एक्स्प्लोर

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ बार्शीत 3 दिवसांपासून आमरण उपोषण सुरु, सरकारच्या निषेधार्थ केलं वैकुंठ स्नान

मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या समर्थनार्थ बार्शीत आमरण उपोषण सुरु करण्यात आलं आहे. आनंद काशीद यांनी गेल्या 3 दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण सुरु केलं आहे.

Maratha Reservation Agitation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ बार्शीत आमरण उपोषण सुरु करण्यात आलं आहे. बार्शी येथील आंदोलक आनंद काशीद यांनी गेल्या 3 दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आमरण उपोषण सुरु केलं आहे. बार्शी तहसील कार्यालयासमोर हे अनोखे आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. उपोषणस्थळी आनंद काशीद आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारच्या निषेधार्थ वैकुंठ स्नान करत केले आंदोलन.

मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण सुरु केले आहे. त्यांना पाठिंबा म्हणून बार्शी तहसील कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसापासून सकल मराठा समाजाकडून आमरण उपोषण सुरु आहे. 

चंद्र, सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणार : मनोज जरांगे

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासह इतर आठ मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केलं आहे. शनिवारपासून (दि. 25) मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे यांचे हे सातवे आमरण उपोषण असणार आहे. मी समाजासाठी लढत आहे, स्वतःसाठी नाही. चंद्र, सूर्य असेपर्यंत मी लढतच राहणार आहे. समाजाला कधीही सोडू शकत नाही. मुख्यमंत्री फडणवीस आम्हाला आरक्षण देणार आहेत. फडणवीस यांना मराठे मोठे व्हावे वाटतात की नाही ते आता उघड होणार आहे. मराठ्यांशी बेईमानी करणे त्यांना महाग पडणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. तसेच ज्यांना उपोषणात सहभागी व्हायचे आहे त्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा बांधवांना केले आहे.  

मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

1) महाराष्ट्रातील मराठा समाज हा कुणबी आणि मराठा एकच आहे. म्हणून महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे. 

2) हैदराबाद गॅझेटिअर, सातारा संस्थान गॅझेटिअर, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेटियर लागू करून त्यांची तात्काळ अंमलबजावणी करावी. 

3) न्यायमूर्ती शिंदे समितीने राज्यभर तातडीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू करावे. शिंदे समितीला एक वर्ष मुदतवाढ द्यावी. 

4) सगे-सोयरे अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करावी. आम्ही दिलेल्या व्याख्येप्रमाणे  सगे-सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी. 

5) महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस सरसकट सर्वांच्याच मागे घेण्यात याव्यात. सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे. 

6) सरकारने 10 टक्के एसईबीसी आरक्षण लागू केले आणि मराठा समाजाचे ईडब्ल्यूएस आरक्षण रद्द केले ते ईडब्लूएस आरक्षण पुन्हा सुरू करावे. 

7) कुणबी नोंदी शोधण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी, कुणबी प्रमाणपत्र व्हॅलिडीटी देण्यासाठी, जिल्हा व तालुकास्तरावर कक्ष स्थापन केले होते ते कक्ष पुन्हा तात्काळ सुरू करण्यात यावे. वंशावळ समिती, मोडी लिपी समिती व सर्व भाषेच्या अभ्यासकांची मोठी टीम तात्काळ नोंदी शोधण्यासाठी तयार करण्यात यावी. 

8) महाराष्ट्रातील मराठा समाज हा शेती करणारा वर्ग म्हणजेच कुणबी आहे. ओबीसी क्रमांक 83 वर कुणबी आहे आणि 2004 सालचा अध्यादेश आहे. मराठ्यांची पोटजात-उपजात कुणबी आहे. म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे. हा सुधारित जीआर काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.

महत्वाच्या बातम्या:

Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

निवडणूक आयोगाच्या बेईमानीमुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत, नाना पटोलेंची जहरी टीका
निवडणूक आयोगाच्या बेईमानीमुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झालेत, नाना पटोलेंची जहरी टीका
धक्क्दायक! डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू, चालकाला अटक 
धक्क्दायक! डंपर चालकाने दुचाकीस्वरासह एकाला चिरडलं, दोघांचा जागीच मृत्यू, चालकाला अटक 
धक्कादायक! पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं वैतरणा धरणात दोन तरुण बुडाले, शोधकार्य सुरु 
धक्कादायक! पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्यानं वैतरणा धरणात दोन तरुण बुडाले, शोधकार्य सुरु 
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा

व्हिडीओ

Yavatmal Water Issue : पाण्यासाठी वणवण, लालफितीची अडचण Special Report
Ashok Kharat Case : कारनामे नवीन कोट्यवधींची जमीन, कल्पना खरात अजूनही फरार Special Report
Sangli Old Age Home : सांगलीत उभी राहिली ज्येष्ठांसाठी आनंदशाळा, सर्वत्र कौतुक Special Report
US Talks Fail : टॉक्स वाया, सरसावल्या बाह्या, वाटाघाटीत अपयश, पुन्हा शाब्दिक हल्ले Special Report
Pakistan On US Iran Talks : बेगानी दलाली मे पाकिस्तान दिवाना Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
मुख्यमंत्र्यांनी घेतलं अंत्यदर्शन, राज ठाकरे, रामदास आठवलेंसह बॉलिवूड सेलिब्रिटीही आशाताईंच्या निवासस्थानी
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
Video: जालन्यात काँग्रेसमध्ये राडा, महिला पदाधिकाऱ्याची आक्षेपार्ह टीका; जिल्हाध्यक्षांकडून पायातील बूट काढण्याचा प्रयत्न
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
धक्कादायक! पंढरपुरात तरुणीवर ॲसिड हल्ला, हल्लेखोर फरार; पीडित मातेची भावनिक साद, पोलिसांकडून शोध सुरू
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 एप्रिल 2026 | रविवार
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
शहाजीबापूंचा तानाजी सावंतांना सल्ला, शिवसेनेत प्रवेश करताच भगिरथ भालकेंचा जयकुमार गोरेंवर निशाणा
Iran War Live Update: आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
आता चेंडू अमेरिकेच्या कोर्टात! अमेरिकेसोबत फेस टू फेस तब्बल 21 तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? याची देही याचि डोळा साक्षीदार असणाऱ्या अन् टीम लीड करणाऱ्या इराणी संसद अध्यक्षांच पहिलं निवेदन
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं...; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली
BLOG : आईये मेहेरबान ते बुगडी माझी सांडली गं..; स्वर चांदणे शिंपीत निराश करून गेलेली "आशा''
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
'नितीश'पर्वाचा राजकीय अस्त होताच बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? शिवराज मामांकडे मोठी जबाबदारी
Embed widget