एक्स्प्लोर

Sharad Pawar: दादांचा कारभार, पवारच सूत्रधार? प्रत्येकाच्या मनात डोकावतोय प्रश्न, पण याची कारणं काय?

शरद पवारांनी पत्रकार परिषदेत थेट लोकांमध्ये जाऊन संघर्षाची भाषा केली. पवारांच्या याच पत्रकार परिषदेनंतर प्रश्न उपस्थित झाला की राष्ट्रवादीच्य्या बंडाला पवारांचा अघोषित पाठिंबा तर नाही आणि त्याला कारणंही तशीच आहेत

मुंबई : गेले दोन दिवस राज्यात घमासान सुरू आहे. वर्षभरापूर्वी शिवसेना (Shivsena) फुटली तशीच आता राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटली. फरक इतकाच आहे की शिवसेना फुटली तेव्हा उद्धव ठाकरेंना सहानभुती मिळाली, पण राष्ट्रवादी फुटली तेव्हा शरद पवारांना सहानभुतीसोबत प्रश्नचिन्ह मिळालंय. राष्ट्रवादीच्या फुटीमागे शरद पवारांची राजकीय खेळी आहे का असा प्रश्न रविवारपासून प्रत्येकाच्या मनात डोकावतोय. पण याची कारणं काय आहेत?

24 वर्षांचा पक्ष 15 वर्षांची सलग सत्ता  शेकड्याने आमदार-खासदार, हजाराने पदाधिकारी, लाखो कार्यकर्त्यांचं जाळं हे सगळं एका दमात हिरावलं. तेही आपल्याच पुतण्यानं पवार धक्क्यात असतील, पवार कोलमडले असतील असं अनेकांना वाटलं होतं. पण पवारांनी पत्रकार परिषदेत थेट लोकांमध्ये जाऊन संघर्षाची भाषा केली. पवारांच्या याच पत्रकार परिषदेनंतर प्रश्न उपस्थित झाला की राष्ट्रवादीच्य्या बंडाला पवारांचा अघोषित पाठिंबा तर नाही आणि त्याला कारणंही तशीच आहेत

कारण क्रमांक एक दादांविरोधात न्यायालयात न जाणे

पक्ष फुटल्यानंतर दोनच तासांत पवारांनी पक्षाच्या अधिकारांच्या बाबतीत न्यायालयात जाणार नाही असं स्पष्ट केलं.  पत्रकार परिषदेत पवारांनी अजित पवारांना एकदाही दुषण दिलं नाही. बंडखोरी, पक्षफुटी, गद्दारी यातला एकही शब्द पवारांच्या तासाभराच्या पत्रकार परिषदेत नव्हता.पक्ष फुटल्यानंतर अनुभवी नेत्याचं शांत राहणं समजलं जाऊ शकतं पण कायदेशीर लढाईला थेट नकार देणं प्रश्नचिन्ह निर्माण करणार होतं. 

कारण क्रमांक दोन सुप्रिया सुळे, रोहित पवारांचीही सौम्य भाषा

राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे, पवारांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांनीही आपल्या भूमिकेत पवारांचाच कित्ता गिरवला. दोघेही अजित पवारांच स्थान मान्य करत राहिले. सुप्रिया सुळे, रोहित पवारांचीही सौम्य भाषा वापरली आहे.  पक्ष फुटल्यानंतरही दादांची पाठराखण करण्याची इतकी धडपड का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

कारण क्रमांक तीन  वर्षभराच्या मंत्रिपदासाठी हे तिघे दादांसोबत का जातील?

छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि प्रफुल्ल पटेल हे पवारांचे खास म्हणून ओळखले जातात. हे तिन्ही नेते एका क्षणात अजित पवारांसोबत जातात हे सहज मान्य होण्यासारंख नाही. दिलीप वळसे पाटील यांच्यामागे तर ईडीही नव्हती मग फक्त वर्षभराच्या मंत्रीपदासाठी हे नेते दादांसोबत जातील. हे फक्त प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे.

कारण क्रमांक चार एकमेकांना सांभाळण्याची इतकी धडपड का?

एकीकडे अजित पवारांनी पक्षावर ताबा घेतोय असं दाखवलं. पण पक्षाध्यक्ष शरद पवारच राहतील हे स्पष्ट केलं. पवारांनी नेमलेले प्रदेशाध्यक्ष बदलले पण बॅनरवर पवारांचे फोटो ठेवले . दुसरीकडे कार्यकर्त्यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या नेत्यांच्या फोटोंना काळं फासलं. तर जितेंद्र आव्हाडांनी ते आपल्या हातानं पुसलं.

कारण क्रमांक पाच  राष्ट्रवादीला वर्षभर आधीच भाजपसोबत जायचं होतं? 

राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपसोबत जाण्याची स्क्रिप्ट वर्षभर आधीच ठरली होती असा आरोप विरोधक करतात. उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्यासाठी एकनाथ शिंदेच्या बंडालाराष्ट्रवादीने अप्रत्यक्ष मदत केल्याची चर्चा आधीच सुरू झाली आणि खुद्द जितेंद्र आव्हाड त्याला दुजोरा देतात. 

कारण क्रमांक संघटनेतील बदल घटनेत नमूद न होणं

अजित पवारांची नाराजी आणि शरद पवारांचं राजीनामानाट्य  यावरून राष्ट्रवादीत सगळं आलबेल नाही हे प्रत्येकाला कळत होतं अशा परिस्थितीत पवारांनी संघटनात्मक नेमणूका केल्या. सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांना कार्यकारी अध्यक्ष नेमलं  पण या सगळ्याची नोंद पक्षाच्या घटनेत केलीच नाही ती नंतर करू असं पवारांनी सांगितलंपण या बदलांनंतर फक्त दहा दिवसांत पक्ष फुटतो आणि या नेमणूका कागदावरच राहतात ही चूक म्हणायची की राजकीय खेळी?

पक्ष फुटल्यानंतर आता पक्षावर दावे सांगण्याच्या खेळी एकीकडे सुरू झाल्यात तर दुसरीकडे लवकरच अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल अशीही चर्चा केली जात आहे. राष्ट्रवादीला भविष्यात सरकारमध्ये काय स्थान मिळतं आणि 2024 च्या निवडणुकांना राष्ट्रवादी कशी सामोरी जातेय यावरच दुपारच्या शपथविधीमागची कारणं आणि सूत्रधार स्पष्ट होतील. 

हे ही वाचा :

मुख्यमंत्री शिंदेंचा नागपूर दौरा रद्द, रात्रीच तडकाफडकी मुंबईत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, पुन्हा नवा ट्विस्ट?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget