एक्स्प्लोर

लाडकी बहीण योजनेचे 83 टक्के अर्ज वैध, बहिणींना दोन हप्ते देण्यासाठी इतर योजनांना ब्रेक

Ladki Bahin Yojana : आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते एकत्रित देण्यात येणार आहेत. 

मुंबई : बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधनच्या दिवशी दिला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार सर्व पातळीवर तयारी करत आहे. 1 कोटी महिलांना एकाच वेळी दोन हप्ते दिले जाणार आहेत. आतापर्यंत 1 कोटी 40 लाख अर्ज दाखल झाले असुन त्यापैकी 1 कोटी अर्जांची छानणी ही पूर्ण झालेली आहे. मात्र जोपर्यंत या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना मिळत नाही तोपर्यंत इतर योजनांना ब्रेक लागल्याची माहिती समोर येते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केलीय. या योजनेचा पहिला हप्ता ररक्षाबंधनच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा एकत्रित हप्ता म्हणजेच 3 हजार रुपये लाभार्थी महिलांच्या बॅंक खात्यात थेट जमा होणार आहेत. 

आतापर्यंत या योजनेची वस्तुस्थिती काय?

  • आतापर्यंत 1 कोटी 40 लाख 10 हजार 215 अर्ज ऑनलाईन भरण्यात आले आहेत. 
  • त्यापैकी 1 कोटी अर्जांची छाननी करण्यात आलेली आहे.
  • त्यात 83 टक्केहून अधिक अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत.
  • जवळपास 12 हजार अर्ज अवैध ठरवण्यात आलेले आहेत.
  • अनेक महिलांनी बॅंक खात न उघडल्याने अनेक अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.

एकाच कुटुंबात कोणत्याच महिलांना दुहेरी लाभ मिळणार नाही. मात्र एखाद्या योजनेतून जर 1500 पेक्षा कमी लाभ मिळत असेल तर त्या महिलेला वरचा फरक दिला जाणार आहे. किंवा जास्त लाभ मिळत असेल तर मात्र त्या महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

इतर योजनांचा निधी थांबवला 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवरती मोठा ताण निर्माण होणार आहे. या महिन्यात रक्षाबंधनच्या मुहूर्तावरती जवळपास एक कोटी महिलांना याचा लाभ थेट बँक खात्यात दिला जाणार आहे. त्यामुळे इतर खात्यांच्या नावीन्यपूर्ण योजना असतील किंवा त्या खात्यांचा निधी कुठेतरी थांबवलेला पाहायला मिळतोय. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही योजना महत्त्वाची असल्याने या योजनेचा पहिला हप्ता लाभार्थ्यांना दिल्यानंतरच इतर निधी दिला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे इतर विभागाच्या मंत्र्यांची मोठ्या प्रमाणात नाराजी वाढताना पाहायला मिळतेय.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City 60 News : टॉप 60 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 February 2025 : ABP MajhaUday Samant PC on Sharad Pawar Meet : शरद पवारांच्या भेटीनंतर उदय सामंत काय म्हणाले?ABP Majha Headlines : 08 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRajan Salvi Resigned Shivsena: मातोश्रीशी इमान राखलेल्या निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
एकनाथ शिंदेंचा शरद पवारांकडून सत्कार, संजय राऊत संतापले; आता, निलेश राणेंचा पलटवार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
Amravati News : मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Embed widget