Rohit Sharma, Rarshid Khan : सेनापती लढले अन् सोनेरी इतिहास रचला! रोहित शर्मा अन् राशिद खानचा एकाच दिवसात ऑस्ट्रेलियावर वर्मी घाव
Rohit Sharma, Rarshid Khan : राशिद खानने अफगाणिस्तानसाठी केलेली कामगिरी आणि रोहित शर्माने टीम इंडियासाठी केलेली कामगिरी आपापल्या संघांना सेमीफायनलमध्ये नेलं आहे.
Rohit Sharma, Rarshid Khan : टीम इंडियाने सोमवारी एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या फायनलमधील पराभवाचा बदला घेतला. वेस्ट इंडिजच्या सेंट लुसिया स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताने 205 धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव 181 धावांवर रोखला गेला. कांगारूंचा 24 धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा विजयाचा शिल्पकार कॅप्टन रोहित शर्मा राहिला. उपांत्य फेरीच्या लढतीत करो वा मरोच्या स्थितीत पोहोचलेल्या अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेशच्या लढतीत रोमहर्षक विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. अफगाण विजयातही कॅप्टन राशीद खान शिल्पकार ठरला. त्यामुळे दोन्ही संघांचे कॅप्टन विजयाचे शिल्पकार ठरले.
RASHID KHAN, YOU FREAKING LEGEND. pic.twitter.com/EqxWBFlcoy
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 25, 2024
राशिद खानने अफगाणिस्तानसाठी केलेली कामगिरी आणि रोहित शर्माने टीम इंडियासाठी केलेली कामगिरी आपापल्या संघांना सेमीफायनलमध्ये नेलं आहे. त्यामुळे सेनापती लढल्यानंतर सांघिक कामगिरी कशी उंचावते, याचा दाखला पुन्हा एकदा मिळाला आहे.
टीम इंडियाच्या विजयात आधी रोहितची झंझावाती फलंदाजी, नंतर बुमराह आणि कुलदीपची अप्रतिम गोलंदाजी, अक्षर पटेलचा झेल निर्णायक ठरला. ट्रॅव्हिस हेड; जोपर्यंत तो क्रीजवर होता तोपर्यंत त्याने भारतीय कॅम्पला सुटकेचा नि:श्वास सोडू दिला नाही, पण स्विंग होत असलेल्या रोमहर्षक सामन्यात भारताने अखेर विजय मिळवला. 19 नोव्हेंबर 2023 रोजी एकदिवसीय विश्वचषक फायनलपूर्वी पॅट कमिन्सने सव्वा लाखांहून अधिक भारतीय क्रिकेट चाहत्यांना गप्प बसवण्यापेक्षा समाधान दुसरे काहीही समाधान नसल्याचे म्हटले होते. त्याचा बदलाही या निमित्ताने पूर्ण झाला आहे. फायनल ऑस्ट्रेलियाने जिंकली होती.
Rashid Khan said "Brian Lara was the only analyst who name Afghanistan in his top 4 teams. We met him and told him we won't let him down and we did it" ❤️❤️❤️#tapmad #HojaoADFree #T20WorldCup pic.twitter.com/cTGGtPe9ON
— Farid Khan (@_FaridKhan) June 25, 2024
241 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने 137 धावा करत सामना एकतर्फी जिंकला. ट्रॅव्हिस हेड आजही उभा होता. तो धावाही काढत होता, जोपर्यंत तो क्रीजवर होता तोपर्यंत भारताच्या विजयाबद्दल कोणी बोलत नव्हते, पण टीम इंडियाच्या मनात विजय होता, पराभव नव्हता आणि रोहित शर्माचा संघ जिंकला. कर्णधार रोहित शर्माच्या दमदार फलंदाजीने भारताच्या विजयाचा पाया रचला गेला. रोहितने 224 च्या स्ट्राईक रेटने 92 धावा केल्या. 8 षटकार आणि 7 चौकार मारले. एकेकाळी त्याचा स्ट्राईक रेट 300 च्या पुढे गेला होता. रोहितने या विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावत 19 चेंडूत 50 धावा केल्या. वेगवान शतक हुकले. पण रोहित जोपर्यंत क्रीजवर होता तोपर्यंत तो थांबला नाही. त्याच्या खेळीमुळे संघाची धावसंख्या 200 पार झाली आणि ऑस्ट्रेलियावर मानसिक दबाव निर्माण झाला.
इतर महत्वाच्या बातम्या