Maharashtra Vidhimandal Adhiveshan LIVE: शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची मागणी
Maharashtra Vidhimandal Adhiveshan Breaking News Live Updates: आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, मराठा ओबीसी वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी गोंधळ हे मुद्द्यांवर सरकारची सत्वपरीक्षा...
LIVE
Background
Maharashtra Vidhimandal Adhiveshan Breaking News Live Updates: आजपासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन, शेतकरी कर्जमाफी, मराठा ओबीसी वाद, पुणे ड्रग्ज, सीईटी गोंधळ हे मुद्द्यांवर सरकारची सत्वपरीक्षा...
1. आजपासून राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन, मुंबईतील विधान भवनात एकूण 13 दिवस चालणार कामकाज,अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या आणि आर्थिक पाहणी अहवाल होणार सादर
2. महायुती सरकारचं हे विधानसभा निवडणुकीपूर्वीचं शेवटचं अधिवेशन असणार,त्यामुळे विरोधक सुद्धा या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे उपस्थित करून सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत
3. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचा कार्यक्रम, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित
4. राज्य सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार, पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर बहिष्कार
5. विरोधकांनी प्रथेप्रमाणं चहापानावर बहिष्कार टाकला, उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला, पाठ्यपुस्तकात खोटं बोल पण रेटून बोल हा विरोधकांचा पवित्रा, फडणवीसांची टीका
Devendra Fadnavis And Uddhav Thackeray Meet: दरेकरांना पाहून उद्धव ठाकरे म्हणाले, याला लिफ्टमधून पहिले बाहेर काढा!
Devendra Fadnavis And Uddhav Thackeray Meet: राजकारणात आपण राजकीय शत्रू असू, पण सदासर्वकाळ शत्रू नसतो. लिफ्टमध्ये मी शिरत असताना सन्माननीय देवेंद्र आणि उद्धवजी आले, मिलिंद नार्वेकरही सोबत होते. आम्ही विधानपरिषदेच्या सभागृहाकडे चाललो हो... लिफ्ट सुरु झाल्यानंतर कोणीतरी बोललं, 'आपण दोघं एकत्र आहात, बरं वाटतं'. त्यावर उद्धवजी ठाकरे यांनी माझ्याकडे बोट दाखवून फडणवीसांना म्हणाले, 'याला पहिले बाहेर काढा'. तेव्हा मी बोललो की, 'तुमचं अजून समाधान झालं नाही का मी शिवसेनेतून बाहेर जाऊन. माझी बाहेर जायची तयारी आहे. तुम्ही होता का एकत्र? बोलता तसं करा'. त्यानंतर लिफ्टमध्ये हास्यविनोद झाला. उद्धवजी बोलतात तसं नाहीये, त्यांच्या पोटात एक ओठात एक, आम्ही वर गेल्यावर त्यांच्या पोटातील उत्तर मिळालं.
Uddhav Thackeray: लोढांच्या टाॅवरमध्ये ५० टक्के मराठी बांधवांना आरक्षण द्यायला हवे- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray: मराठी माणसांनी रक्त सांडून मुंबई मिळवली आहे. त्यांना घर मिळालीच पाहिजेत, आम्ही यासाठी पू्र्वीपासून आग्रही होतो. आता जे सरकारमध्ये मंत्री आहेत ते विकासक आहेत. लोढांच्या टाॅवरमध्ये ५० टक्के मराठी बांधवांना आरक्षण द्यायला हवे. त्यांनी त्यांचा टाॅवरमध्ये घेऊन दाखवावं, बसतात ना महापालिकेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Uddhav Thackeray: व्हॉट्सअॅप इंडस्ट्री कोणाची?; ठाकरेंचा सवाल
Uddhav Thackeray: उद्या घोषणा करण्याआधी मागे केलेल्या घोषणांची अंमलबजावणी किती झाली याबाबत श्वेतपत्रिक काढा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. NEET प्रकरण समोर आले आहे. व्हॉट्सअॅप इंडस्ट्री कोणाची आहे?, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.
Uddhav Thackeray: लिफ्टला कान नसतात, त्यामुळे यापुढे गुप्त बैठक तिथेच करु- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray: माझा आणि देवेंद्र फडणवीसांचा लिफ्टने प्रवास हा योगायोग होता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच लिफ्टला कान नसतात, त्यामुळे यापुढे गुप्त बैठक तिथेच करु, अशी मिश्किल प्रतिक्रिया देखील उद्धव ठाकरेंनी दिली.
Uddhav Thackeray: शेतकऱ्यांची तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची मागणी
Uddhav Thackeray: लाडक्या बहिण योजनेचं स्वागत करतो, मात्र लाडक्या भावालाही मदत करा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली. मध्यप्रदेशच्या धर्तीवर लाडकी बहिण योजना आणत आहे. मात्र मुलं मुली भेदभाव करू नका, लाडक्या भाऊंना पण मदत करा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पोलीस भरतीत तरुणाना राहण्यास व्यवस्था नाही सोई सुविधा नाही. डब्बल इंजिन सरकारने आतापर्यंत अनेक वाफा सोडल्या आहेत.