Kolhapur Crime: कोल्हापुरात चोरी, घरफोड्यांचे सत्र सुरुच; टिकावने दरवाजा तोडून साडे सात लाखांचे दागिने लंपास
Kolhapur Crime: चोरी, दरोडे, घरफोड्यांनी अवघा कोल्हापूर जिल्हा भयभीत होऊन गेला आहे. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
Kolhapur Crime: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात (Kolhapur News) चोरी, घरफोड्यांचे सत्र सुरुच आहे. कोल्हापूर शहारातील जरगनगरमध्येच चार घरफोड्या झाल्या आहेत. करवीर तालुक्यातील कोपार्डेत व्यावसायिकाच्या घराचा दरवाजा टिकावने तोडून साडे सात लाखांचे दागिने लंपास करण्यात आले. इचलकरंजीमध्येही तीन चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे चोरी, दरोडे, घरफोड्यांनी अवघा जिल्हा भयभीत होऊन गेला आहे. जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
टिकावने दरवाजा तोडून साते सात लाखांचे दागिने लंपास
करवीर तालुक्यातील कोपार्डेत टिकावने दरवाजा तोडून स्क्रॅप व्यावसायिकाच्या घराचा दरवाजा टिकावने तोडून नऊ तोळे दागिने आणि अडीच लाख रोख रकमेवर डल्ला मारला. व्यावसायिक विलास जगताप कोल्हापूरमध्ये विवाहासाठी आले असताना हा प्रकार घडला. चोरट्यांनी टिकावने दरवाजा तोडून घरात प्रवेश केल्यानंतर तिजोरी फोडून दागिने लंपास केले. घरातील दोन तिजोरी चोरट्यांनी फोडल्या. अन्य एक तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करताना चाकू अडकून पडल्याचे निदर्शनास आले. कोपार्डेपासून हाकेच्या अंतरावर असेलल्या बांलिग्यामधील कात्यायनी ज्वेलर्समधील दरोडा ताजा असतानाच ही घटना घडल्याने दहशत निर्माण झाली आहे.
जरगनगरमध्ये डाॅलरवर डल्ला, एकाच रात्रीत चार घरात चोऱ्या
कोल्हापूर शहरातील उपनगर असलेल्या जरगनगरमध्ये चार घरांमध्ये चोरीच्या घटना घडल्या. यामधील एका घरातील 450 डॉलर लंपास करण्यात आले. अन्य दुसऱ्या घरातील सोन्याचे दागिन्यांसह 61 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. या गुन्ह्याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू केला आहे. एकाच रात्रीत चार घरात चोऱ्या झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
इचलकरंजीत तीन चोरीच्या घटना
कोल्हापूर शहरात चोऱ्यांचे सत्र सुरुच असतानाच इचलकरंजीमध्येही चोरीची मालिका सुरुच आहे. शहरात विविध तीन ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या. तीन ठिकाणच्या चोरीमध्ये दोन लॅपटॉप आणि 3 मोबाईल असा एकूण सव्वा लाखांवर मुद्देमाल चोरीला गेला आहे. डिकेटीई कॉलेजनजीक पटवेगार हॉस्टेलच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या अभिमन्यू पाटीलच्या पहाटेच्या सुमारास उघड्या दरवाज्यातून चोरट्याने प्रवेश करत दोन लॅपटॉप चोरले. दुसरीकडे तारदाळमध्ये देवेंद्रसिंह पवार हे सुद्धा घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपले असतानाच चोरट्याने उशीजवळ ठेवलेला मोबाईल लंपास केला. श्रीधर कडलीमट्टी हे सुद्धा घराच्या टेरेसवर दोन मोबाईल उशीजवळ ठेवून झोपले होते. ते चोरांनी लंपास केले.
इतर महत्वाच्या बातम्या :