एक्स्प्लोर

2023 Kia Seltos facelift: अखेर प्रतीक्षा संपली! कियाची नवी कार लॉन्च; सनरूफसह Kia Seltos मध्ये दमदार फिचर्स

Kia Seltos: KIA ने तीन इंजिन पर्यायांसह नवीन Seltos सादर केली आहे. यामध्ये, 1.5L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल (115bhp/144Nm), 1.5L डिझेल (115bhp/253Nm) आणि 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन समाविष्ट आहेत.

2023 Kia Seltos Facelift Launch: दक्षिण कोरियाची ऑटोमेकर कंपनी कियाने (Kia) भारतात नव्या 2023 किया सेलटोस (2023 Kia Seltos) फेसलिफ्टचं अनावरण केलं आहे. Kia Seltos ही भारतातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे. नवीन सेल्टोसमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. भारतीय कार बाजारात ती ह्युंडाई क्रेटा (Hyundai Creta), मारुती सुझुकी ग्रँड वितारा (Maruti Suzuki Grand Vitara), टोयोटा हॅरियर (Toyota Harrier), फॉक्सवेगन टाइगुन (Volkswagen Taigun), स्कोडा कुशाक (Skoda Kushaq) आणि एमजी अ‍ॅस्टर (MG Astor) सारख्या कारशी स्पर्धा करेल. नवीन 2023 किया सेल्टोस फेसलिफ्टसाठी बुकिंग 14 जुलैपासून सुरू होईल, तर त्यानंतर किंमत घोषित केली जाईल.

नवीन सेल्टोसमध्ये मोठे अपडेट

नवीन Seltos मधील सर्वात मोठे अपग्रेड म्हणजे, ADAS (Advanced Driver Assistance System) हे आहे. तसेच यामध्ये पॅनोरॉमिक सनरूफ देण्यात आलं आहे. यात नवीन हेडलॅम्प डिझाइन आणि नवीन DRLs मिळणार आहेत, तर या नवीन सेल्टोसचा फ्रंट बंपर देखील बदलला गेला आहे. त्याशिवाय तुम्हाला नवीन चाकं, नवीन टेल-लॅम्प डिझाइन आणि अधिक आक्रमक मागील बंपर मिळेल. इंटेरियरबद्दल बोलायचं झालं तर, नवीन डॅशबोर्ड डिझाइनसह ट्विन स्क्रीन लेआउटसह कारला नवीन लूक देण्यात आला आहे. नवीन सेल्टोसला एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देखील मिळतो, जो कारला नवीन लूक देतो आणि ते कॉन्फिगर देखील केले जाऊ शकते. नेहमीप्रमाणे या कारमध्ये कूल्ड सीट्स आणि वायरलेस चार्जिंग देखील मिळते.

2023 किया सेल्टोसचे इंजिन

KIA ने तीन इंजिन पर्यायांसह नवीन सेल्टोस सादर केली आहे. यामध्ये, 1.5L नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल (115bhp/144Nm), 1.5L डिझेल (115bhp/253Nm) आणि 1.5L टर्बो पेट्रोल इंजिन समाविष्ट आहेत. यात 4 गिअरबॉक्सचे पर्याय मिळतात. ज्यामध्ये एक 6-स्पीड मॅन्युअल, एक 6-स्पीड ऑटोमॅटिक, एक 6-स्पीड iMT आणि एक 7-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा समावेश असेल.

सेफ्टी फिचर्स

2023 सेल्टोसच्या सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झाल्यास, या SUV मध्ये तुम्हाला ADAS लेव्हल 2 तंत्रज्ञान मिळते, ज्यामध्ये अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन आणि बरंच काही समाविष्ट आहे. याशिवाय या कारमध्ये 6 एअरबॅग्स उपलब्ध असून रिव्हर्स कॅमेरा आणि पार्किंग सेन्सर्सही कायम ठेवण्यात आले आहेत.

रंगांचे  पर्याय

अपडेटेड Kia Seltos दोन ड्युअल टोन स्कीम आणि विशिष्ट एक्स-लाइन मॅट पेंट स्कीमसह आठ रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Traffic Rules: कॉन्स्टेबल नाही लाऊ शकत मोठे दंड; फक्त 'यांचा' असतो अधिकार! जाणून घ्या हा नियम...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Shivnath Darade on Election : मुंबई शिक्षक मतदारसंघात महायुतीत चढाओढ, शिवनाथ दराडे ExclusiveMahendra Bhavsar Dhule : निवडणुकीत विजय आमचाच, महायुतीचे उमेदवार महेंद्र भावसार यांना विश्वासTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 26 June 2024 : ABP MajhaPM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
विधान परिषद निवडणुकांचा धुरळा; मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर मतदारसंघात कोणात चुरस?
महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा दीड तास वर्षावर खलबतं
रात्रीच्या बैठकांचा खेळ, महायुतीच्या गोटात शिजतंय काय? मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमंत्र्यांची वर्षावर खलबतं
Nana Patekar :  सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
सुपरस्टार मीच...,तुझ्याकडे कोणीच पाहणार नाही; नाना पाटेकर अनिल कपूरला असं का म्हणालेले?
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
PM Narendra Modi यांनी शब्दाला जागावं आणि लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना द्यावं : सामना
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
PM Modi: सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
सुंभ जळाला, पीळही जाईल! बहुमत गमावल्यावर मोदी जमिनीवर, राहुल गांधींना 'राम राम' करावा लागतोय; 'सामना'तून भाजपवर बोचरी टीका
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
Embed widget