एक्स्प्लोर
सोलापुरात मराठा समाजाचं मुख्यमंत्र्यांविरोधात गाजर दाखवा आंदोलन

सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात सोलापूरमध्ये मराठा समाजाने गाजर दाखवा आंदोलन केलं. मराठा आरक्षणाबाबतीत सरकारने फक्त आश्वासनाचं गाजर दाखविल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. महापालिकेच्या प्रचारासाठी सोलापुरात मुख्यमंत्र्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी चार हुतात्मा चौकात आंदोलन करण्यात आलं. फोटो काढा आणि बाजूला बसा, या मुख्यमंत्र्यांच्या नांदेडच्या सभेतील वक्तव्याचा निषेधही आंदोलकांनी केला. नांदेडमधील मुख्यमंत्र्यांच्या सभेत घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यावेळी फोटो काढा आणि बाजूला बसा, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.
संबंधित बातमी : नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेत मराठा आरक्षणासाठी घोषणाबाजी
आणखी वाचा























