एक्स्प्लोर

Morning Headlines 05 July : मॉर्निंग न्यूजमध्ये वाचा, देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...

1. राष्ट्रवादीसाठी आज निर्णायक दिवस; शरद पवार, अजित पवारांनी बोलावल्या स्वतंत्र बैठका, आमदारांना व्हीप जारी

Maharashtra NCP Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party) अजितदादांमुळे (Ajit Pawar) मोठं रामायण घडलंय. आता त्याच्या महाभारताची सुरूवात आज होणार आहे. कारण, एकीकडे अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची आज सकाळी 11 वाजता बैठक बोलवली आहे. तर दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक दुपारी 1 वाजता आयोजित केली आहे. तसे व्हिपही बजावण्यात आले आहेत. वाचा सविस्तर 

2. Maharashtra Politics : मुख्यमंत्री शिंदेंचा नागपूर दौरा रद्द, रात्रीच तडकाफडकी मुंबईत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पुन्हा नवा ट्विस्ट?

Maharashtra NCP Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या प्रचंड उलथापालथ सुरू आहे. कधी काय होईल याचा नेम लावणंही अशक्य झालं आहे. अजित पवारांच्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संघर्ष सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पण राष्ट्रवादीसोबतच शिवसेनेतही वेगवान घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतंय. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मंगळवारी रात्री उशिरा तडकाफडकी नागपूरहून (Nagpur News) मुंबईला (Mumbai News) परतले. वाचा सविस्तर 

3. AAP : विरोधी पक्षांना फोडण्यासाठी भाजपकडून तपास यंत्रणांचा वापर, अजित पवार हे त्याचा पुरावा; आपचा हल्लोबोल

AAP On NCP Crisis : विरोधी पक्षांना फोडण्यासाठी भाजपकडून (BJP) तपास यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं (AAP) केला आहे. महाराष्ट्रात अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केलं आहे. त्यांनी काही आमदारांसह भाजपला साथ देण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा पुरावा असल्याची भूमिका आपने मांडली. राजकीय घडामोडीवर आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह (MP sanjay singh) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. वाचा सविस्तर 

4. Rajasthan : सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सना 5 लाखांपर्यंत मिळणार जाहिरात; राजस्थान सरकारची मोठी घोषणा

Rajasthan News : तुम्ही सोशल मीडियावर (Social Media) सक्रिय (Active) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांच्या सरकारने राज्यातील सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सना 5 लाख रुपयांपर्यंतच्या जाहिराती देण्याची घोषणा केली आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाने (DIPR) जारी केलेल्या अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम किंवा यूट्यूबवर 10,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स असलेल्या कोणालाही 10,000 रुपयांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंत दरमहा जाहिराती मिळू शकतात. वाचा सविस्तर 

5. Weather Update : 8 जुलैपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस, वाचा हवामान विभागाचा अंदाज  

Weather Update : संपूर्ण देशात मान्सूनचे (Monsoon) आगमन झालं आहे. त्यामुळं सध्या देशातील विविध राज्यात पाऊस पडत आहे. विशेषत: उत्तर भारतात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळं काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार दिवस म्हणजे 8 जुलैपर्यंत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. वाचा सविस्तर 

6. Agriculture News : आत्तापर्यंत राज्यात 20.60 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी, दुष्काळ निवारणासह खरीपा संदर्भास बैठक

Agriculture News : राज्यात आत्तापर्यंत 20.60 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी (sowing) झाली आहे. पुढील काही दिवसांत यात आणखी भर पडण्याची अपेक्षा कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण सज्जता, खरीपाची कामे आणि केंद्र सरकार पुरस्कृत तसेच केंद्र सरकारी विभागांच्या योजनांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी पाऊस आणि सध्याची पेरणीची स्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली. राज्यात सरासरीपेक्षा 39 टक्के कमी पाऊस पडला आहे. मात्र, जुलै महिन्यात, राज्यात उच्चांकी पाऊस होईल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला. वाचा सविस्तर 

7. Pik Vima : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी अर्ज करा, कृषी आयुक्त सुनिल चव्हाणांचे शेतकऱ्यांना आवाहन

Pradhan Mantri Pik Vima Scheme : चालू खरीप हंगामामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. इच्छूक शेतकऱ्यांनी 31 जुलै 2023 पर्यंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केलं आहे. या योजनेमध्ये कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येणार असल्याचे चव्हाण म्हणाले. वाचा सविस्तर 

8. Today In History : देवी रोग भारतातून समूळ नष्ट, गंधर्व नाटक मंडळीची स्थापना, इतिहासात आज

On this day in history july 5th : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 5 जुलै रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्या दिवशी 1913 मध्ये बालगंधर्वांनी गंधर्व नाटक मंडळीची स्थापना केली होती, 1975 मध्ये आजच्याच दिवशी देवी रोग भारतातून समूळ नष्ट झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले होते. त्याशिवाय पाकिस्तानचे झुल्फिकार अली भुत्तो यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर 

9. Horoscope Today 05 July 2023 : मेष, तूळ, कुंभसह या राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

Horoscope Today 05 July 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. रविवारी मेष आणि वृषभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कर्क, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. त्याच वेळी, काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मेष ते मीन राशीसाठी बुधवार कसा राहील, काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prajakta Mali Trimbakeshwar | प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध, वादाचा 'तांडव' Special ReportMalvan| छत्रपतींच्या मालवणमध्ये देशद्रोह्यांचा मुक्काम? भारत-पाक सामन्यानंतर देशविरोधी घोषणाGangster Gaja Marne | गजा मारणेवर कारवाई, नेत्यांमधील कोल्ड वॉर? Special ReportZero Hour Full | गजा मारणेसारख्या प्रवृत्तींना आपली यंत्रणा पाठीशी का घालते? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
MMRDAला हायकोर्टाचा दणका, मेट्रोसाठीच्या सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द केल्याची नोटीस हायकोर्टाकडून रद्द
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
लई दिसाची हौस राया... पोलंडच्या तरुणाईची कोल्हापुरात ठसकेबाज लावणी, चला आता जेजुरीला जाऊ...
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
देवाधि देव महादेव... देवाभाऊंनी लिहिलेलं, शंकर महादेवन अन् अमृता फडणवीसांनी गायलेलं महाशिवरात्री गाणं रिलीज
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
पहिला 'छत्रपती संभाजी महाराज महाराष्ट्र प्रेरणा गीत' पुरस्कार जाहीर; मंत्री आशिष शेलारांकडून पुरस्काराची घोषणा
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
प्रतिक्षा संपली... BMC मधील '1846 कार्यकारी सहायक' पदांसाठीचा निकाल जाहीर, इथं पाहा तुमची निवड झाली का?
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
गोंदियात रेल्वे इंजिन अनियंत्रित झाल्याने थेट भिंतीवर आदळलं; सुदैवाने जिवीतहानी टळली
Indrajit Sawant : इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात कारवाई; महापुरुषांचा अवमान, जातीय तेढ आणि जीवे मारण्याचा गुन्हा दाखल
Sushma Andhare On Neelam Gorhe: नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
नीलम गोऱ्हेंच्या विरोधात ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा; सुषमा अंधारेंकडून थेट अब्रुनुकसानीची कायदेशीर नोटीस
Embed widget