Mr And Mrs Mahi : माहीच्या आयुष्यावर पुन्हा एक चित्रपट; धोनीची भूमिका कोण साकारणार? चाहते उत्सुक
Mr And Mrs Mahi : 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Mr And Mrs Mahi Release Date : 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' (Mr And Mrs Mahi) या सिनेमाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा करण्यात आली असून आता या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' हा धोनीच्या आयुष्यावर आधारित असणारा दुसरा सिनेमा आहे. याआधी 'एम.एस धोनी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमात सुशांत सिंह राजपूत धोनीच्या भूमिकेत दिसून आला होता.
'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' या सिनेमात राजकुमार राव (Rajkummar Rao) आणि जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) मुख्य भूमिकेत आहेत. 'रुही' या सिनेमानंतर राजकुमार आणि जान्हवी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये करण जोहरने (Karan Johar) 'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' या सिनेमाची घोषणा केली होती. 2022 मध्ये या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं असून आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
One dream, chased by two hearts!🏏❤️
— Dharma Productions (@DharmaMovies) July 3, 2023
Directed by Sharan Sharma, starring Rajkummar Rao & Janhvi Kapoor - #MrAndMrsMahi is arriving on the pitch on 15th MARCH, 2024 - in cinemas near you!
'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' कधी होणार रिलीज? (Mr And Mrs Mahi Release Date)
'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' या बहुचर्चित सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा शरण शर्मा (Sharan Sharma) यांनी सांभाळली आहे. शरण यांनी याआधी जान्हवी कपूरच्या 'गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. करण जोहरच्या (Karan Johar) बॅनरअंतर्गत या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. आता या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. 15 मार्च 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'मिस्टर अॅन्ड मिसेस माही' या सिनेमात राजकुमार राव महेंद्र सिंह धोनीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर जान्हवी कपूर महिमाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे जान्हवी आणि राजकुमारचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या सिनेमात धोनी आणि महिमा यांची लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे.
जान्हवी आणि राजकुमारच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या...
जान्हवीचा 'मिली' हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. बोनी कपूर यांनीच या सिनेमाची निर्मिती केली होती. जान्हवी आता वरुण धवन आणि पार्थ सिद्धपुरा यांच्यासोबत 'बवाल' या सिनेमात झळकणार आहे. तसेच तिचा 'देवारा' हा सिनेमादेखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे राजकुमार राव 'भिड' या सिनेमात शेवटचा दिसला होता. आता 'स्त्री 2' या सिनेमाच्या शूटिंगला तो सुरुवात करणार आहे.
संबंधित बातम्या