Ramesh Latke Death : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन
Ramesh Latke Passes Away : लटके यांच्या निधनाचं वृत्त कळताच स्थानिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली आहे.
![Ramesh Latke Death : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन Maharashtra political marathi news andheri east legaslative assembly constituency shiv sena mla ramesh latke passed away due to heart attack at age 52 Ramesh Latke Death : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/12/ce920eb4865df56449cbb7d63b0426da_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Ramesh Latke Passes Away : अंधेरी पूर्व विधानसभाचे शिवसेना आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते कुटुंबासह दुबईत फिरायला गेले असताना काल सायंकाळी त्यांचं निधन झालं आहे. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लटके यांच्या निधनाचं वृत्त कळताच स्थानिकांनी त्यांच्या कार्यालयाबाहेर एकच गर्दी केली.
दुबईमध्ये हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू
आमदार रमेश लटके यांनी तीन दिवसापूर्वी अंधेरी पूर्वेत होली फॅमिली ग्राउंड मध्ये सत्कार समारंभ कार्यक्रम ठेवला होता, त्या कार्यक्रमात मंत्री अनिल परब व मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर ते काल पहिल्यांदाच दुबईला आपल्या सहकुटुंब सोबत फिरायला गेले होते आणि काल दुबईमध्ये त्यांना हृदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे.
सार्वजनिक गणेश मंडळाचे अध्यक्ष ते आमदार
रमेश लटके यांनी सार्वजनिक गणेश मंडळाच्या अध्यक्षपदापासून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. गटप्रमुख ते आमदार असा त्यांचा अफलातून राजकीय प्रवास होता. या प्रवासादरम्यान त्यांनी शाखाप्रमुख, नगरसेवक ही आणि अशी विविध पदं यशस्वीरित्या भूषवली. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता. लटके यांनी 1997 ते 2012 अशा सलग 3 वेळा नगरसवेक पद भूषवलं. त्यानंतर 2014 मध्ये लटके यांनी पहिल्यांदा अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.
मतदारांचा विश्वास
1997 साली मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेचे नगरसेवक म्हणून लटके हे निवडून आले. त्यानंतर सन 2002 आणि 2009 च्या महापालिका निवडणुकीत विजयी होत ते महापालिकेत नगरसेवक म्हणून गेले. तर 2014 च्या विधानसभा निवडणुकीत ते विधानसभेच आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत अंधेरी पूर्वच्या मतदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पुन्हा निवडून दिले.
महत्वाच्या इतर बातम्या
Prakash Ambedkar: 'वंचित'ची थेट राज्य निवडणूक आयोगाला नोटिस, निवडणुका घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
मोठी बातमी; महापालिका-नगरपंचायतींच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये घ्या; निवडणूक आयोगाचे सुप्रीम कोर्टात अर्ज
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)