Cyclone Biparjoy : बिपरजॉय भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज, हवामान विभागाचा धोक्याचा इशारा
Biporjoy Cyclone Update : चक्रीवादळाने मार्ग बदलल्यामुळे आता भारतालाही धोका निर्माण झाला आहे. गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टी भागात धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
![Cyclone Biparjoy : बिपरजॉय भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज, हवामान विभागाचा धोक्याचा इशारा biparjoy likely to stretch nearly 10 days arabian sea cyclones are lasting longer biporjoy cyclone update Cyclone Biparjoy : बिपरजॉय भारताच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज, हवामान विभागाचा धोक्याचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/05/11/60cbd50924eaa80a8c77c0c1eecf45bf1683766975984169_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Weather Forecast : बिपरजॉय चक्रीवादळाची (Biparjoy Cyclone Update) तीव्रता वाढली आहे. बिपरजॉयने (Cyclone Biporjoy) अत्यंत तीव्र चक्रीवादळाच्या श्रेणीत प्रवेश केला आहे. चक्रीवादळाने मार्ग बदलल्यामुळे आता भारतालाही (India) धोका निर्माण झाला आहे. मार्ग बदलल्यानंतर आता बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात (Gujrat) आणि पाकिस्तानच्या (Pakistan) किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
भारतालाही बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका
अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं 10 दिवसानंतर 6 जून रोजी चक्रीवादळात रुपांतर झालं. हे चक्रीवादळ मोखा चक्रीवादळानंतरचं सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचं बोललं जात आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, बिपरजॉय चक्रीवादळ कच्छच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे जास्त काळ टिकणारे चक्रीवादळ आहे. बिपरजॉय अलिकडच्या दशकात भारतावर प्रभाव टाकणारं आणि सर्वात दीर्घकाळ टिकणारं चक्रीवादळ ठरलं आहे.
Cyclone Alert for Saurashtra & Kutch Coast: Yellow Message. ESCS BIPARJOY over eastcentral Arabian Sea, at 2330 IST of 11th Jun near lat 18.9N & long 67.7E, Likely to cross between Mandvi (Gujarat) and Karachi (Pakistan) by noon of 15thJune. More details: https://t.co/EGetkpfaKk pic.twitter.com/ZUbomX4bPY
— India Meteorological Department (@Indiametdept) June 11, 2023
कच्छच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याची शक्यता
बिपरजॉय चक्रीवादळ कच्छच्या किनारपट्टी धडकण्याची शक्यता असल्यामुळे या भागात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. स्थानिक प्रशासन पूर्ण तयारीनिशी सज्ज झालं आहे. आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं काम प्रशासनाकडून सुरु आहे.
सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टी भागात येलो अलर्ट
भारतीय हवामान विभागाने ट्विट करत सांगितलं आहे की, ''चक्रीवादळामुळे सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी धोक्याचा इशारा : येलो अलर्ट. बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व मध्य अरबी समुद्रावर 11 जूनच्या 2330 IST वाजता अक्षांश 18.9N आणि लांब 67.7E जवळ होतं. चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारपर्यंत मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.''
चक्रीवादळामुळे 'हे' सर्व जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता
दरम्यान, चक्रीवादळामुळे 14 जून आणि 15 जून दरम्यान गुजरातमधील कच्छ, द्वारका, पोरबंदर, जामनगर राजकोट, जुनागड आणि मोरबी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे हे सर्व जिल्हे प्रभावित होण्याची शक्यता आहे. जामनगर परिसरात अनेक तेल कंपन्यांच्या रिफायनरी, सोबतच कांडला पोर्ट देखील असल्याने चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे.
कोकण, मुंबई किनारपट्टी लगत वाऱ्यांचा वेग वाढणार
आज उत्तर कोकण आणि मुंबई किनारपट्टी लगत भागात वाऱ्यांचा वेग अधिक असणार आहे. सोबतच काही ठिकाणी पावसाची देखील शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाचा लँडफॉल 15 जूननंतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 2 ते 3 दिवस गुजरात, राजस्थान आणि दिल्लीत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्याच्या किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस
महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकण्याचा धोका नाही, पण या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येत आहे. राज्याच्या किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. कोकण आणि गोवा किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. दरम्यान, वादळाच्या सावटाखालीच राज्यात रविवारी मान्सून दाखल झाला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Biparjoy Cyclone : बिपरजॉय चक्रीवादळाने मार्ग बदलला! तीव्रता वाढली, तौक्ते चक्रीवादळानंतरचं सर्वात शक्तीशाली चक्रीवादळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)