एक्स्प्लोर

अजित पवारांना रविवारी सकाळी भेटले तेव्हा मला त्यांच्या निर्णयाबद्दल काहीही माहीत नव्हतं : सुप्रिया सुळे

Supriya Sule : अजित पवारांच्या निर्णयामागे शरद पवारच होते, या चर्चांचं सुप्रिया यांनी खंडन केले आहे.

मुंबई : अजित पवारांच्या (Ajit Pawar)  निर्णयाबद्दल मला काहीही माहित नव्हतं, असा दावा सुप्रिया सुळे (Supriya Sule)  यांनी केला आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी रविवारचा घटनाक्रम सविस्तर सांगितला आहे. रविवारी मी बराच वेळ अजितदादांच्या निवासस्थानी होते, आमच्यात सविस्तर चर्चाही झाली. पण दादांच्या मनात काय चाललंय याबद्दल मला काही माहित नव्हतं. काही वेळानं एक-एक करून आमदार देवगिरी बंगल्यावर येऊ लागले, आणि मी निघाल्यावर अजितदादा आणि त्यांचे समर्थक राज भवनावर पोहोचले, असं सुप्रियांनी सांगितलं आहे. अजित पवारांच्या निर्णयामागे शरद पवारच होते, या चर्चांचं सुप्रिया यांनी खंडन केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, रविवारी मी जेव्हा देवगिरीवर गेली तेव्हा अजित पवारांना भेटायला अनेक आमदार आले होते. पण मला वाटलं ते प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडणुकीससंदर्भात चर्चा करण्यासाठी आले आहे. अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यासाठी विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती.  मी देवगिरी वरून निघाल्यावर अजित पवार राज भवनाकडे गेल्याची माहिती मिळाली.  

अजित पवारांच्या या निर्णयाची शरद पवारांनाही काहीच कल्पना नव्हती

अजित पवारांच्या या निर्णयामागे शरद पवार आहेत, अशा चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. मात्र सुप्रिया सुळेंनी या सर्व चर्चांचे खंडन केले  आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांच्या या निर्णयाची शरद पवारांनाही काहीच कल्पना नव्हती. जर पवार साहेबांना याची पुसटशीही कल्पना असती तर पवार साहेबांनी पक्षपुनर्बांधणीची मोहिम सुरू केली नसती. बंड केलेल्या नेत्यांविरोधात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंविरोधात कारवाई सुरू केली नसती.

अजित पवारांनी शरद पवारांना अंधारात ठेवून निर्णय घेतला 

अजित पवारांनी शिंदे-फडणवीसांशी  हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतल्याने  निराश झाल्याचे सुळे म्हणाल्या. वडिलांना (शरद पवार) अंधारात न ठेवता हा निर्णय अधिक सन्मानपूर्वक घेता आला असता, असेही  त्या  म्हणाल्या. अजित  पवारांच्या या निर्णयामुळे मी निराश झाले आहे. यापूर्वीही राष्ट्रवादीच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी पक्ष सोडला, पण त्यांना शरद पवारांना कधीच अंधारात ठेवले नाही. शरद पवारांची भेट घेऊन संघटना सोडण्याचे कारण सांगितले. शरद पवारांनी देखील त्यांना रोखले नाही. अजित पवारांच्या या निर्णयाचे  मला आश्चर्य वाटत नाही, पण मला धक्का बसला आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Nandurbar School Bus Accident : नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
नंदुरबारमध्ये स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Gujarat ATS arrests three ISIS terrorists: गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
Andheri : मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Leopard Attack: नाशिकच्या निफाडमध्ये बिबट्याचा थरार, दोन कुत्र्यांना केले ठार; घटना CCTV मध्ये कैद
Leopard Terror Pune : पुण्यात बिबट्याची दहशत, संरक्षणासाठी महिलांनी गळ्यात घातले खिळ्यांचे पट्टे
Mumbai Hawker Andheri पादचारी पूल अखेर फेरीवाला मुक्त, पोलिसांची मोठी कारवाई
Top 100 Headlines : 3.30 PM : टॉप 100 : 9 Nov 2025 : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : ABP Majha
Kalyan Politics: ठाकरेंना मोठा धक्का,पण शिंदेंनाच भाजपचा 'शह'? माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे भाजपमध्ये

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: 'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
'माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती बंद, हे मत चोर आहेत' राहुल गांधींचा हल्लाबोल
Nandurbar School Bus Accident : नंदुरबारमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असलेल्या स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
नंदुरबारमध्ये स्कूल बसचा अपघात, बस 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली, एका विद्यार्थ्याचा मृत्यू
Gujarat ATS arrests three ISIS terrorists: गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
गुजरात एटीएसकडून तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक; देशात हल्ल्यांची योजना, शस्त्रे गोळा करण्यासाठी गुजरातमध्ये
Andheri : मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
मुंबईतील पहिला पादचारी पूल फेरीवाला मुक्त, अंधेरी पोलिसांची कामगिरी, रेल्वे पुलावरील छेडछाडीच्या घटनांना आळा बसणार
Bacchu Kadu : राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा, म्हणाले मुख्यमंत्र्यांनी ही अवलाद...
राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस; प्रहारच्या बच्चू कडूंची थेट घोषणा, म्हणाले...
हा कसला ड्रोन सर्व्हे? फक्त आमचं घर बीकेसीचा भाग आहे का? पोलिसांनी परवानगी दिली होती, तर रहिवाशांना माहिती का दिली नाही? आदित्य ठाकरेंकडून प्रश्नांची सरबत्ती
हा कसला ड्रोन सर्व्हे? फक्त आमचं घर बीकेसीचा भाग आहे का? पोलिसांनी परवानगी दिली होती, तर रहिवाशांना माहिती का दिली नाही? आदित्य ठाकरेंकडून प्रश्नांची सरबत्ती
Solapur Crime news: बार्शी हादरली! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं
बार्शी हादरली! दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं
Sharad Pawar : भाजपसोबत युती नको, मूळ ओबीसींना प्राधान्य द्या, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीची इनसाईड स्टोरी
स्थानिक स्वराज संस्थांमध्ये भाजपसोबत युती नको, मूळ OBC ना प्राधान्य द्या, शरद पवारांच्या सूचना, सूत्रांची माहिती
Embed widget