MHT CET Result 2023: एमएचटी सीईटीचा आज निकाल; रिझल्ट कुठे आणि कसा पाहाल? जाणून घ्या तपशील
पीसीएम (फिजीक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स) या ग्रुपसाठी परीक्षा 9 ते 14 मे दरम्यान घेण्यात ली होती. तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) या ग्रुपसाठी परीक्षा 15 ते 20 मे दरम्यान झाली होती. परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती.
MHT CET Result 2023 : एमएचटी सीईटी परीक्षेचा निकाल ( MHT CET 2023 ) आज जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता निकाल लागणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर तात्काळ राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत. एमएचटीसीईटी परीक्षेचा निकाल cetcell.mahacet.org या संकेतस्थळावार विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
पीसीएम (फिजीक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स) या ग्रुपसाठी परीक्षा 9 ते 14 मे दरम्यान घेण्यात ली होती. तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी) या ग्रुपसाठी परीक्षा 15 ते 20 मे दरम्यान झाली होती. परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली होती. परीक्षा जवळपास 4.5 लाखापेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. कॅप राउंड संदर्भातील वेळापत्रक निकाल जाहीर होताच जाहीर केले जाणार आहे. या अगोदर विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश नोंदणी करता येणार आहे.
असा पाहा MHT CET 2023 रिझल्ट?
- निकाल पाहण्यासाठी सीईटीच्या अधिकृत संकेस्थळाला भेट द्या
- cetcell.mahacet.org या संकेतस्थळावर portal links यावर क्लिक करा
- त्यानंतर Check MHT CET Result 2023 या लिंकवर क्लिक करा
- रजिस्ट्रेशन नंबरवर लॉगिन करा
- रिजल्ट चेक केल्यानंतर त्यांची प्रिंट काढा
कधी होणार काउन्सलिंग?
एमएचटी सीईटी 2023 चा निकाल जाहीर ( MHT CET 2023 ) झाल्यानंतर काउंसलिंग करण्यात येणार आहे.त्यानंतर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग, फार्मसीला प्रवेश घेण्यात येणार आहे. अद्याप काउन्सलिंगची तारीख जाहीर केलेली नाही.
प्रवेशासाठी प्रथमच मोबाईल अॅपचा वापर (Mobile App)
प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात येणार असून प्रथमच मोबाईल अॅपमार्फत उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबत विविध टप्प्यांची माहिती तसेच सूचना आणि जागा वाटप आदी माहिती अॅपच्या माध्यमातून उमेदवारांना मिळणार आहे. मोबाईल अॅपचा विद्यार्थी पालक यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे (Admission Process)
प्रवेश प्रक्रिया राबविताना अॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) प्रणालीचा उपयोग करण्यात येणार आहे. सदर API द्वारे बारावी गुण, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, आर्थिकदृष्टया दुर्बल घटक जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलीअर प्रमाणपत्र, कृषी शिक्षण व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीत लागणारा सात-बारा उतारा. प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक प्रमाणपत्र दाखले यांची पडताळणी करण्यात येणार आहे.
हे ही वाचा :
Maharashtra CET Exam : विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! सीईटी परीक्षा नोंदणी आणि कॅप राऊंड प्रवेश प्रक्रियेसाठी खास मोबाईल ॲप्लिकेशन
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI