एक्स्प्लोर

Morning Headlines 12th June : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

Sharad Pawar Threat Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार धमकी प्रकरणी पुण्यातून एकाला अटक; आरोपीला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी

Sharad Pawar Threat Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना सोशल मीडियावरून (Social Media) धमकी देणाऱ्या एका आरोपीला मुंबई गुन्हे शाखेच्या (Mumbai Crime Branch) पथकानं रविवारी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर बर्वे (वय 34) असं पवारांना धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे. या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपी सागर बर्वे हा आयटी इंजिनीअर आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याला स्थानिक न्यायालयात हजर केलं आहे. याप्रकरणी आरोपीला स्थानिक न्यायालयानं 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वाचा सविस्तर 

Cyclone Biparjoy : बिपरजॉय भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज, हवामान विभागाचा धोक्याचा इशारा

Weather Forecast : बिपरजॉय चक्रीवादळाची (Biparjoy Cyclone Update) तीव्रता वाधली आहे. बिपरजॉयने (Cyclone Biporjoy) अत्यंत तीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत प्रवेश केला आहे. चक्रीवादळाने मार्ग बदलल्यामुळे आता भारतालाही (India) धोका निर्माण झाला आहे. मार्ग बदलल्यानंतर आता बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात (Gujrat) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाचा सविस्तर 

Odisha Train Accident: "फूट मसाजर, क्रॉकरी फालतू खर्च नाही"; रेल्वेनं सर्व आरोप फेटाळले, सुरक्षा निधीतून सामान खरेदी करण्याचं सांगितलं कारण

Odisha Train Accident: ओडिशा दुर्घटनेला (Odisha Train Accident) 10 दिवस झाले आहेत. परंतु, अद्याप या दुर्घटनेसंदर्भातील प्रश्न, आरोप-प्रत्यारोप अद्याप कमी झालेले नाहीत. ओडिशा दुर्घटनेवरुन काँग्रेस सातत्यानं मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसनं काही दिवसांपूर्वी मोदी सरकारवर एक मोठा आरोप केला होता. केंद्र सरकारनं रेल्वे सुरक्षा निधी फूट मसाजर, क्रॉकरी आणि फर्निचरवर खर्च करण्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला आहे. आता रेल्वेनं हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच, ज्यासाठी रेल्वे सुरक्षा निधी खर्च करण्यात आला होता, तो आनावश्यक खर्च नव्हता, तर रेल्वेच्या सुरक्षेचाच एक आवश्यक भाग होता, असं रेल्वेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. वाचा सविस्तर 

LokSabha Elections 2024: नरेंद्र मोदींनंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असावा? गृहमंत्री अमित शाहांचं तामिळनाडूत मोठं वक्तव्य

Amit Shah Pitches For Tamil PM In Future: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी 2024 लोकसभा निवडणुकांपूर्वी मोठं वक्तव्य केलं आहे. दक्षिणेतील राज्यांमध्ये भाजपचा (BJP) दारुण पराभव झाला. कर्नाटकात अपेक्षा होत्या, मात्र काँग्रेसनं एकहाती सत्ता मिळवत, तिथूनही भाजपला बाहेरचा रस्ता दाखवला. अशातच दक्षिणेकडून हद्दपार झाल्यानंतर भाजपनं पुन्हा दक्षिणेत पाय रोवण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं दिसतंय, ते अमित शाहांच्या वक्तव्यामुळे. दक्षिणेतील राज्यांमध्ये सततच्या पराभवानंतर अमित शाह यांनी तामिळ पंतप्रधानांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण चेन्नईतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बंद दाराआड झालेल्या बैठकीत अमित शाह यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अमित शाह म्हणाले की, आपण तामिळनाडूतील दोन संभाव्य पंतप्रधान कामराज आणि मूपनार यांची संधी गमावली आहे. त्यांना पंतप्रधान पदापर्यंत न पोहचू देण्यासाठी डीएमके जबाबदार असल्याचंही ते म्हणाले आहेत. वाचा सविस्तर 

120 जणांनी गैरवर्तन करुन पत्नीला अमानुष मारहाण केल्याचा जवानाचा आरोप, व्हिडीओ समोर; मात्र पोलिसांकडून आरोपाचं खंडन

Army Jawan Alleges Wife Thrashed : पत्नीसोबत सुमारे 120 पुरुषांनी गैरवर्तन आणि मारहाण केल्याचा आरोप एका जवानाने केला आहे. एका जवानाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या एका लष्करी जवानाने आरोप केला आहे की, "तामिळनाडूमधील लोकांच्या एका गटाने त्याच्या पत्नीसोबत गैरवर्तन केलं आणि क्रूरपणे मारहाण केली." मात्र, पोलिसांनी या जवानाचे दावे अतिशयोक्ती असल्याचं सांगत फेटाळून लावले आहेत. वाचा सविस्तर 

Sun : 'सूर्या' तुझा रंग कसा? पिवळा किंवा भगवा नाही असा दिसतो सूर्य, नासाने शेअर केला फोटो

NASA Astronomy Picture of Sun : सूर्याचा (Sun) रंग कोणता आहे? असा प्रश्न कुणी विचारला तर यावर स्पष्ट उत्तर असतं पिवळा. पण तुम्हाला कुणी सांगितलं की सूर्याचा रंग पिवळा नसून वेगळाच आहे, तर... ? नासाने नुकताच सूर्याचा एक फोटो शेअर केला आहे. यावरून सूर्याचा खरा रंग कोणता असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. 11 जून 2023 रोजी नासाने सूर्याचा फोटो शेअर केला आहे. यावरून सूर्याचा खरा रंग कोणता याबाबत चर्चा रंगली आहे. नासाने शेअर केलेल्या खगोलशास्त्रीय फोटोमध्ये (NASA Astronomy Picture of the Day) सूर्याचे विस्तृत रंगाचे स्पेक्ट्रम दिसत आहेत. वाचा सविस्तर 

12th June In History : अॅना फ्रँकचा जन्म, नेल्सन मंडेलांना जन्मठेप आणि पंतप्रधान इंदिरा गांधी यांची खासदारकी रद्द ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय; आज इतिहासात

12th June In History : जगाच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये 12 जून हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी वर्णभेदाविरोधात लढा देणाऱ्या नेल्सन मंडेला यांना आफ्रिकन सरकारने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर भारताच्या राजकीय इतिहासात आजच्या दिवसाला अन्यसाधारण महत्व आहे. 12 जून 1975 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द करण्याचा ऐतिहासिक असा निर्णय घेतला होता. वाचा सविस्तर 

Horoscope Today 12 June 2023 : मेष, कन्या, मकर राशीसाठी दिवस चांगला, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 12 June 2023 : आज सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार मिथुन राशीच्या लोकांना आज नोकरीतही बदल होताना दिसतील. तर, कुंभ राशीचे सर्व लोक एकत्र काम करताना दिसतील. आजचा सोमवार मेष ते मीन राशीसाठी कसा राहील? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Byculla Fire Brigade :  सायरन वाजवत लालबागच्या राजाला अग्निशमन दलाची सलामीVivek Phansalkar on Ganpati Visarjan : मुंबईतील गणपती विसर्जनसाठी गर्दी,आयुक्त फणसाळकर काय म्हणाले?ABP Majha Headlines : 11 PM : 17 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNana Patole on Vidhan Sabha:महाराष्ट्राला महायुतीचं विघ्न, पुढचा मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ganesh Visarjan 2024 : विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
विसर्जन मिरवणुकीला गालबोट, इंदापूर अन् अकोल्यात मुलं बुडाली; कोल्हापुरात परवानगी नसतानाही लेझर शो सुरुच
Giorgia Meloni : आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
आपली मैत्री अशीच फुलत राहो! इटलीच्या मेलोनी जॉर्जिया यांचा मोदींना खास संदेश
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
स्वातंत्र्यानंतर प्रथमच 2 वर्षात 92 हजार कोटींची विकासकामे; सा.बां. मंत्री रविद्र चव्हाणांचा दावा
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
वडापाव फुकट... गणपती विसर्जन मिरवणुकीतील भाविकांसाठी 4 ते 5 लाख वडापाव वाटप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 सप्टेंबर 2024 | मंगळवार
Pune Ganesh Visarjan: पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
पुण्यातील गणपती विसर्जन संथ गतीने, मानाच्या गणपतींनी 200 मीटर अंतर पार करायला लागले तब्बल पाच तास
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
सर्दी खोकल्यासह हे आजार पळतात विड्याच्या पानाने, नागवेलीच्या पानांचे अनेक गुणकारी फायदे
Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा
Embed widget