Sanjay Gaikwad : शिवसैनिकाला चॅलेंज करू नका; भुजबळांना शिवीगाळ प्रकरणानंतर संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया; म्हणाले....
Maharashtra Political News : भुजबळ आणि मी बाळासाहेबांच्या एकाच तालमीतले आहोत. त्यामुळे त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये, असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी मंत्री छगन भुजबळांना दिला आहे.
Akola News अकोला : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी मंत्री छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) शिवीगाळ केल्याची कथित ऑडिओ क्लिप वायरल झाली होती. या कथित शिवीगाळ ऑडिओ क्लिपनंतर मंत्री छगन भुजबळांनी गायकवाड यांना प्रत्युत्तर देत टीकास्त्र डागले होते. आता त्यांच्या या टीकेला संजय गायकवाड यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
भुजबळ आणि मी बाळासाहेबांच्या एकाच तालमीतले आहोत. त्यामुळे त्यांनी शिवसैनिकाला चॅलेंज करू नये. आम्ही काही भुजबळांचा वैयक्तिक द्वेष करत नाही. तुम्ही राज्यातील 57 लाख लोकांना ओबीसीच आरक्षण (Maratha Reservation) मिळताना तुम्ही त्याला विरोध करत असाल, तर आमचा देखील त्याला विरोध कायम असेल असल्याचे आमदार संजय गायकवाड म्हणाले.
मराठ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नये
शेवटी आम्ही कोण आहोत, आम्ही सुद्धा विदर्भात मराठा असून देखील ओबीसीमध्ये मोडतो. त्यामुळे तुम्ही निषेध कोणाचा करत आहात. आमचे म्हणणे आहे की, ज्या गोरगरीब मराठ्यांना गेल्या 70 वर्षात न्याय मिळाला नाही, जर आता तो न्याय मिळत असेल तर, त्यांच्या तोंडचा घास कोणीही हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू नये. आमचा व्यक्तिगत कुणालाही विरोध नाही. मात्र मराठा आरक्षणाला कुणाचा विरोध असल्याचे कारण नाही. आज राज्यात 57 लाख लोकांना ओबीसीच आरक्षण मिळत आहे. मराठा आरक्षणाचा मार्ग या लढ्यातून मोकळा झाला आहे. छगन भुजबळांनी जर या आरक्षणाला विरोध केला तर आम्ही देखील तशीच भूमिका घेऊ, असे देखील आमदार संजय गायकवाड म्हणाले.
काय म्हणाले होते छगन भुजबळ?
संजय गायकवाड यांच्यावर छगन भुजबळ म्हणाले की, जी भाषा त्यांनी वापरली ती काही योग्य नाही. मी पण ते ऐकले आणि वाचले. ठीक आहे थोड वाईट वाटलं. माझा राजीनामा मागण्याचा अधिकार हा सामान्य जनतेला आहे. त्यामुळे तो आमदारांनादेखील आहे. याबाबत माझ काहीही म्हणणे नाही. ते आताही शिवसेनेचे आहे, म्हणजे पूर्वीही शिवसेनेतच असणार, मला त्यांना सांगायचं की, ज्या शिवसेना इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात, त्या इन्स्टिट्यूटमध्ये मी सिनियर प्रोफेसर होतो, असा टोला छगन भुजबळांना संजय गायकवाड यांना लगावला. नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
इतर महत्वाच्या बातम्या