Ajit pawar speech : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थोरल्या पवारांवर निशाणा ते पहाटेच्या शपथविधीवरुन अनेक गौप्यस्फोट, अजित पवारांचं भाषण जसेच्या तसे

Maharashtra NCP Political Crisis LIVE : अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात उलथापालथ. शरद पवार की, अजित पवार? कोणाची साथ द्यायची, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 Jul 2023 09:59 PM
Mumbai Local train : मुंब्रा स्थानकात लोकल रुळावरून घसरली, कल्याणकडे जाणारी वाहतूक रखडली; प्रवाशांचे हाल

मुंब्रा स्थानकात लोकल रुळावरून घसरली, कल्याणकडे जाणारी वाहतूक रखडली; प्रवाशांचे हाल

Ajit pawar speech : उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थोरल्या पवारांवर निशाणा ते पहाटेच्या शपथविधीवरुन अनेक गौप्यस्फोट, अजित पवारांचं भाषण जसेच्या तसे
शरद पवारांच्या वयावरुनही अजित पवारांनी निशाणा साधलाय. अजित पवार आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊया   Read More
Kedar Shinde : प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलाय 'बाईपण भारी देवा'; 'सिध्दीविनायकाचा महाप्रसाद' म्हणत केदार शिंदेंनी मानले आभार
Kedar Shinde : 'बाईपण भारी देवा' या सिनेमाबाबत दिग्दर्शक केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. Read More
Shirdi Sai Baba : साईचरणी गुरूपौर्णिमा उत्सवात कोट्यवधींची गुरूदक्षिणा; तीन दिवसांत सात कोटींचं दान 
Shirdi Sai Baba : शिर्डीतील (Shirdi) साईबाबा चरणी (Saibaba) गुरूपोर्णिमा उत्सवात तब्बल सात कोटींचं दान अर्पण करण्यात आलं आहे. Read More
Ajit Pawar: आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? अजित पवारांचा अप्रत्यक्षरित्या सुप्रिया सुळेंवर निशाणा
जर आंबेगावात पवार साहेबांनी सभा घेतली तर मलाही प्रत्युत्तर म्हणून सात दिवसांनी सभा घ्यावी लागेल. असे म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांना आव्हान दिले.  Read More
Amol Kolhe आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं नाही तर या महाभागांना पांडुरंग समजलाच नाही; अमोल कोल्हेंचा पलटवार...
राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर पलटवार केला आहे. आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं नाही, तर या महाभागांना पांडुरंग समजलाच नाही, असं म्हणत अमोल कोल्हेंनी पलटवार केला आहे. Read More
Aamir Khan : आमिर खान कमबॅक करण्यासाठी सज्ज! राजकुमार हिरानींसोबत करणार बायोपिक
Aamir Khan : आमिर खान रुपेरी पडद्यावर कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे. Read More
Maharashtra NCP Crisis : अजित पवारांचा थोरल्या पवारांवर हल्लाबोल; केले 'हे' 4 गौप्यस्फोट
Maharashtra NCP Crisis : अजित पवारांच्या शपथविधीनंतर आज एमएनटी येथील बैठकीत बोलताना थोरल्या पवारांवर थेट टिकास्त्र डागलं, अनेक गौप्यस्फोट केले. Read More
Shah Rukh Khan : शाहरुख खानने रचला नवा विक्रम! 'जवान' अन् 'डंकी'ने रिलीजआधी केली 500 कोटींची कमाई
Shah Rukh Khan : शाहरुख खानचे 'जवान' आणि 'डंकी' हे सिनेमे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. Read More
Praful Patel: शिवसेनेला मिठी मारू शकतो, तर मग भाजप का नाही? अजितदादांना बदनाम करण्यासाठी काहींचा कट; प्रफुल्ल पटेल यांचा आरोप 
अजितदादांना बदनाम करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांनी केला. शरद पवारांवर सर्वाधिक आरोप शिवसेनेनं केले आहेत, शिवसेनेला मिठी मारू शकतो, तर भाजप का नाही? असेही पटेल म्हणाले.  Read More
Chhagan Bhujbal NCP : पवार साहेब, आमच्यासाठी विठ्ठल! फक्त बडव्यांना बाजूला करा अन् आम्हाला पोटाशी धरा : छगन भुजबळ 
Chhagan Bhujbal NCP : शरद पवार साहेब तुमच्याभोवतीच्या बडव्यांना बाजूला करा, आम्हाला आशीर्वाद द्या, असे आवाहन भुजबळांनी केले. Read More
Snehal Shidam : 'चला हवा येऊ द्या' फेम स्नेहल शिदम आजही राहते विलेपार्लेच्या चाळीत; अभिनेत्रीच्या वडिलांनी होणाऱ्या जावयासाठी ठेवली 'ही' अट
Snehal Shidam : 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या माध्यमातून स्नेहल शिदम घराघरांत पोहोचली आहे. Read More
Pune News : ठाकरे बंधू एकत्र येणार? ठाणे, मुंबईनंतर पुण्यात झळकले पोस्टर
ठाणे, मुंबईनंतर पुण्यात ठाकरे बंधू एकत्र येणार ? अशा आशयाचे पोस्टर झळकले आहे. पुण्यातील स. प. महाविद्यालय चौक, टिळक रोड, कर्वे नगर, शिवणे आणि इतर ठिकाणी झळकले आहेत. Read More
Kolhapur Weather Update: कोल्हापुरात मुसळधारेचा इशारा, पण पावसाचा पत्ताच नाही; खरीप संकटात येण्याची चिन्हं
मंगळवारी कमाल तापमानाचा पारा 28 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. गेल्या 24 तासांत अवघ्या 5.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. केवळ राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. Read More
Rupali Chakankar : शरद पवार दैवत पण...! फार बोलायला लावू नका, आमच्याही शब्दाला तलवारीची धार आहे; रुपाली चाकणकरांचा भर सभेत हल्लाबोल
महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि अजित पवारांच्या गटात सामील झालेल्या रुपाली चाकणकरांनी मुंबईतील भर सभेत शरद पवारांसोबत असलेल्या नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. Read More
Maharashtra NCP Crisis : आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय; छगन भुजबळांचा नेमका रोख कोणाकडे?
NCP Political Crisis : छगन भुजबळ यांनी बोलताना आमच्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय, असं वक्तव्य केलं आहे. पण त्यांचा नेमका रोख कोणाकडे? याच्या चर्चा रंगल्या आहेत. Read More
2023 Kia Seltos facelift: अखेर प्रतीक्षा संपली! कियाची नवी कार लॉन्च; सनरूफसह Kia Seltos मध्ये दमदार फिचर्स
Kia Seltos: KIA ने तीन इंजिन पर्यायांसह नवीन Seltos सादर केली आहे. यामध्ये, 1.5L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल (115bhp/144Nm), 1.5L डिझेल (115bhp/253Nm) आणि 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन समाविष्ट आहेत. Read More
चल आपण पळून जाऊ... लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मेहुणीवर अत्याचार; संभाजीनगरमधील घटना
Chhatrapati Sambhaji Nagar : या प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Mr And Mrs Mahi : माहीच्या आयुष्यावर पुन्हा एक चित्रपट; धोनीची भूमिका कोण साकारणार? चाहते उत्सुक
Mr And Mrs Mahi : 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Nashik Congress : "जनतेसाठी एकमेव आश्वासक पक्ष, काँग्रेस म्हणू अन् काँग्रेस आणू"; नाशिकमधील फलक चर्चेत 
Nashik Congress : नाशिक शहरात काँग्रेस पक्षाकडून 'काँग्रेस म्हणू आणि काँग्रेसच आणू,' अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. Read More
Amar Mulchandani ED Arrest : सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरणी अमर मुलचंदानीला ईडीकडून अटक; काय आहे प्रकरण?
पुण्यातील व्यवसायिक अमर मुलचंदानीला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष होते. त्यांना 1 जुलै रोजी अटक केली आहे. Read More
Sangli Crime: अल्पवयीन मुलीचे नात्यातील युवकासोबत प्रेमसंबंध, सांगून ऐकत नसल्याने वडिलांनीच केला खून; सांगली जिल्ह्यातील धक्कादायक घटना
वडिलांनी केलेल्या हल्ल्यात श्रेया गंभीर जखमी झाली होती. तिला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. वडील संतोष जाधवच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Read More
Kangana Ranaut : प्रतीक्षा संपली! कंगना रनौतच्या 'तेजस'ची रिलीज डेट समोर; वैमानिकेच्या भूमिकेत झळकणार 'पंगाक्वीन'
Kangana Ranaut : कंगना रनौतचा 'तेजस' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. Read More
Sharad Pawar: दादांचा कारभार, पवारच सूत्रधार? प्रत्येकाच्या मनात डोकावतोय प्रश्न, पण याची कारणं काय?
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत थेट लोकांमध्ये जाऊन संघर्षाची भाषा केली. पवारांच्या याच पत्रकार परिषदेनंतर प्रश्न उपस्थित झाला की राष्ट्रवादीच्य्या बंडाला पवारांचा अघोषित पाठिंबा तर नाही आणि त्याला कारणंही तशीच आहेत Read More
Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीसाठी निर्णायक दिवस; पुणे शहर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पाठिशी तर पिंपरी-चिंचवड अजित पवारांच्या पाठिशी; अनेक नेते अजूनही संभ्रमात
आज राष्ट्रवादीसाठी निर्णायक दिवस आहे. पुणे शहर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पाठिशी तर पिंपरी-चिंचवड अजित पवारांच्या पाठिशी असल्याचं चित्र आहे. बाकी नेते अजूनही संभ्रमात आहेत. Read More
Jalna Rain Update : जालना जिल्ह्यात आज यलो अलर्ट जारी; वीजेच्या कडकडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता
Jalna Rain Yellow Alert : तसेच 6 ते 8 जुलै या कालावधीत हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.  Read More
Pawan Kalyan : पहिलं लग्न 11 वर्षे, दुसरं दोन, तिसरं 10; तीन वेळा थाटला संसार, आता पवन कल्याण तिसऱ्या पत्नीपासून घेणार घटस्फोट
Pawan Kalyan : दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याण आता तिसऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. Read More
Nashik Sharad Pawar : शरद पवारांचं पहिलं टार्गेट छगन भुजबळ; पहिली सभा होणार भुजबळांच्या येवला मतदारसंघात...
Nashik Sharad Pawar : शरद पवार यांची उत्तर महाराष्ट्रातील पहिली सभा नाशिक जिल्ह्यातील येवला येथे होणार आहे. Read More
Samruddhi Mahamarg: धक्कादायक वास्तव! दुर्घटना झाली तेव्हा बस ओव्हरटेक लेनमधून धावत होती, बुलढाणा दुर्घटनेचा फॉरेन्सिक अहवाल समोर
Samruddhi Mahamarg: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ समृद्धी महामार्गावर अपघात झालेल्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस संदर्भात फॉरेन्सिक फायर रिपोर्ट समोर आला आहे. Read More
Nashik Sharad Pawar : शरद पवारांचे पहिले टार्गेट 'छगन भुजबळ', पहिली सभा होणार भुजबळांच्या येवला मतदारसंघात..

Nashik Sharad Pawar : नाशिकमधून (Nashik) राष्ट्रवादीसाठी मोठी बातमी येत असून  येवल्यातील जेष्ठ नेते व राष्ट्रवादीचे जुने नेते ऍड. माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांनी पुन्हा पक्षात प्रवेश केला आहे. शिवाय रात्री उशिरा त्यांनी शरद पवारांची भेट घेत पक्षात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर शरद पवार (Sharad Pawar) यांचा महाराष्ट्र दौऱ्याची सुरवात नाशिकपासून होत असून येवल्यात 8 जुलै रोजी पहिली सभा होणार असल्याचे समजते आहे. 

Sangli News: खोट्या अॅट्राॅसिटी गुन्ह्यात अडकवून खंडणीची मागणी केल्याने तरुणाची आत्महत्या; गावच्या सरपंचाला बेड्या, गावकरी उतरले रस्त्यावर
महेशचा एक भाऊ सुनील जाधव हा केंद्रीय राखीव पोलीस दलात जवान आहे. त्याच्यावरही गेल्यावर्षी पोलिसांत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल होता. Read More
Shah Rukh Khan : अमेरिकेत झालेल्या अपघातानंतर शाहरुख खान मायदेशी परतला; मुंबई विमानतळावर पत्नी गौरीसोबत स्पॉट
Shah Rukh Khan : अपघातानंतर किंग खान मायदेशी परतला असून मुंबई विमानतळावरील त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More
Chhatrapati Sambhaji Nagar Rain : संभाजीनगरच्या संजरपूरवाडी परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; नदी-नाले तुडूंब भरून वाहू लागले
Chhatrapati Sambhaji Nagar Rain Update : वैजापूर तालुक्यातील संजरपूरवाडी आणि करंजगाव शिवारात ढगफुटीसदृश्य पाऊस मंगळवारी सायंकाळी पडला. Read More
Ajit Pawar : अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार, राष्ट्रवादी प्रतोद अनिल पाटील यांचा दावा
NCP Political Crisis : पक्षातील 95   टक्के आमदारांचे समर्थन अजित पवारांसोबत आहे. तसेच 40 आमदारांचे प्रतिज्ञापत्र अजित पवारांकडे आल्याचा दावा अजित पवार गटातील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.   Read More
Nashik Saroj Ahire : शरद पवार हे वडिलांसमान, मात्र अजित पवारांच्या शपथविधीलाही उपस्थित; नाशिकच्या सरोज अहिरे कुणासोबत?
Nashik Saroj Ahire : शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अगदी जवळच्या असलेल्या आमदार सरोज अहिरे नेमक्या कुणाच्या बाजूने हा प्रश्न अनुत्तरित आहे.  Read More
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू; आक्षेपार्ह घटनांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी प्रशासनाचा निर्णय
कोल्हापूर जिल्ह्यात 19 जुलैपर्यंत हा बंदी आदेश लागू असेल. त्यामुळे कलम 37 (3)  अन्वये जिल्ह्यामध्ये पाच अगर पाचहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव जमणेस, मिरवणुका काढणे आणि सभा घेणे, याला बंदी असेल.  Read More
Temple Dress Code : छत्रपती संभाजीनगरमधील मंदिरांमध्येही आता 'ड्रेसकोड'; वेगवेगळ्या 20 मंदिरात लागले फलक
Temple Dress Code : शहरातील महत्वाच्या मंदिरापैकी असलेल्या वरद गणेश मंदिर, खडकेश्वर महादेव मंदिर, काळा गणपती मंदिरासह एकूण 20 मंदिरांत असे फलक पाहायला मिळत आहे. Read More
Baipan Bhaari Deva : बॉलिवूडला भिडल्या 'त्या' सहाजणी; 'बाईपण भारी देवा'ने पाच दिवसांतच जमवला 9.75 कोटींचा गल्ला
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुकामूळ घालत आहे. Read More
Hasan Mushrif vs Samarjeetsinh Ghatge: कट्टर विरोधक हसन मुश्रीफ मंत्री होताच नाराज समरजित घाटगेंना नेमका फडणवीसांना कोणता शब्द दिला? 
मुश्रीफ यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच राजे भूमिगत झाले होते. संपर्कात असणारे रविवार दुपारपासून त्यांचा संपर्क होत नव्हता. मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. Read More
अजित पवारांना रविवारी सकाळी भेटले तेव्हा मला त्यांच्या निर्णयबद्दलल मला काहीही महित नव्हतं : सु्प्रिया सुळे
Supriya Sule : अजित पवारांच्या निर्णयामागे शरद पवारच होते, या चर्चांचं सुप्रिया यांनी खंडन केले आहे. Read More
72 Hoorain : '72 हुरैन'च्या निर्मात्यांविरोधात मुंबईत तक्रार दाखल; मुस्लिम समाजाची प्रतीमा चुकीची दाखवल्याचा आरोप
72 Hoorain : '72 हुरैन' हा सिनेमा रिलीजआधीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. Read More
Morning Headlines 05 July : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... Read More
Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंचा नागपूर दौरा रद्द, रात्रीच तडकाफडकी मुंबईत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पुन्हा नवा ट्विस्ट?
Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागपूर दौरा रद् झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. Read More
Maharashtra NCP Crisis : राज्यात सत्तेसाठी गुवाहाटीत 'रेडा' बळी दिला, पण रेड्यानं उलटा शाप दिला; सामनातून शिंदेंना चिमटे
Maharashtra NCP Crisis : दिल्लीवाल्यांची लाथ आणि फडणवीसांचा बुक्का अशा कोंडीत शिंदे सापडले आहेत, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे. Read More
राष्ट्रवादीसाठी आज निर्णायक दिवस; शरद पवार, अजित पवारांनी बोलावल्या स्वतंत्र बैठका, आमदारांना व्हीप जारी
Maharashtra NCP Crisis : आजचा दिवस महाराष्ट्रातील राजयकीय उलथापालथी दरम्यान अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सध्या सुरू असलेल्या राजकीय गोंधळात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं आज शक्तिप्रदर्शन असणार आहे. Read More

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील (Nationalist Congress Party) बंडानंतर राज्यातील राजकारणात (Maharashtra Politics) मोठी उलथापालथ झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप (BJP) आणि शिंदे गटाच्या (Shinde Group) साथीनं उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांची साथ मिळाल्यामुळे नक्की भाजपची ताकद वाढली आहे. पण दुसरीकडे आधीपासूनच भाजपसोबत असलेला आणि शिवसेनेतून (Shiv Sena) बंड करुन बाहेर पडलेला शिंदे गट मात्र नाराज असल्याच्या चर्चा आहेत. तशी नाराजी शिंदेंच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी शिंदेंकडे व्यक्त केल्याचीही माहिती मिळत आहे. 


अजित पवारांच्या शपथविधीनंतर काल (सोमवार) शिंदे गटाची महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पार पडली. याच बैठकीत शिंदेंच्या मंत्री आणि आमदारांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे.  तसेच, रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरुनही शिंदे गटातील काही मंत्री नाराज आहेत. 


शिंदे गटातील सर्व मंत्र्यांनी सोमवारी सकाळी मुख्यमंत्री शिंदे यांची त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी कॅबिनेट मंत्र्यांसह उदय सामंत (Uday Samant), गुलाबराव पाटील (Gulab Patil), शंभूराज देसाई, शिंदे गटाचे नेते दादा भुसे, संदिपान भुमरे उपस्थित होते. प्रत्येकाची मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी एक छोटीशी बैठक झाली ज्यात त्यांनी विभागांच्या संभाव्य वाटपावर चर्चा केली. यासोबतच अजित पवार आणि त्यांच्या निष्ठावंतांना सरकारमध्ये सामावून घेण्याच्या निर्णयावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली.


अजित पवारांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार राज्य मंत्रिमंडळात सामील झाले  आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीची भावना निर्माण झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्री, आमदार आणि खासदारांनी आपल्या मनातली खदखद एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवली. अजितदादा आणि राष्ट्रवादीचे आमदार राज्य सरकारमध्ये आल्यानं जुने वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली. यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून मार्ग काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्याचं समजत आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.