(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Budget 2023: मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी 20 हजार कोटींची तरतूद; फडणवीसांची घोषणा
Maharashtra Budget 2023: मराठवाड्याचा दुष्काळ (Marathwada Drought) मिटवण्यासाठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
Maharashtra Budget 2023: राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडून महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षाकरता अर्थसंकल्प (Budget) सभागृहात सादर करण्यात अलाहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या असून, मराठवाड्याचा दुष्काळ (Marathwada Drought) मिटवण्यासाठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, मराठवाड्यातील दुष्काळ मुक्तीसाठी सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय वॉटर ग्रीड निर्माण करण्याची कारवाई सुरु आहे. हर घर जल योजेन अंतर्गत मराठवाडा वाटर ग्रीड योजनेकरिता प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे. तर मराठवाड्याचा दुष्काळ मिटवण्यासाठी 20 हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा
- शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनांचे लाभ
- 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना योजनेचे लाभ देणार
- महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.
- 12.84 लाख पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा
- महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा
- आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्यांकडून.
- आता शेतकर्यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता
- शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा
- 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ;
- महाराष्ट्रातील शेतकर्यांना आता 12000 रुपयांचा सन्माननिधी
- प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
- प्रति शेतकरी, प्रतिवर्ष 6000 रु. राज्य सरकार देणार
- केंद्राचे 6000, राज्याचे 6000 असे 12000 रु.प्रतिवर्ष मिळणार
- राज्यातील विमानतळांचा विकास होणार…
- शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनलसाठी 527 कोटी
- छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी 734 कोटी
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
- पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
- नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी