(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pawan Kalyan : पहिलं लग्न 11 वर्षे, दुसरं दोन, तिसरं 10; तीन वेळा थाटला संसार, आता पवन कल्याण तिसऱ्या पत्नीपासून घेणार घटस्फोट
Pawan Kalyan : दाक्षिणात्य अभिनेता पवन कल्याण आता तिसऱ्या पत्नीपासून घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Pawan Kalyan Divorce : दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) सध्या चर्चेत आहे. टॉलिवूडमध्ये पवनचा बोलबाला असला तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र अभिनेत्याला यश मिळालेलं नाही. 51 वर्षीय पवन कल्याणने तीन वेळा संसार थाटला पण एकदाही तो यात यशस्वी झालेला नाही. आता तिसऱ्या पत्नीपासून म्हणजेच अन्ना लेझनेवापासून (Anna Lezhnova) तो घटस्फोट घेणार असल्याची चर्चा रंगली आहे.
पवन कल्याणने पहिल्या पत्नीसोबत 11 वर्ष संसार केला. तर दुसऱ्या पत्नीसोबत तीन वर्ष आणि तिसऱ्या पत्नीसोबत 10 वर्षे संसार केला. पण एकाही पत्नीसोबत त्याला संसार करता आलेला नाही. पवन 2013 साली अन्ना लेझनेवासोबत लग्नबंधनात अडकला होता. पण आता त्यांच्यात बिनसलं असून लग्नाच्या 10 वर्षांत ते घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. अद्याप अभिनेत्याने याबद्दल भाष्य केलेलं नाही.
पवन कल्याण वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. अभिनेत्याचं खरं नाव कोन्निडेला कल्याण बाबू असं आहे. सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्याने त्याचं नाव बदललं. पवन कल्याणची तिसरी पत्नी एक उत्तम मॉडेल आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अन्ना सध्या मुलांसोबत दुबईमध्ये राहत आहे. राम चरण आणि उपासनाच्या लेकीच्या नामकरण सोहळ्यालाही अन्नाने हजेरी लावली नव्हती.
पवन कल्याण 1997 साली नंदिनीसोबत लग्नबंधनात अडकला होता. पण 2008 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर लगेचच एका वर्षांनी पवनने रेनू देसाईसोबत संसार थाटला. पण 2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला आणि 2013 मध्ये त्याने अन्नासोबत लग्न केलं.
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पवन कल्याणचं इन्स्टाग्रामवर पदार्पण
घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान पवन कल्याणने इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. अल्पावधीतच 1.7 मिलियनपेक्षा अधिक चाहत्यांनी त्याला फॉलो केलं आहे. पवनने इन्स्टाग्रामवर पदार्पण केल्याने त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.
View this post on Instagram
पवन कल्याण दिवसाला करतो कोट्यवधींची कमाई
पवन कल्याण हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील महागडा अभिनेता आहे. तो अभिनेता असण्यासोबत सिने-निर्माता आणि समाजसेवक आहे. पवनने 'अकाडा अमयी अकाडा अब्बेयी' या सिनेमाच्या माध्यमातून मनोरंजनसृष्टीच पदार्पण केलं. त्याच्या 'थोली प्रेमा' या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पवन कल्याण दिवसाला कोट्यवधींची कमाई करतो.
संबंधित बातम्या