Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
20 जानेवारीला झालेल्या सुनावणीत व्हर्च्युअलऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची मागणी सर्व पक्षकारांच्यावतीनं करण्यात आली होती. मात्र, आज देखील ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी होणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वपूर्ण दिवस आहे. सर्वोच्च न्यायालयात आज मराठा आरक्षणाप्रकरणी पाच न्यायमूर्तींच्या बेंचसमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील स्थगिती उठणार की कायम राहणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 20 जानेवारीला झालेल्या सुनावणीत व्हर्च्युअलऐवजी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याची मागणी सर्व पक्षकारांच्यावतीनं करण्यात आली होती. मात्र, आज देखील ऑनलाईन पद्धतीनं सुनावणी होणार असल्याची माहिती आहे. सुनावणीला सकाळी साडे दहा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुरुवात होणार आहे.
न्यायमूर्ती अशोक भूषण जे मराठा आरक्षण प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या पाच सदस्यीय खंडपीठाचं नेतृत्त्व करत आहेत. आम्ही सहा ते सात वकील वेगवेगळ्या ठिकाणी आहोत. त्यामुळे आम्हाला संवादामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हे प्रकरण किचकट आहे. त्यामुळे याप्रकरणी प्रत्यक्ष सुनावणी घेण्यात यावी." तसेच "याप्रकरणात अंतरिम स्थगिती राज्य सरकारच्या विरोधात आहे, मात्र त्याच्या मेरिटमध्ये न पडता आम्ही ही मागणी करत आहोत." असं रोहतगी यांनी खंडपीठाला सांगितले होते. राज्य सरकारची बाजू मांडणारे दुसरे वकील कपिल सिब्बल यांनीही न्यायालयात युक्तीवाद करताना आपण मुकूल रोहतगी यांच्या मताशी सहमत असल्याचं सांगितंल होतं.