Baipan Bhaari Deva : बॉलिवूडला भिडल्या 'त्या' सहाजणी; 'बाईपण भारी देवा'ने पाच दिवसांतच जमवला 9.75 कोटींचा गल्ला
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुकामूळ घालत आहे.
![Baipan Bhaari Deva : बॉलिवूडला भिडल्या 'त्या' सहाजणी; 'बाईपण भारी देवा'ने पाच दिवसांतच जमवला 9.75 कोटींचा गल्ला Baipan Bhaari Deva Box Office Collection Day five marathi movie kedar shinde Deepa Parab ENTERTAINMENT Marathi Movie rohini hattangadi Suchitra Bandekar Vandana Gupte Shilpa Navalkar Sukanya Mone Baipan Bhaari Deva : बॉलिवूडला भिडल्या 'त्या' सहाजणी; 'बाईपण भारी देवा'ने पाच दिवसांतच जमवला 9.75 कोटींचा गल्ला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/3b9d9f0d2133a591f1fed12b839e24d31688530176232254_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Baipan Bhaari Deva Box Office Collection : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 30 जून 2023 रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या पाच दिवसांत दणदणीत कमाई केली आहे. आता हा सिनेमा 10 कोटींचा टप्पा पार करण्यासाठी सज्ज आहे.
हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टी असो वा एखादं कुटुंब असो. सध्या सगळीकडेच 'बाईपण भारी देवा' या मराठी सिनेमाची चर्चा सुरू आहे. रितेश देशमुखच्या 'वेड' (Ved) या सिनेमानंतर पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळवण्याचं काम 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या दर्जाचे मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हे सिनेमे कमी पडले. अशातच आता 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने पुन्हा एकदा मराठी मनोरंजनसृष्टीला सुगीचे दिवस दाखवले आहेत.
'बाईपण भारी देवा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Baipan Bhaari Deva Box Office Collection Day 5)
'बाईपण भारी देवा' या सिनेमाची रिलीजआधीपासूनच चर्चा होती. त्यामुळे सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या पहिल्या दिवशी अर्थात ओपनिंग डेला या सिनेमाने 1.3 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झालेली दिसून आलं. दुसऱ्या दिवशी 2.45 आणि तिसऱ्या दिवशी 3.3 कोटींची कमाई या सिनेमाने केली. त्यामुळे हा सिनेमा या वर्षीचा वीकेंडला सर्वाधिक ओपनिंग करणारा पहिला मराठी सिनेमा ठरला. तर रिलीजच्या चौथ्या दिवशी 1.20 आणि पाचव्या दिवशी 1.50 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच आतापर्यंत या सिनेमाने 9.75 कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा सिनेमा 10 कोटींचा टप्पा पार करेल.
पहिला दिवस : 1.3 कोटी
दुसरा दिवस : 2.45 कोटी
तिसरा दिवस : 3.3 कोटी
चौथा दिवस : 1.20 कोटी
पाचवा दिवस : 1.50 कोटी
एकूण कमाई : 9.75 कोटी
'बाईपण भारी देवा'चं सर्वत्र कौतुक
'बाईपण भारी देवा' या सिनेमाचं सर्वत्र कौतुक होत आहे. महिला वर्गासह पुरुष मंडळीदेखील या सिनेमाचं खूप कौतुक करत आहेत. तसेच मनोरंजनसृष्टीतील मंडळींनीदेखील खास पोस्ट शेअर करत या सिनेमाचं आणि कलाकारांच्या अभिनयाची प्रशंसा केली आहे. माऊथ पब्लिसिटीचा या सिनेमाला फायदा होत आहे.
'त्या' सहाजणी बॉलिवूडला भिडल्या
एका पेक्षा एक सिनेमे घेऊन येणाऱ्या केंदार शिंदेंनी (Kedar Shinde) 'बाईपण भारी देवा' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. तर या सिनेमात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गुप्ते (Vandana Gupte), सुकन्या मोने (Sukanya Mone), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब (Deepa Parab) मुख्य भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या
Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' कसा आहे? वाचा रिव्ह्यू...
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)