एक्स्प्लोर

Rashid Khan : वन मॅन आर्मी! राशिद खान एकाचवेळी बंगाली टायगर्स आणि कांगारुंचा कर्दनकाळ; अफगाण पठाणनं करून दाखवलं

Rashid Khan : राशिदेन घेतलेल्या चार विकेट अफगाणिस्तानसाठी टर्निंग पॉईंट ठरल्या, तर शेवटच्या टप्प्यांमध्ये गुलबदीन आणि नाविने केलेला अचुक मारा बांगलादेशच्या मुळावर घाव घालणारा ठरला.

Rashid Khan : गेल्यावर्षी एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तानने यंदा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये सुद्धा धुवाँधार कामगिरी करत थेट सेमी फायनलमध्ये मजल मारली आहे. करो वा मरोच्या लढतीमध्ये अपघाणी पठाणांनी जबरदस्त कामगिरी करत बांगलादेशचा धुव्वा उडवत दिमाखात सेमी फायनल गाठली. अफगाण विजयाचा शिल्पकार  पठाणी वाघ कॅप्टन रशीद खान ठरला. त्याने चार विकेट घेत बांगलादेशला बॅकफूटवर ढकलून दिलं होते. पाऊस आणि डकवर्थचा खेळ सुरू असताना अफगाणी गोलंदाजांनी संयम न सोडता बांगलादेशवर आणलेलं दडपण कायम राखत विजय खेचून आणला. 

शेवटच्या पाच ओव्हरमध्ये रन आणि बॉल असा संघर्ष सुरू होता आणि या संघर्षामध्येच अफगाणी पठाण बांगलादेशी वाघांपेक्षा सरस ठरले. राशिदेन घेतलेल्या चार विकेट अफगाणिस्तानसाठी टर्निंग पॉईंट ठरल्या, तर शेवटच्या टप्प्यांमध्ये गुलबदीन आणि नाविने केलेला अचुक मारा बांगलादेशच्या मुळावर घाव घालणारा ठरला. त्यामुळे एकाच वेळी बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाच्या अशा संपुष्टात आल्या. नावीनने 18व्या षटकात दोन बॉलला दोन विकेट घेत सेमी फायनलचा मार्ग दाखवून दिला. 

अफगाणिस्तानची स्वप्नवत कामगिरी

अफगाणिस्तान संघ 2010 पासून टी-20 विश्वचषक खेळत आहे, आता 2024 मध्ये प्रथमच टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. जी सध्या त्यांची या फॉरमॅटमधील सर्वोत्तम कामगिरी आहे. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी 114 (DLS) चे लक्ष्य होते. पण 'प्लेअर ऑफ द मॅच' नवीन उल हकने सलग 2 विकेट घेत सामना अफगाणिस्तानच्या बाजूने वळवला. नवीन उल हक आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 6 बळी घेत अफगाणिस्तानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तर बांगलादेशकडून सलामीवीर फलंदाज लिटन दास (नाबाद 54) शेवटपर्यंत नाबाद राहिला.

नवीन उल हकचे षटक आणि शेवटच्या षटकाचा थरार

शेवटच्या 2 षटकात बांगलादेशला विजयासाठी 12 धावांची गरज होती, 8 विकेट पडल्या होत्या. बांगलादेशची धावसंख्या 102/8 होती. नवीन उल हक 18 वे ओव्हर टाकायला आला होता. या षटकात तस्किन अहमद नवीनकडे क्लीन बोल्ड झाला. यानंतर पुढच्याच चेंडूवर मुस्तफिझूर रहमानला बाद करून बांगलादेशच्या आशा संपुष्टात आल्या.

बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाच्या आशा अशाच संपल्या 

उपांत्य फेरी गाठण्यासाठी बांगलादेशला 12.1 षटकांत 116 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. अशा परिस्थितीत त्यांच्या आशा संपल्या आहेत. त्याचवेळी अफगाणिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी पुरेसा होता. त्याचबरोबर या सामन्यात अफगाणिस्तानच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचा संघही विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amruta Fadnavis Full Speech : नाव न घेता ठाकरे-पवारांवर हल्ला, अमृता फडणवीसांचं UNCUT भाषणMahayuti Meeting : जागावाटपासंदर्भात वर्षा बंगल्यावर महायुतीची खलबतंABP Majha Headlines : 11 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray on Ladki Bahin Yojana : 'लाडकी'च्या निधीवरुन 'राज'कीय फटकारे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget