एक्स्प्लोर

Kolhapur Weather Update: कोल्हापुरात मुसळधारेचा इशारा, पण पावसाचा पत्ताच नाही; खरीप संकटात येण्याची चिन्हं

मंगळवारी कमाल तापमानाचा पारा 28 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. गेल्या 24 तासांत अवघ्या 5.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. केवळ राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे.

Kolhapur Weather Update: कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur News) गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाचा इशारा देऊनही पावसाने मंगळवारी पूर्ण दिवस दडी मारली. आज (5 जुलै) सकाळपासून कोल्हापूर  शहरात ढगाळ वातावरण असूनही उष्णता जाणवत आहे. जिल्ह्यात राधानगरी आणि भुदरगड तालुका वगळता गेल्या तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे मान्सूनचे उशिरा आगमन, त्यानंतर एक आठवडाभर तुरळक सरींनी लावलेल्या हजेरीनंतर पुन्हा उघडीप दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी गुरुवारपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, पावसाने दडी मारली आहे.  

मंगळवारी कमाल तापमानाचा पारा 28 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. गेल्या 24 तासांत अवघ्या 5.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. केवळ राधानगरी आणि भुदरगड तालुक्यात पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणांमध्येही पाण्यात संथगतीने वाढ सुरु आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात येत्या गुरुवारपर्यंत तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या काळात जिल्ह्यातील काही भागात सुमारे 100 ते 204 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता आहे, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. मात्र, कोल्हापूर शहरासह इतर ठिकाणी दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरू राहिला. मोठ्या पावसाची अपेक्षा असतानाही दमदार पावसाची वाट पाहावी लागत आहे.

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेने शिंगणापूर बंधाऱ्याचे बर्गे काढले नसल्याने मंगळवारी बंधारा पाण्याखाली गेला. माहिती मिळताच आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला सूचना देऊन बर्गे तत्काळ काढण्याच्या सूचना दिल्या. मात्र, पाण्याची पातळी आणि प्रवाह जास्त असल्याने काहीच बर्गे काढण्यात आले. मात्र,  बंधाऱ्यावरून वाहणारे पाणी बंद झाले आहे.पाणी कमी झाल्यानंतर उर्वरित बर्गे काढले जाणार आहेत. जोराचा पाऊस झाला आणि पुन्हा पाणी वाढले जाऊन बर्गे काढण्यात अडचणी येऊ शकतील. अशी परिस्थिती आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Chandrakant Patil : सतेज पाटलांनी गोकुळमध्ये  मतचोरी केली; 13 संचालक कसे निवडून आणले? चंद्रकांतदादांनी मतांचं गणित सांगितलं
सतेज पाटलांनी गोकुळमध्ये  मतचोरी केली; 13 संचालक कसे निवडून आणले? चंद्रकांतदादांनी मतांचं गणित सांगितलं
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Chandrakant Patil : पक्षाने, देवेंद्रजींनी आदेश दिला तर मी सतेज पाटलांविरोधात कोल्हापुरातून लढणार आणि त्यांना हरवणार; चंद्रकांत पाटील यांनी आव्हान स्वीकारलं
पक्षाने, देवेंद्रजींनी आदेश दिला तर मी सतेज पाटलांविरोधात कोल्हापुरातून लढणार आणि त्यांना हरवणार; चंद्रकांत पाटील यांनी आव्हान स्वीकारलं
Gokul : अमूल नंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ होणार; नूतन अध्यक्षांचे संकेत, पहिल्याच बैठकीत प्रस्ताव येणार
अमूल नंतर आता गोकुळच्या दूध दरातही वाढ होणार; नूतन अध्यक्षांचे संकेत, पहिल्याच बैठकीत प्रस्ताव येणार

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget