एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election 2024: दिल्लीत फडणवीस-बावनकुळेंची नड्डांसोबत खलबतं, विधानपरिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा, मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच

Maharashtra Politics: भाजपच्या दिल्लीतील बैठकीत विधानपरिषद निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांची चर्चा. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही येत्या काही दिवसांमध्ये पार पडू शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

नवी दिल्ली: राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणूक आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी रात्री दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. या बैठकीत विधानपरिषदेच्या जागांवरील (VidhanParishad Election 2024) उमेदवारांबाबत चर्चा झाली. राज्यातील विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला निवडणूक होणार आहे. भाजप (BJP) पाच जागांवर उमेदवार उभे करणार आहे. मात्र, यासाठी भाजपमधील 35 जण इच्छूक उमेदवार आहेत. त्यामुळे कोणत्या उमेदवारांची निवड करायची, हा पेच भाजप नेतृ्त्त्वासमोर आहे. यादृष्टीने दिल्लीतील बैठकीत फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केल्याचे समजते. 

विधानपरिषदेच्या उमेदवारांची निवड करताना भाजपकडून काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. ज्या उमेदवारांमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो किंवा जे उमेदवार विधानसभेला प्रभाव टाकू शकतात,  अशांनाच भाजपकडून संधी दिली जाण्याची शक्यता आहे.

येत्या दोन ते तीन दिवसांत भाजप आपल्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेसोबतच मंत्रिमंडळ विस्तारावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील अचानक दिल्लीत पोहोचले होते. दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची गुप्तपणे भेट घेतल्याचे सांगितले जाते. उभय नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसोबत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची शक्यता आहे.  

राज्यात येत्या दोन-तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार

महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दिल्लीवारीमुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुती सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार करताना चांगली कामगिरी न केलेल्या मंत्र्यांना डच्चूही दिला जाऊ शकतो. तर भाजपकडून तरुण चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. यावेळी शिंदे  गट आणि अजितदादा गटाकडून कोणत्या आमदारांना मंत्रीपदाची संधी दिली जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. याशिवाय,गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामंडळाच्या नियुक्त्याही यावेळी केल्या जातील, अशी चर्चा आहे.

नरेंद्र पाटलांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याची मागणी

माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना विधानपरिषद सदस्य म्हणून घेण्यासाठी माथाडी कामगारांचा आग्रह. त्यासाठी माथाडी कामगारांचे शिष्टमंडळ आज सकाळी ११ वाजता सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहे. 

आणखी वाचा

राज्यात पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार? खराब कामगिरी केलेल्या मंत्र्यांना डच्चू, भाजप तरुण चेहऱ्यांना संधी देणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vinod Kambli Plays Cricket : भारताची जर्सी, हातात क्रिकेट बॅट; हॉस्पिटलमध्ये कांबळीचे चौकार-षटकार!Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!Jitendra Awhad on Beed Crime : बीड प्रकरणातील आका म्हणजे मुंडे! जितेंद्र आव्हाड आता स्पष्टच बोललेLai Bhari Award 2024 : सुपर डुपर डान्स ते खतरनाक शायरी : लय भारी पुरस्कार 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah :  जसप्रीत बुमराहचा सन्मान, 2024 च्या ऑस्ट्रेलियनं XI च्या कॅप्टनपदी निवड, दमदार कामगिरीची अनोखी दखल
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं केला जसप्रीत बुमराहचा अनोखा सन्मान, यशस्वी जयस्वालला देखील मानाचं स्थान
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
अजित दादांच्या मातोश्री म्हणाल्या पवार कुटुंब एकत्र यावं; अमोल मिटकरींनी घेतलं 2 नेत्यांचं नाव, ज्यांचा आहे विरोध
Kerala Nurse Nimisha Priya : येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
येमेनमध्ये भारतीय नर्सला फाशीच्या शिक्षेला मंजुरी, सहकाऱ्याच्या हत्येचा आरोप; केंद्र सरकारकडून मदत होणार?
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
अंगात जर्सी, हाती बॅट, डोक्यावर कॅप, डोळ्यावर गॉगल; विनोद कांबळीला डिस्चार्ज, म्हणाला मै छोडूंगा नही...
Milind Narvekar : अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
अमित शाहांना मध्यरात्री बाराच्या ठोक्याला शुभेच्छा, फडणवीसांचं कौतुक, रश्मी शुक्लांनाही शुभेच्छा, बाबरीवरूनही पोस्ट; मिलिंद नार्वेकरांच्या 'बंडखोर' मशालीची चर्चा
Gold Rate : नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ, चांदीची चमक ओसरली, बाजारात काय घडलं?
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
गेटवर वॉचमनने अडवलं, तरीही रेडा सुस्साट शाळेत शिरला; धडकेत विद्यार्थी जखमी, रुग्णालयात दाखल
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
महाराष्ट्रात क्रांती, पहिले AI धोरण जाहीर होणार; मंत्री आशिष शेलार यांनी घेतला आढावा, दिले महत्त्वाचे निर्देश
Embed widget