(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Worlds Largest Roti : अगडबम! जगातील सर्वात मोठी चपाती, वजन 145 किलो; भारतात 'या' ठिकाणी बनते 'ही' खास रोटी
Worlds Largest Roti : जगातील सर्वात मोठी चपाती भारतात बनवली जाते. या 145 किलोच्या चपातीची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.
Worlds Largest Roti : भारतात जितकी बोलीभाषेत विविधता पाहायला मिळते, तितकीच विविधता येथील खाद्यपदार्थांमध्ये आहे. भारत हा खवय्यांचा देश आहे, असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही. भारत आपल्या विविध खाद्यपदार्थांसाठी जगभर प्रसिद्ध आहे. अगदी काही किलोमीटर अंतरावर भारतातील जेवणाची पद्धत आणि चव बदलते. पण, चपाती (Chapati) म्हणजे रोटी (Roti) हा अशा पदार्थ जी संपूर्ण भारतात एक सारखीच बनवली जाते. आकार देखील साधारणपणे सारखाच असतो, पण याच भारतात एका ठिकाणी जगातील सर्वात मोठी चपाती बनवली जाते.
भारतात असं एक ठिकाण आहे जिथे, जगातील सर्वात मोठी चपाती (Worlds Largest Chapati) बनविली जाते. या चपातीचा आकार एवढा मोठा आहे की या चपातीमुळे एखाद्या संपूर्ण गावाचं पोट भरेल. जगातील सर्वात मोठी चपाती कुठे बनवली जाते जाणून घ्या.
'या' ठिकाणी बनते जगातील सर्वात मोठी चपाती
जगातील सर्वात मोठी चपाती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील जामनगरमध्ये बनवली जाते. मात्र, ही भलीमोठी चपाती रोज बनवली जात नाही. काही खास प्रसंगीवेळीच ही खास चपाती बनवली जाती. दगडूशेठ गणपती सार्वजनिक उत्सव किंवा जलाराम बापाच्या जयंती वेळी ही खास अवाढव्य चपाती बनवली जाते. जलाराम मंदिराच्या जीर्णोद्धार समितीतर्फे ही खास चपाती बनवली जाते. त्यानंतर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी ही चपातील प्रसाद म्हणून वाटली जाते. या दिवशी ही खास चपाती खाण्यासाठी लोक दूरदूरहून जामनगरला भेट देतात आणि या चपातीचा आस्वाद घेतात.
एवढी मोठी चपाती कशी बनवतात?
ही चपाती बनवण्यासाठी एक-दोन नव्हे तर अनेक जणांना मेहनत घ्यावी लागते. अनेक महिला एकत्र मिळून ही जगातील सर्वात मोठी चपाती बनवतात. एवढंच नाही तर सुमारे तासाभराच्या मेहनतीनंतर ही चपाती तयार होते. ही चपाती बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात गव्हाचं पीठ वापरले जाते. ही चपाती तयार झाल्यावर त्याचं वजन 145 किलोपर्यंत असतं. आता एवढी मोठी चपाती भाजण्यासाठीही तेवढ्याचं आकाराच तवा लागणार... ही चपाती भाजण्यासाठी मंदिराजवळच एक खास मोठा तवा आहे. या तव्यावर ही खास चपाती भाजली जाते. चपाती भाजण्यासाठीही अनेकांना काम करावं लागतं आणि चपाती जळू नये म्हणून तव्याखालील आच मंद ठेवली जाते.