Amar Mulchandani ED Arrest : सेवा विकास बँक गैरव्यवहार प्रकरणी अमर मुलचंदानीला ईडीकडून अटक; काय आहे प्रकरण?
पुण्यातील व्यवसायिक अमर मुलचंदानीला ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष होते. त्यांना 1 जुलै रोजी अटक केली आहे.
Amar Mulchandani ED Arrest : पुण्यातील व्यवसायिक अमर मुलचंदानीला (Amar Mulchandani) ईडीकडून अटक करण्यात आली आहे. सेवा विकास को-ऑपरेटिव्ह बँकेच्या फसवणूकप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीच्या संदर्भात ही अटक करण्यात आली आहे. सेवा विकास सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष होते. त्यांना 1 जुलै रोजी अटक केली आहे.
124 एनपीए कर्ज खात्यांमध्ये बँकेचे 429 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे बँक दिवाळखोरीत निघाली असून हजारो लहान ठेवीदारांचे नुकसान झाले आहे. ईडी बँकेचे माजी अध्यक्ष अमर मुलचंदानी, संचालक/अधिकारी आणि कर्ज थकबाकीदारांविरुद्ध पुण्यात नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे तपास सुरू केला होता. त्यानुसार त्यांना अटक केली आहे. अमर यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अमर साधुराम मुलचंदानी यांच्या विविध बेनामी संपत्तीसह या प्रकरणात यापूर्वी 122.35 कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त करण्यात आली होती. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ED has arrested Amar Sadhuram Mulchandani, Ex-Chairman of Seva Vikas Co-operative Bank on 01-07-2023 under the PMLA, 2002 in Seva Vikas Co-operative Bank fraud case. The Hon’ble Court, Mumbai has granted ED Custody for 6 days, till 07.07.2023.
— ED (@dir_ed) July 5, 2023
Amar Mulchandani ED Arrest : काय आहे प्रकरण?
अमर मूलचंदानी सेवा विकास बँकेचे माजी चेअरमन आहेत. पिंपरीतमधील मिस्त्री पॅलेस या ठिकाणी ते राहतात. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचा फ्लॅट आहे. याच ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. मूलचंदानी यांच्यासह इतर संचालकांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे 124 कर्जांचं वाटप केल्याचं आणि यातून 400 कोटींहून अधिकचा घोटाळा झाल्याचं समोर आलं होतं. पिंपरी चिंचवड पोलिसांनी याप्रकरणी अमर मूलचंदानी यांच्यासह पाच जणांना अटकही केली होती. काही महिन्यांपूर्वी मूलचंदानी जामिनावर बाहेर आले आणि त्यानंतर पुन्हा ईडीने छापा टाकला होता. आरबीआयने प्रशासक नेमलेल्या या बँकेत हजारो ठेवीदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकून आहे.
Amar Mulchandani ED Arrest : ठेवीदारांचा कोट्यवधींचा पैसा अडकला
सेवा विकार बॅंकेत मोठा घोटाळा झाला असून बनावट कागदपत्रं देऊन त्यामध्ये 400 कोटी हून अधिक रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणी पिंपरी चिंचवड मधील सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्यासह काही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यावेळी अमर मुलचंदानी यांना अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आलं होतं. मूलचंदानी हे पिंपरी - चिंचवडचे माजी नगरसेवक आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :