Kangana Ranaut : प्रतीक्षा संपली! कंगना रनौतच्या 'तेजस'ची रिलीज डेट समोर; वैमानिकेच्या भूमिकेत झळकणार 'पंगाक्वीन'
Kangana Ranaut : कंगना रनौतचा 'तेजस' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.
Kangana Ranaut Tejas Release Date : बॉलिवूडची पंगाक्वीन कंगना रनौत (Kangana Ranaut) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. सध्या ती 'टीकू वेड्स शेरू' या सिनेमामुळे चर्चेत आहे. दरम्यान तिच्या 'तेजस' (Tejas) या बहुचर्चित सिनेमाची रिलीज डेट समोर आली आहे.
'तेजस' सिनेमात पंगाक्वीन झळकणार वैमानिकेच्या भूमिकेत
'तेजस' या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यासोबत एक खास पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये पंगाक्वीन वैमानिकेच्या भूमिकेत दिसत आहे. कंगनाने या सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"हवाई दलाच्या वैमानिकांच्या शौर्याचा सन्मान. 20 ऑक्टोबरला 'तेजस' प्रदर्शित होणार".
कंगनाचा 'तेजस' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला? (Tejas Release Date)
'तेजस' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सर्वेश मेवाडा यांनी सांभाळली आहे. या सिनेमात कंगना मुख्य भूमिकेत असून अभिनेत्रीचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. 'तेजस' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. आता येत्या 20 ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
View this post on Instagram
'तेजस' (Tejas Movie) हा सिनेमा वैमानिक तेजस गिल (Tejas Gill) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात कंगनाचा अॅक्शन मोड पाहायला मिळणार आहे. कंगनासह या सिनेमात अंकुश चौहान, वरुण मित्रा आणि पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. रॉनी स्क्रूवाला यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
कंगना रनौतच्या आगामी सिनेमांबद्दल जाणून घ्या...
कंगना रनौत सध्या 'तेजस' या सिनेमामुळे चर्चेत असली तरी तिचे 'चंद्रमुखी 2' आणि 'इमरजेन्सी' हे दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहेत. 'चंद्रमुखी 2' हा पॅन इंडिया सिनेमा असून हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. एकंदरीतच सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना अभिनेत्रीसाठी खूप खास आहे. 'इमरजेन्सी' या सिनेमात कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. कंगनानेच या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. कंगनाच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
संबंधित बातम्या