एक्स्प्लोर

Shivsena Symbol: शिंदे गटाकडून पक्षासाठी तीन नावांचा पर्याय, 'ही' आहेत नावं

Shivsena Symbol: शिवसेना शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्षासाठी तीन नावांचा पर्याय दिला आहे. या तिन्ही नावांमध्ये त्यांनी बाळासाहेबांच्या नावाचा समावेश केला आहे.

Shivsena Symbol: शिंदे गटाने पक्षासाठी निवडणूक आयोगाकडे तीन नावांचा पर्याय दिला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या तिन्ही नावांमध्ये बाळासाहेब यांचा उल्लेख आहे. त्यामुळे निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना हे मुख्य नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवल्यानंतर पर्यायी नावांचा प्रस्ताव सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाने आज दुपारी एक वाजेपर्यंतची मुदत ठाकरे आणि शिंदे गटाला दिली होती.

निवडणूक आयोगाला शिंदे गटाने सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन  पर्याय देण्यात आले आहेत. यापैकी शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाचा प्रस्ताव ठाकरे गटानेदेखील दिला आहे. त्यामुळे  शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निवडणूक आयोग रद्द करण्याची अधिक शक्यता आहे. शिंदे गटाने बंड केल्यानंतर आम्हीच खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावा करण्यात येत होता. त्याचे प्रतिबिंब शिंदे गटाने दिलेल्या नावाच्या पर्यायात दिसून आले आहे. आता, निवडणूक आयोग कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

चिन्हांसाठी कट-कटशह

ठाकरे आणि शिंदे गटात डाव-प्रतिडाव रचला जात आहे. ठाकरे गटाने पर्यायी तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय दिला होता. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हा पर्याय दिला आहे. तर, शिंदे गटानेदेखील उगवता सूर्य आणि त्रिशुळ या चिन्हांचा पर्याय दिला आहे. शिंदे गटाने 'गदा' या चिन्हाचा तिसरा पर्याय दिला आहे.

ठाकरे गटांकडून तीन चिन्हांचा पर्याय

शिवसेना ठाकरे गटांकडून निवडणूक आयोगाला तीन निवडणूक चिन्हांचा पर्याय देण्यात आला. यामध्ये त्रिशुळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल असे तीन पर्याय देण्यात आले आहेत. तर, पक्षाच्या नावांसाठी शिवसेना-बाळासाहेब ठाकरे, शिवसेना-बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असे पर्याय देण्यात आले आहेत.

ठाकरे गटाकडून दिल्ली हायकोर्टात याचिका

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवण्याच्या आदेशाविरोधात ठाकरे गटाने दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. शिवसेना आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाने कागदपत्रे मागितली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंची कागदपत्रे तपासल्यानंतर  शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले. त्याशिवाय, शिवसेना हे मूळ नाव वापरण्यासही मनाई केली आहे. निवडणूक आयोगाने योग्य प्रकारे सुनावणी केली नसल्याचा दावा करत ठाकरे गटाने ही याचिका दाखल केली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Jalgaon Vidhan Parishad Election 2026: जळगावात भाजपमध्ये अंतर्गत कलह; नंदकिशोर महाजनांच्या उमेदवारीवरून गिरीश महाजन अन् रक्षा खडसे यांच्यात जुंपली, नेमकं काय घडलं?
जळगावात भाजपमध्ये अंतर्गत कलह; नंदकिशोर महाजनांच्या उमेदवारीवरून गिरीश महाजन अन् रक्षा खडसे यांच्यात जुंपली, नेमकं काय घडलं?
Amravati Vidhan Parishad Election 2026: अर्ज अवैध ठरवताना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना 'मिरगी' आली होती का? बाजोरिया पिता-पुत्रांनी पुरावे समोर ठेवून केले गंभीर आरोप; म्हणाले...
अर्ज अवैध ठरवताना अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांना 'मिरगी' आली होती का? बाजोरिया पिता-पुत्रांनी पुरावे समोर ठेवून केले गंभीर आरोप; म्हणाले...
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला

व्हिडीओ

America Iran Agreement : कसा आहे शांती करार? लेबनॉनसह सर्व आघाड्यावर कायमची शस्त्रसंधी
Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump on Strait of Hormuz : होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार? डोनाल्ड ट्रम्प यांनीच दिली अपडेट, शांतता कराराच्या घोषणेनंतर दिवस सांगितला...
अखेर ट्रम्प यांनी टायमिंग साधलं, बड्डेच्या दिवशीच शांतता कराराची घोषणा, होर्मुझची सामुद्रधुनी कधी सुरु होणार?
Bhimashankar Temple: भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी आजपासून खुले, 5 नवीन नियम लागू, एका दिवशी फक्त इतक्याच भक्तांना प्रवेश
Share Market : अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांतता करार, सेन्सेक्स निफ्टीत तुफान तेजीचा अंदाज, जपान-दक्षिण कोरियातून गुड न्यूज
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिका- इराण शांतता कराराची घोषणा,  क्रूड ऑईलचे दर गडगडले, आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठी अपडेट
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Maharashtra Live blog updates: मान्सून लांबल्याने शेतकरी चिंतेत, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या
Urmila Matondkar Ex-Husband Mohsin Akhtar Married Again: घटस्फोटानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या एक्स-हसबंडनं पुन्हा थाटला संसार; दुसऱ्या पत्नीसोबत सुखी संसाराची सुरुवात PHOTOs
घटस्फोटानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरच्या एक्स-हसबंडनं पुन्हा थाटला संसार; दुसऱ्या पत्नीसोबत सुखी संसाराची सुरुवात PHOTOs
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Embed widget