एक्स्प्लोर

Maharashtra Budget : देवेंद्र फडणवीसांचा घोषणांचा पाऊस, कृषी क्षेत्रासाठी केल्या 'या' महत्त्वाच्या घोषणा

Devendra Fadnavis : राज्यातील शेतकऱ्यांसाठी 'मागेल त्याला शेततळे' या योजनेचा विस्तार वाढवण्यात येणार आहे.

Maharashtra Budget 2023: राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कृषी क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस पाडल्याचं दिसून येतंय. कृषी क्षेत्रासाठी त्यांनी अनेक घोषणा केल्या असून त्यामध्ये नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन, महाकृषीविकास अभियान, एक रुपयात पीक विमा योजना आणि केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त 6000 रुपये देणार असल्याची घोषणा केली. 

कृषी खात्यासाठीच्या महत्त्वाच्या घोषणा 

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषीविकास अभियान

- राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान राबविणार
- पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत
- तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना
- एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार
- 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार

- मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार
- आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण
- मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर
- या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार

विदर्भ आणि मराठवाड्यात केसरी शिधा धारकाना आता रोख रुपये दिले जातील. प्रतिव्यकती 1800 रुपये दिले जातील

काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना!

- 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड
- काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव
- उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र
- कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना
- 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत

- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
- आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
- ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार
- अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

- नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
- 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
- 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
- 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी

नागपुरात कृषी सविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र

- नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश
- या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार
- नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /20 कोटी रुपये तरतूद

केंद्र सरकारच्या किसान सन्मान योजना या योजनेत आणखी सहा हजार रुपयांची भर केंद्र सरकार घालणार. त्यामुळे शतकऱ्यांना वर्षाकाठी 12 हजार मिळणार

-  प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
- नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
- केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
- 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
- 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP MajhaManoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Rishabh Pant : '...माझी सर्व कमाई दान करणार', ऋषभ पंतची विश्वचषकादरम्यान मोठी घोषणा! 
Kolhapur Viral Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Video : कोल्हापुरात रस्त्यावर यू टर्न घेणाऱ्या रिक्षाचा विचित्र अपघात, संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद
Embed widget