या सत्रात 50 हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात 56 हजार उमेदवार परीक्षा देणार होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- TET परीक्षा घोटाळा प्रकरण : दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी घबाड, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त
- Mhada Paper Leak Scam : पेपरफुटी प्रकरणात भाजयुमोचा नेता संजय सानपला अटक
- MHADA Paper Leak : महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha