Guarav Munjal : वास्तव स्वीकारा, सॅम अल्टमनच्या टिप्पणीवर Unacademy च्या सीईओंची प्रतिक्रिया
OpenAI चे फाउंडर सॅम अल्टमन यांनी भारतीयांना आव्हान दिलं आहे. AI तंत्रज्ञानामध्ये भारत अमेरिकेची बरोबरी करु शकत नाही असं अल्टमन यांनी म्हटलं आहे.
Accept The Reality : ओपन एआयचे संस्थापक सॅम अल्टमन (Sam Altman) यांनी ChatGPT सारखे AI साधन तयार करण्याच्या भारताच्या प्रयत्नाबद्दल केलेल्या टिप्पणीवरुन सोशल मीडियावर वादाला सुरुवात झाली होती. यावर Unacademy चे CEO गौरव मुंजाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "आपण ग्लोबल सोशल नेटवर्क किंवा ऑपरेटिंग सिस्टम किंवा ब्राउझर किंवा क्लाउड इन्फ्रा तयार केलेले नाही. तरीही सॅम ऑल्टमनच्या वक्तव्यामुळे आम्ही खूप नाराज झालो आहोत. मात्र आपल्याला वास्तव स्वीकारावं लागेल. पुढील OpenAI देशातून बाहेर यायचे असेल तर भारताला चांगल्या इकोसिस्टमची गरज असल्याचं गौरव मुंजाल म्हणाले.
OpenAI चे CEO सॅम अल्टमन काही दिवसांपूर्वी भारत दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. आर्टिफिशिअल इंटेलिजन्समध्ये भारत अमेरिकेशी बरोबरी करु शकत नाही असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला होता. या वक्तव्याद्वारे त्यांनी भारतीयांना कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं जात आहे. परंतु यावर प्रतिक्रिया देताना सॅम अल्टमन म्हणाले की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. या सगळ्या प्रकरणावर Unacademy चे संस्थाप गौरव मुंजाळ यांनी भाष्य केलं आहे.
काय म्हणाले गौरव मुंजाल?
त्यांनी ट्वीट केलं आहे की, आपण ग्लोबल सोशल नेटवर्क किंवा ऑपरेटिंग सिस्टम किंवा ब्राउझर किंवा क्लाऊड इन्फ्रा तयार केलेलं नाही. तरीही सॅम अल्टमन यांच्या वक्तव्यामुळे आम्ही खूप नाराज झालो आहोत. पण आपल्याला वास्तव स्वीकारावे लागेल. भारतातील संस्थापक आणि गुंतवणूकदार दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून गोष्टी तयार करत नाहीत. पुढील OpenAI देशातून आणायचे असेल तर आपल्या देशाला चांगल्या इकोसिस्टम तयार करण्याची आवश्यकता आहे. आपण केवळ SaaS आणि IT क्षेत्रात वर्चस्व गाजवून चालणार नाही तर चांगले यश मिळवण्याकरीता त्यांनी इतर अनेक वेगळ्या गोष्टी करायला हव्या आहेत.
We didn’t build a global Social Network or an Operating System or a Browser or Cloud Infra. Yet we are so offended by @sama’s statement.
— Gaurav Munjal (@gauravmunjal) June 10, 2023
I would love nothing more than Global Products and Companies being built out of India. But we have to also accept the reality. Founders and…
गौरव मुंजाल यांच्या ट्वीटवर भरघोस प्रतिक्रिया
दरम्यान गौरव मुंजाल यांचं ट्वीट काही वेळात व्हायरल झालं. या ट्वीटवर भरघोस प्रतिक्रिया आल्या. "हे अतिशय कौतुकास्पद आहे की Unacademy चे CEO वास्तव सांगत आहेत, असं एका युझरने लिहिलं आहे. "मला तुमचे हे म्हणणे अजिबात पटलेले नाही. सध्या SaaS आणि IT मधील अनेक टूल्स अगदी तळाशी आहेत." अशी टिप्पणी एका युझरने केली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या