Rajesh Tope On Lockdown : राज्यात लॉकडाऊन कधी लागणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती
Rajesh Tope On Lockdown : कोरानाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी एका महत्त्वाच्या निर्णयाची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
![Rajesh Tope On Lockdown : राज्यात लॉकडाऊन कधी लागणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती Maharashtra Rajesh Tope Reaction on Third On Lockdown Rajesh Tope On Lockdown : राज्यात लॉकडाऊन कधी लागणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/25/e6adc87a5e6916df43090f96a3a005ed_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालना : राज्यात 800 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली तरच लॉकडाऊन केला जाईल अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली होती, आता मात्र ओमायक्रॉनचा प्रसार असाच वाढत राहिला तर हीच मर्यादा 800 मेट्रिक टन वरुन 500 मेट्रिक टन वर आणावी लागेल आणि त्यानंतरच लॉकडाऊन केला जाईल अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
नागरिकांनी निर्बंधाचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान यापूर्वी 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागला तर लॉकडाऊन आम्ही ठरवलं होतं. पण राज्यातील ओमायक्रॉनची स्थिती पाहता ही मर्यादा 500 टनावर आणावी लागेल. दरम्यान सध्या निर्बंध लावण्याचा आमचा हेतू नाही मात्र काळजीपोटी हे प्रतिबंधात्मक उपाय करावे लागतील असेही टोपे म्हणाले.
परीक्षा OMR पद्धतीने होणार नाही : राजेश टोपे
आरोग्य विभागाच्या परीक्षा सबंधित पुढील काही दिवसातच पोलिसांच्या रिपोर्टनंतर गट क आणि गट ड या दोन्ही परीक्षा संबंधी निर्णय घेण्यात येणार असून भविष्यात परीक्षा पद्धतीमध्ये आमूलाग्र बदल करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. यापुढे राज्यात परीक्षा OMR पद्धतीने होणार नसून ती कोणत्याही ती घेण्यासाठी कोणत्याही खाजगी संस्थेकडे काम सोपवले जाणार नसल्याची देखील माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात 1485 नव्या कोरोनाबाधितांची भर
कोरोनाबाधितांच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1485 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 796 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात आतापर्यंत 65 लाख 2 हजार 39 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.68 टक्के आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
देशात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत वाढ, जाणून घ्या कोणत्या राज्यात काय आहे निर्बंध!
अहमदनगर जिल्ह्यात नो वॅक्सिन नो एन्ट्री! ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर प्रशासन सतर्क
कोरोना काळात जनतेची मदत करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानायला पुण्यात आलोय : आदित्य ठाकरे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)