(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Rain : आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर विदर्भात यलो अलर्ट; वाचा हवामान विभागाचा अंदाज
सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत.
Maharashtra Rain : सध्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसानं (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही भागात पूरस्थिती निर्माण झाल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह उपनगर ठाणे पालघर परिसरात जोरदार पावसामुळं वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच राज्यातील कोकणसह विर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. पाहुयात आज कोणत्या विभागात कोणता अलर्ट देण्यात आला आहे.
या भागात पावसाचा अंदाज
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आज कोकणात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर ठाणे जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. तसेच गोंदिया जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. त्याचबरोबर सिंदुधुर्ग, कोल्हापूर, विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस
मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईत आजही अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असून, वायव्य दिशेला तिची हालचाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान खात्यानं वर्तवली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळं वसमत शहराजवळील तलाव फुटल्याने शहरात पाणीच पाणी झालं आहे. तथागत नगर आणि जुना गुरुद्वार एरियामध्ये पाणी शिरले आहे. तलाव फुटल्याने जवळपासच्या नागरिकांची तारांबळ उडाली आहे. तर पाणी घरात शिरल्याने घरातील संसार उपयोगी साहित्य त्याचबरोबर अन्नधान्य पाण्यात भिजले आहे. मुसळधार पावसामुळं वसमत शहरात पाणीच पाणी झाली आहे. आजही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: