Bhiwandi: गटार आणि नाल्यात उतरून भ्रष्टाचार दाखवण्याचा प्रयत्न; भिवंडीतील समाजसेवकाकडून प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jun 2023 11:23 PM
Cyclone Biparjoy : अरबी समुद्राला उधाण... बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने; मच्छीमारांना मासेमारासाठी न जाण्याच्या सूचना 
Cyclone Biparjoy Latest Update : सौराष्ट्र आणि  कच्छच्या किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी केला असून मच्छीमारांना मासेमारासाठी न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  Read More
Buldhana News: जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील वरुड गव्हाण या गावात जुन्या वादातून दोन गटात तुफान राडा; 23 जखमी , पोलीस घटनास्थळी

Buldhana News:  जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील वरुड गव्हाण या गावात जुन्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला. या राड्यात दगड विटा लाट्या-काठ्यांनी दोन्ही गटातील सदस्यांना मारहाण झाली.. यात 23 जण जखमी झाले असून यातील आठ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकोला येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे... तर उर्वरित जखमींवर सामान्य रुग्णालय खामगाव येथे उपचार सुरू आहे... वरुड गावात सध्या पोलिसांच्या दंगा काबू पथकासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस पुढील तपास करत आहे...

Bhiwandi: गटार आणि नाल्यात उतरून भ्रष्टाचार दाखवण्याचा प्रयत्न; भिवंडीतील समाजसेवकाकडून प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे
Bhiwandi Corruption: नाले आणि गराट सफाईसाठी कोट्यवधी रुपये महापालिकेकडून खर्च होतात, तरीही उत्तम दर्जाचे काम होत नसल्याने प्रशासनाला सवाल करण्यात आला आहे. Read More
Manohar Joshi: माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयातून आज डिस्चार्ज...

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना हिंदुजा रुग्णालयातून आज डिस्चार्ज...


ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते प्रकृती सुधार दिसत असल्याने मनोहर जोशी यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज देण्यात आल्याची रुग्णालय प्रशासनाची माहिती...


22 मे रोजी मनोहर जोशी यांना केलं होत हिंदुजा रुग्णालयात दाखल...

Haryana CM: पद्म पुरस्कार विजेत्यांसाठी हरियाणा सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, दरमहा दहा हजारांची पेन्शन आणि मोफत बस प्रवास
Haryana CM: हरियाणा सरकारने पद्म पुरस्कार विजेत्यांसाठी पेन्शन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पद्म पुरस्कार विजेत्यांना आता सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. Read More
Gunaratna Sadavarte: नथुराम गोडसे यांच्यासोबत न्याय झाला नाही, सदावर्ते पुन्हा बरळले, शरद पवारांवरही टीका
Naturam Godse: गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नथुराम गोडसे यांच्यावर अन्याय झाला असल्याचे सदावर्ते यांनी म्हटले. Read More
Guarav Munjal : वास्तव स्वीकारा, सॅम अल्टमनच्या टिप्पणीवर Unacademy च्या सीईओंची प्रतिक्रिया
OpenAI चे फाउंडर सॅम अल्टमन यांनी भारतीयांना आव्हान दिलं आहे. AI तंत्रज्ञानामध्ये भारत अमेरिकेची बरोबरी करु शकत नाही, असं अल्टमन यांनी म्हटलं आहे. Read More
Kalyan News: भाईगिरीच्या वर्चस्वाचा वाद; एका गुन्हेगाराने दुसऱ्या गुन्हेगाराची भर रस्त्यात संपवलं; कल्याणमधील घटनेने खळबळ
Kalyan News:  भाईगिरीच्या वादातून एका गुंडांने दुसऱ्या गुंडाला भरचौकात सपासप वार करून संपवले असल्याची घटना समोर आली आहे. Read More
Nashik Accident : दिंडोरी-नाशिक मार्गावर तिन्ही वाहनांचा विचित्र अपघात, जीवितहानी टळली, वाहनांच नुकसान 

Nashik Accident : दिंडोरी-नाशिक रस्त्यावरील रणतळेजवळ बससह तीन वाहनांमध्ये विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून बस आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दिंडोरीकडून नाशिककडे जाणारी बस रणतळेजवळील चढण चढत असतांना नाशिकहून दिंडोरीच्या दिशेने उतारावरून भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो या वाहनावरील चालकाचा ताबा सुटल्याने बसच्या पुढील व मागच्या चाकास धडक दिली. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. तर बसच्या मागे असलेली अल्टो कारही बसला पाठीमागून धडकली.

Noorjahan Mango : अबब! पाच किलोचा एक आंबा, 'आंब्यांच्या राणी'ची सर्वदूर चर्चा; किंमत ऐकून अवाक व्हाल
Nur Jahan Mango : हा एक आंबा चक्क पाच किलोचा असतो. यामुळे या आंब्याला आंब्याची राणी असं म्हटलं जातं. या एका आंब्यासाठी तुम्हाला सुमारे दोन हजार रुपये मोजावे लागतील. Read More
'अनेक पुरावे दिले, आता काय हवयं?' ; बजरंग पुनियाचा दिल्ली पोलिसांना थेट सवाल
Wrestler Protest: कुस्तीपटूंकडे दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिंह यांच्याविरोधातले पुरावे देण्यास सांगितले. त्यानंतर बजरंग पुनियाने आता काय हवं असं म्हणत दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारला आहे. Read More
Diabetes : देशाला मधुमेहाचा विळखा; एकट्या गुजरातमध्ये मधुमेहाचे 8 टक्के रुग्ण, ICMR च्या अहवालातून स्पष्ट
Diabetes : गुजरामध्ये 8 टक्के मधुमेहाचे रुग्ण आहेत, तर 10.25 टक्के लोकं प्रीडायबेटिक स्तरातील आहेत. आयसीएमआरच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. Read More
Kolhapur Crime: कोल्हापुरात चोरी, घरफोड्यांचे सत्र सुरुच; टिकावने दरवाजा तोडून साते सात लाखांचे दागिने लंपास 
Kolhapur Crime: चोरी, दरोडे, घरफोड्यांनी अवघा कोल्हापूर जिल्हा भयभीत होऊन गेला आहे. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.  Read More
"तुला माझा नवरा खूप आवडतो का?" म्हणत गावातील महिलेला पाजले विष; पोलिसांत गुन्हा दाखल
Beed News : याप्रकरणी तिघांविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. Read More
Yavatmal News: पासशे रुपयांच्या दोन कोटी 70 लाखांच्या नोटा जप्त; चौकशीसाठी सहाजण ताब्यात
Yavatmal News: यवतमाळच्या आर्णी शहराच्या बायपास रोडवर काळ्या रंगाच्या कारमधून मोठी रक्कम नेत असल्याची गोपनीय माहिती आर्णी पोलिसांना मिळाली. त्यावरून साफला रचून वाहनांची झडती घेतली असता 2  कोटी 70  लाख रोख आढळून आली.  एमएच-26-बीसी- 7245 या क्रमांकाची काळ्या रंगाची कार शहरात दाखल होत असताना पोलिसांनी थांबविली. कारमध्ये मधुरम सत्यनारायण स्वामी (28), बालाजी भीमराव चौधरी (42), रोहित किसनराव सोनपाखरे (28) प्रदीप प्रकाश जोंधळे (सर्व राहणार नांदेड), संजीवकुमार निर्मला झा (55,  नागपूर), गजानन गणेश गिरी (42, रा. फुलसावंगी) यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.  त्यांच्याकडे चौकशी केली असता पोलिसांचा सकारात्मक उत्तरे न दिल्याने ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. 
Worlds Largest Roti : अगडबम! जगातील सर्वात मोठी चपाती, वजन 145 किलो; भारतात 'या' ठिकाणी बनते 'ही' खास रोटी
Worlds Largest Roti : जगातील सर्वात मोठी रोटी चपाती भारतात बनवली जाते. या 145 किलोच्या चपातीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. Read More
MHT CET Result 2023: एमएचटी सीईटी 2023 परीक्षेचा निकाल जाहीर
MHT CET Result 2023: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षमार्फत (सीईटी सेल) अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटीचा निकाल काही वेळेपूर्वी जाहीर करण्यात आला आहे.  

 

सीईटी सेलकडून दरवर्षी प्रवेश परीक्षा घेतल्या जातात त्या गुणांच्या आधारे या अभ्यासक्रमांच्या असलेल्या तब्बल तीन लाख जागावर प्रवेश दिले जातात.   

 

एमएचटी सीईटी परीक्षेसाठी यावर्षी 6 लाख 36 हजार 89 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. आता निकाल जाहीर झाला असून प्रतीक्षा संपली आहे.

 

येथे पाहाल निकाल :


Ganpati Pule : गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद

गणपतीपुळे समुद्रकिनारा पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहे. लाटांनी गणपतीपुळे समुद्रकिनारी  दाणादाण उडवली आहे. त्याचमुळे पर्यटकांना समुद्रात जाण्यासाठी मज्जाव केला आहे. जिल्हा प्रशासनाने हे आदेश दिले आहेत. 

Gondia News: मुरुम आणि रेती व्यावसायिकांची रात्रीदरम्यान पेट्रोलिंग करत असलेल्या दोन पोलिसांना बेदम मारहाण; गोंदियात पोलीसच सुरक्षित नाही का ?

Gondia News: गोंदिया जिल्ह्यात मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्यांची सीमा असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इतर राज्यातून अवैध धंदे होत असतात. जिल्ह्यात होणाऱ्या अवैध धंद्यांना रोखण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन दिवस-रात्र  पेट्रोलिंग करून या अवैध धंदे कसे थांबता येईल याबाबत कार्य करत असतात. पण पोलिसांनाच अवैध धंदे करणारे मारहाण करत असतील तर काय समजावे लागेल असा प्रश्न गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना पडला आहे.  त्याला कारणही तसेच आहे. गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या भोसा या गावात एक अशीच घटना घडली आहे.


रात्रीच्या सुमारास दोन पोलीस हे पेट्रोलिंग करत असताना अवैध धंदे करीत असलेल्या काही लोकांनी पोलिसाना पाहताच त्यांच्यावर हल्ला करीत पोलिसाना पकडून बांधून ठेवत मारहाण केली या मारहाणीमध्ये दोन पोलीस जखमी झाले. याविषयी आमगाव पोलीस स्टेशनला माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी पोचले. पोलिसांना पाहताच आरोपींनी त्या ठिकाणातून पळ काढला. त्यांनतर आमगाव पोलिसांनी तपास चक्र फिरवत पोलिसांना मारहाण करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे. 

तळकोकणातील दाणोलीत अडीच लाखांची दारू जप्त, एक ताब्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील दाणोली येथे कारवाई केली. यात एकूण अडीच लाखांची दारू आणि मोटार असा एकूण साडे सात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. राजन गुरव याच्यावर सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक कोल्हापूर येथे होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. दाणोली येथील विश्रामगृह परिसरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी दारू वाहतुकीवर कारवाई केली.

Cyclone Biparjoy : बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला! सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी
Biporjoy Cyclone Update : बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका वाढला असून सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. Read More
Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे राहुरीकडे प्रस्थान, तर मुक्ताबाईंची पालखी आज अंबडला मुक्कामी
Ashadhi Wari : संत निवृत्तीनाथांची पालखी 2 जून रोजी निघालेली असून हजारो वारकऱ्यांचा पायी प्रवासाचा आजचा दहावा दिवस आहे. Read More
Diabetes : मधुमेहाचा वाढता विळखा! 10 पैकी एका व्यक्ती डायबेटिक, अहवालात धक्कादायक माहिती समोर
Diabetes Study : देशात मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढलं आहे. 10 पैकी एका व्यक्ती डायबेटिक असल्याची धक्कादायक माहिती अहवालात समोर आली आहे. Read More
MHT CET Result 2023: एमएचटी सीईटीचा आज निकाल; रिझल्ट कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या तपशील
पीसीएम (फिजीक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स) या ग्रुपसाठी परीक्षा 9 ते 14 मे  दरम्यान घेण्यात ली होती. तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) या ग्रुपसाठी परीक्षा 15 ते 20 मे  दरम्यान झाली होती. परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. Read More
Morning Headlines 12th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
कृषीमंत्री अब्दुल सत्तार खरं बोलतायत की खोटं? दिपक गवळी नेमका कोण? अकोल्यातील कथित धाडींबाबत धक्कादायक खुलासा
Akola News: अकोल्यात कृषीमंत्र्यांच्या नावावर कृषी विभागाच्या कथित पथकानं अकोल्यातील एमआयडीसीमध्ये धाडी कालपासून धाडी टाकल्या आहेत. मात्र, या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खाजगी व्यक्तींचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे. Read More
120 जणांनी गैरवर्तन करुन पत्नीला अमानुष मारहाण केल्याचा जवानाचा आरोप, व्हिडीओ समोर; मात्र पोलिसांकडून आरोपाचं खंडन
Army Jawan Claims Wife Thrashed : सुमारे 120 पुरुषांनी पत्नीसोबत गैरवर्तन आणि अमानुषपणे मारहाण केल्याचा आरोप एका जवानाने केला आहे. जवानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
करियर मार्गदर्शनाच्या नावाखाली विद्यार्थ्यांना धर्मपरिवर्तनाचे धडे? हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप, मालेगावमधील संस्थेवर गुन्हे दाखल
Malegaon News: करियर मार्गदर्शनाच्या नावाखाली 'सत्य मलिक' संस्थेकडून विद्यार्थ्यांना धर्मपरिवर्तनाचे धडे देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. याप्रकरणी संस्थेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Ashadhi Wari 2023 : संत साधू महाराज संस्थांन दिंडी कंधारहून पंढरीकडे मार्गस्थ
Ashadhi Wari 2023 : मराठवाड्यातून निघणाऱ्या दिंड्यांपैकी संत साधू महाराज संस्थान, कंधार यांची दिंडी काल (रविवारी) मार्गस्थ झाली. Read More
Cyclone Biparjoy : बिपरजॉय भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज, हवामान विभागाचा धोक्याचा इशारा; चक्रीवादळ 10 दिवस लांबण्याची शक्यता
Biporjoy Cyclone Update : चक्रीवादळाने मार्ग बदलल्यामुळे आता भारतालाही धोका निर्माण झाला आहे. गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Read More
Sharad Pawar Threat Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून एकाला अटक; आरोपीला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी
Sharad Pawar Threat Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना धमकी दिल्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

सागर बर्वे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव Read More

पार्श्वभूमी

Maharashtra News LIVE Updates :  दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... 


आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असणार आहे. आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपदासाठीचा अंतिम फेरीचा सामना सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे कडवं आव्हान टीम इंडिया समोर असणार आहे. तर, दुसरीकडे दिल्लीतील आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या समर्थनात फोगाट बहिणींच्या बलाली गावात कुस्तीपटूंसाठी महापंचायत होणार आहे. 
Ads by



WTC चा अंतिम सामना 
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा लंडनमधील ओव्हल मैदानावर रंगणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं 10 वर्षांपासून आयसीसीचं कोणतंही विजेतेपद जिंकलेलं नाही, अशा परिस्थितीत अंतिम सामना जिंकणार की नाही याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. 



पालखी सोहळा 
-  त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याचा आज सहावा दिवस आहे. पालखी सिन्नर तालुक्यातून जाणार असून दातली गावी आज दुपारी 12 ते दुपारी 2 वाजता दरम्यान रिंगण सोहळा होणार आहे.


- शेगावच्या गजानन महाराजांची पालखी मराठवाड्यात दाखल झाली आहे.  



राष्ट्रीय 
हरियाणा - फोगाट बहिणींच्या बलाली गावात आज महापंचायत. कुस्तीपटू विनेश फोगाट, संगीता फोगाट उपस्थित राहणार



दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सकाळी 10.30 वाजता बैठक होणार



मुंबई 
- शिवसेना ठाकरे गटाकडून आजपासून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू होणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेल वर सुरू करण्यात येत आहे 


-   मुंबई-गोवा महामार्गावर (एनएच-66) मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्यांच्या पार्श्वभूमीवर मुळचे कोकणातील असलेले अॅड. ओवैस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी होणार आहे. 


-  राज्यातील एसटी आरक्षणापासून वंचित असलेला समाज ‘धनगड’ की ‘धनगर’ आहे. यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी


पुणे  
- जेजुरी विश्वस्त निवडीवर आज धर्मादाय आयुक्तांकडे सुनावणी होणार आहे. सध्या ग्रामस्थांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आज 13 वा दिवस आहे. 
- जेजुरी देवस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांच्या नियुक्तीवरून वाद सुरु असताना या विश्वस्तांन एकत्र येत त्यांची भुमिका पत्रकार परिषदेतून मांडणार आहेत. 


नवी मुंबई 
- तिरुमला तिरुपती देवस्थानम श्री व्यंकटेश्वर स्वामी वारी मंदिर, नवी मुंबई भूमिपूजन समारंभ होणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित रहाणार आहेत
 


अहमदनगर 
- कथित लव जिहाद प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या आज नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात सहा प्रकरण घडल्याच किरीट सोमय्यांचा दावा आहे. 


- भाजप खासदार सुजय विखे पाटलांची पत्रकार परिषद


- शिर्डीमध्ये काँग्रेस विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते निळवंडे कॅनॉल पाणी जलपूजन असून संध्याकाळी 4 वाजता सभा होणार 


 सांगली 
- भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जत तालुक्यात 55 जोडप्याचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे, सकाळी 11 वाजता.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.