एक्स्प्लोर

बचत गट चालवताय? तुमच्या उत्पादनाला मिळणार हक्काची बाजारपेठ, ऑनलाईन खरेदीविक्रीसाठी यशस्विनी पोर्टल

महिला बचतगटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंची विक्री झाल्यानंतर त्यांच्या खात्यात ऑनलाईन रक्कम जमा होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Maharashtra: महिला बचत गटांच्या उत्पादनाला आता हक्काची बाजारपेठ मिळणार असून महिला व बालकल्याण विकास विभागाकडून महिला बचत गटांसाठी यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरु करण्यात आला आहे. महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी या प्लॅटफॉर्मचे आज उद्घाटन केले असून ऑनलाईन शॉपिंग भारतात महत्वाची भूमिका निभावत असताना बचत गटातील महिलांच्या खरेदी विक्रीसाठी या पोर्टलचा फायदा होणार आहे.

जाहिरातीच्या आभावी अनेकवेळा महिला बचत गटांची उत्पादने विकली जात नाहीत किंवा त्यांना योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यासाठी महिला व बाल विकास विभागामार्फत यशस्विनी ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.

ग्रामीण, आदिवासी महिलांच्या बचत गटाला बाजारपेठ

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, भारताच्या रिटेल क्षेत्रात ऑनलाईन शॉपिंग महत्त्वाची भूमिका निभावत आहे. सध्या करोडो रुपयांची देवाण घेवाण ऑनलाईन शॉपिंग प्लटफॉर्मद्वारे केली जात आहे. यामध्ये महिला बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील ग्रामीण, आदिवासी, शहरी अशा हजारो बचतगटांनी तयार केलेली नाविन्यपूर्ण, दर्जेदार उत्पादने यशस्विनी ई -कॉमर्स प्लटफॉर्मवर आता उपलब्ध होणार असून महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग उपलब्ध  होणार आहे.

बचत गटांना यासाठी करावी लागणार नोंदणी

यामध्ये बचत गटांना खरेदी किंवा विक्री करण्याकरिता सहज आपले नाव नोंदणी करता येणार आहे. तसेच बचत गटांच्या उत्पादनाचे फोटो अपलोड करता येणार आहेत तसेच त्यांच्या किंमतीची व गुणवत्तेची जाहिरात करण्यासाठी सुद्धा यामध्ये डॅशबोर्ड व्यवस्था करण्यात आली आहे.

वस्तूंची विक्री झाली की खात्यात ऑनलाईन पैसे

बचतगटांना उत्पादन पॅकींग, वाहतूक, साठवणूक करणे, योग्य हाताळणी करणे या विषयी माहिती देण्यात आली आहे. महिला बचतगटांनी उत्पादन केलेल्या वस्तूंची विक्री झाल्यानंतर त्यांच्या खात्यात ऑनलाईन रक्कम जमा होण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यशस्वीनी प्लॅटफार्म सर्व जनतेसाठी  उपलब्ध असून नागरिकांनी https://yashaswini.org/launch.html या प्लॅटफॉर्मला अवश्य भेट द्यावी,  असे आवाहन महिला व बाल विकास विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी  केले आहे.

हेही वाचा:

लाडकी बहीण योजनेचे 83 टक्के अर्ज वैध, बहिणींना दोन हप्ते देण्यासाठी इतर योजनांना ब्रेक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Embed widget