एक्स्प्लोर

Kalyan News: भाईगिरीच्या वर्चस्वाचा वाद; एका गुन्हेगाराने दुसऱ्या गुन्हेगाराची भर रस्त्यात संपवलं; कल्याणमधील घटनेने खळबळ

Kalyan News:  भाईगिरीच्या वादातून एका गुंडांने दुसऱ्या गुंडाला भरचौकात सपासप वार करून संपवले असल्याची घटना समोर आली आहे.

Kalyan Crime News:  मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात गुन्हेगारांचा (Crime In Thane) चढता आलेख पाहता, जिल्ह्यात रोजच विविध शहरातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत  खून, दरोडे, अत्याचार , फसवणुकी, घरफोड्या चोऱ्याच्या गुन्हांच्या नोंदीवरून दिसून येत आहेत. आता तर परिसरात वर्चस्वासाठी दोन गुंड एकमेकांच्या जीवावर उठल्याची घटना समोर आली आहे. 

या घटनेत  एका गुन्हेगाराकडून दुसऱ्या गुन्हेगाराची भर रस्त्यात चाकूने सपासप वार करून हत्या करण्यात आली. ही घटना कल्याण पूर्वेतील समता नगर भागात असलेल्या नवीन दुर्गामाता मंदिर रोडवर घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लेखोर गुंडाला अटक केली आहे. टक्या उर्फ जयेश डोईफोडे ( वय 32) असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. तर अमोल लोखंडे (वय 39) असे हत्या झालेल्या गुडांचं नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

कल्याण पूर्वेतील विविध भागात स्थानिक गुंडांच्या टोळ्या आजही आपआपल्या भागात गुन्हेगारीचे वर्चस्व राहावे यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसतात. त्यातून नेहमीच टोळी युद्ध पाहवयास मिळत आहे. त्यातच  मृत अमोल व आरोपी जयेश यांच्यात पूर्वीपासूनच पूर्ववैमनस्य होते. परिसरात वर्चस्व राखण्यासाठी  पुन्हा दोघांमध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास  कल्याण पूर्वेतील  समता नगर भागातील नवीन दुर्गामाता मंदिर रोडवर वाद झाला. याच वादातून  भररस्त्यात  हल्लेखोर गुंड जयेशने अमोलची धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या  करून घटनास्थळावरून फरार झाला होता. 

दरम्यान घटनेची माहिती कोळसेवाडी पोलिसांना (Kolsewadi Police Station) मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पंचनामा करत अमोलचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना केला. दुसरीकडे हल्लेखोर जयेशवर हत्येचा गुन्हा दाखल केला. कोळसेवाडी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असता,  काही तासातच  त्याला ताब्यात घेऊन अटक केली. अटक आरोपीला आज (सोमवारी )कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले. आरोपीला अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक  तपास कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) एस. जी. गवळी करीत आहेत.

घरात घुसून तरुणीवर बलात्कार,, नराधम गजाआड

कल्याण पूर्व पीसवली परिसरात एका तरुणीवर घरात घुसून तरुणाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत पीडित तरुणीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत सागर गाडे या नराधमाला अटक केली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, त्यांच्याशी ओळख, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणं पुण्यातील डॉक्टरला भोवलं, गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा
Khalil Shaikh Ravindra Dhangekar : खलिल शेख आत्महत्या प्रकरणात रविंद्र धंगेकर अडचणीत, 10 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता 
खलिल शेख आत्महत्या प्रकरणात रविंद्र धंगेकर अडचणीत, 10 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता 
धक्कादायक! जळगावात धावत्या बसमधून सराफा व्यवसायिकाची 25 लाखांची बॅग लंपास, 24 तासाच्या आत चार आरोपींना अटक
धक्कादायक! जळगावात धावत्या बसमधून सराफा व्यवसायिकाची 25 लाखांची बॅग लंपास, 24 तासाच्या आत चार आरोपींना अटक

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget