संत रामदास त्यांच्या त्यांच्या ठिकाणी मोठे असतील, किंबहुना आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास तुम्ही जर जोडलं तर ते तसं होऊ शकत नाही शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब आहेत, अशा शब्दात स्वराज्य पक्षप्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेला दावा खोडून काढला. शिराळ्यामध्ये अमित शाह यांनी केलेल्या दाव्यानंतर संभाजीराजे यांनी अत्यंत कडक शब्दात प्रतिक्रिया दिली. संभाजीराजे म्हणाले की, त्यांचं (समर्थ रामदास) महत्त्व असेल तर ते त्या ठिकाणी असावे. त्यांच्या महत्त्वाला आम्ही काय चॅलेंज करत नाही. समर्थ रामदासांना शिवाजी महाराज सोबत जोडायचं हे बरोबर नाही आणि न पटणारे असल्याचे संभाजीराजे म्हणाले. शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब असल्याचे संभाजीराजे म्हणाले.
शिराळामधील सभेत अमित शाह काय म्हणाले?
शिराळ्यामधील भाजप उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचारार्थ बोलताना अमित शाह म्हणाले की, समर्थ रामदास यांचे पाय या भूमीला लागले आहेत. समर्थ रामदास यांनी गुलामीच्या काळात महाराष्ट्रातील युवकांना एकत्र करून शिवाजी महाराज यांना पाठींबा देण्याचं काम केलं. त्या समर्थ रामदासांना मी नमन करतो. यानंतर संभाजीराजे यांनी शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
शरद पवार याना निवडणुकीत तुम्हाला उत्तर द्यावे लागणार
दरम्यान, अमित शाह यांनी सांगलीमधील सभेत बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, सांगलीत लवकरच विमानतळाचा प्रश्न मार्गी लावू, या विमानतळावर अनेक ठिकाणाहून लवकरच विमाने धावतील. सांगलीत वसंतदादाच्या नावाने आशिया खंडातील सर्वांत मोठा कारखाना होता, तो कारखाना शरद पवारांनी आणि काँग्रेसने सत्ता असताना विकण्याचा प्रयत्न केला. हळदीच्या व्यापारासाठी मजबूत केंद्र सांगलीत बनवू. महाराष्ट्रात नवीन उद्योग येत नाहीत असा शरद पवार, मविआ म्हणत आहे. दोन वर्षात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात होत आहे. सांगलीत देखील लवकरच नवीन मोठा प्रोजेक्ट होणार असल्याचे सांगितले. शरद पवार यांना निवडणुकीत तुम्हाला उत्तर द्यावे लागणार आहे. उद्धव बाबू तुम्हाला आता मुख्यमंत्री बनवणार नाहीत, एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नका. छत्रपती संभाजी नगरला विरोध करणाऱ्या राम मंदिराला विरोध करणाऱ्या सोबत तुम्ही बसला आहात. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तुम्ही सत्तेसाठी तिलांजली दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या