एक्स्प्लोर
Advertisement
राज्यातील माथाडी कामगारांचा एक दिवसाचा लाक्षणिक संप
राज्यातील माथाडी कामगारांनी आज एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपामुळे नवी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, लातूर या बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प आहेत.
मुंबई : राज्यातील माथाडी कामगारांनी आज एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपामुळे नवी मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सांगली, लातूर या बाजार समित्यांचे व्यवहार ठप्प आहेत.
तिकडे पुण्यातही माथाडी कामगारांनी कामगारनेते बाबा आढावांच्या नेतत्त्वात आंदोलन केलं. यावेळी अलका टॉकीज चौकात माथाडी कामगारांनी मोठी गर्दी केली होती. सध्याचा माथाडी कामगार कायदा फायद्याचा आहे, तो बदलण्याचं सरकारचं षडयंत्र असल्याचा दावा यावेळी बाबा आढाव यांनी केला.
कंपनी आणि उद्योगधंद्यामध्ये सध्या माथाडी कामगार कायदा लागू आहे. या कायद्यामुळे माथाडी कामगारांना काम मिळतं आणि संरक्षणही मिळतं, पण आता सरकार हा कायदा बदलत आहे, असा दावा कामगारांच्या वतीनं कऱण्यात आला. त्याविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement